१९ वर्षांनी अधिकमासाच्या सुरुवातीला दुर्मिळ योग! ‘या’ राशींचे नशीब पालटणार? विष्णू-लक्ष्मी कृपेने प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता..

शास्त्रात अधिकमासाला विशेष महत्त्व आहे. वैदिक पंचागानुसार १८ जुलैपासून अधिकामासाला सुरूवात होत आहे. त्याचबरोबर यंदाच्या अधिकामासाला विशेष महत्त्व आहे. कारण यंदा १९ वर्षानंतर एक दुर्मिळ योग बनत आहे. अधिक महिन्यांत अनेक ग्रह आणि नक्षत्रांची युती तयार होत आहे, ज्यामुळे अनेक राशींना चांगले लाभ होण्याची शक्यता आहे. अशातच लक्ष्मी नारायण योग तयार होत असल्यामुळे ३ राशीच्या लोकांवर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा असणार आहे. त्यामुळे या राशींना संपत्ती आणि सौभाग्य प्राप्त होऊ शकते. तर त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus Zodiac)अधिकामास वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ सिद्ध होऊ शकतो. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. तसेच या काळात तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करू शकता. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. या वेळी तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते. तसेच तुम्ही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. या काळात तुम्हाला तुमच्या आईची साथ मिळण्याची शक्यता आहे. तसेत जे लोक प्रॉपर्टी, रिअल इस्टेट किंवा प्रॉपर्टी डीलिंगशी संबंधित काम करतात, त्यांच्यासाठी हा काळ उत्तम ठरु शकतो.
सिंह रास (Leo Zodiac)
सिंह राशीच्या लोकांसाठी अधिकमासाचा महिना अनुकूल ठरू शकतो. कारण तुमच्या राशीमध्ये लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. त्यामुळे या काळात तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारण्याबरोबर तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. दुसरीकडे, कौटुंबिक व्यवसाय करणाऱ्यांना या काळात चांगला फायदा होऊ शकतो आणि ते घरातील लोकांसोबत व्यवसाय वाढवण्याचे योजना बनवू शकतात. या काळात तुमचे आरोग्य चांगले राहू शकते. विवाहित लोकांचे जीवन चांगले राहण्याची शक्यता आहे. तसेच तुमचे उत्पन्न वाढण्याची दाट शक्यता आहे.
तूळ रास (Tula Zodiac)अधिकमासात लक्ष्मी नारायण योगाची निर्मिती तूळ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ सिद्ध होऊ शकते. कारण तुमच्या राशीतून उत्पन्नाच्या स्थानी हा योग तयार होणार आहे. या काळात लक्ष्मी नारायण योगाच्या शुभ प्रभावामुळे व्यवसायात चांगली वाढ होऊ शकते आणि तुम्हाला सरकारकडून अनेक फायदेही मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही कुटुंब किंवा मित्रांसोबत तीर्थयात्रेला जाऊ शकता. दुसरीकडे, हा कालावधी विद्यार्थ्यांसाठी शुभ ठरू शकतो. कोणत्याही स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होण्याची शक्यता आहे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद