२ जानेवारी २०२३, पुत्रदा एकादशी संतान प्राप्तीसाठी व्रत कसे करावे? बोला हा मंत्र आणि चमत्कार बघा.

पौष महिन्यातील येणाऱ्या एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हणतात. एकादशीच व्रत केल्यामुळे संतान प्राप्ती होते. संतान होण्यामध्ये अडचणी येत असतील, तर त्या सगळ्या दूर होतात. त्याच बरोबर या एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने इतरही अनेक गोष्टींची प्राप्ती होते. मग कोणत्या आहेत. त्या गोष्टी त्याचबरोबर जर संतान प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्यासाठी कुठल्या मंत्राचा जप करावा, व्रत कसं करावं चला हे सगळं जाणून घेऊया.
मित्रांनो एकादशीच व्रत हे व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ व्रत मानलं जातं एकादशीच्या व्रत नियमित केल्याने मनाची चंचलता नाहीशी होते धन आणि आरोग्याची ही प्राप्ती होते इतकच कशाला मानसिक आजारांसारख्या समस्येतूनही सुटका होते. पौष महिन्याच्या शुक्लपक्ष्यातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात.
या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते. हे व्रत ठेवल्याने मुलांची संबंधी चिंता समस्या दूर होतात. नवीन वर्षात पुत्रदा एकादशी २ जानेवारी २०२३ रोजी असेल मानतेनुसार जे लोक एकादशीच्या व्रत करतात. त्यांना आयुष्यभर सुख तर मिळतात पण त्याचबरोबर मोक्षही प्राप्त होतो.
आता बघूया एकादशीचा शुभ मुहूर्त काय आहे. उदय तिथीनुसार पौष पुत्रदा एकादशी २ जानेवारीला आहे. पौष पुत्रदा एकादशीची सुरुवात १ जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळी ७ वाजून ११ मिनिटांनी होईल. आणि एकादशीची समाप्ती २ तारखेला रात्री ८ वाजून २३ मिनिटांनी होईल. पौष पुत्रदा एकादशीचे कारण तुम्हाला ३ तारखेला करायचे सकाळी ७ वाजून १२ मिनिटांपासून ते ९ वाजून २५ मिनिटांपर्यंत आता एकादशीला पूजा कशी करायची ते बघूया.
पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते. भक्तांनी उपवासाच्या एक दिवस आधी फक्त सात्विक भोजन कराव. याशिवाय उपवास करणाऱ्या स्त्रीने किंवा पुरुषाने आत्मसह आणि ब्रह्मचर्य पाळाव. दुसऱ्या दिवशी उपवास सुरू करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान श्रीहरी विष्णूंचा ध्यान कराव.गंगाजल, तुळशीची पानं, फुल, पंचामृत यांनी भगवान श्रीहरी
विष्णूंची पूजा करावी. पुत्रदा एकादशीचे व्रत करणाऱ्या महिला किंवा पुरुषांनी निर्जला व्रत करावा. जर तुमची प्रकृती ठीक नसेल तुम्हाला निर्जला व्रत जे पण नसेल तर संध्याकाळी दिवा लावून फळ खावीत. व्रताच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला गरजू व्यक्तींना अन्नदान करा दक्षिणा दान करा. त्यानंतरच उपवास सोडावा.
आता संतान प्राप्तीसाठी या एकादशीच्या दिवशी तुम्हाला काय करायचे सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पती-पत्नीने मिळून भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी. बालगोपालांना लाल, पिवळी फुलं, तुळशीची पानं आणि पंचामृत अर्पण करावे. पती-पत्नीने संतान गोपाल मंत्राचा जप करावा. मंत्राचा उच्चार केल्यानंतर पूजा संपल्यानंतर प्रसाद घ्यावा आणि गरजूंना अन्नदान कराव.
आता ज्या संतान गोपाल मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र याप्रमाणे आहे.” ओम देवकीसुत गोविंद वासुदेव जगतप्ते देही मे तनय कृष्ण त्वामह शरण गत” हा मंत्र आहे. पुत्रदा एकादशीच्या दिवशी या मंत्राचा जप केल्याने मनाप्रमाणे संतान प्राप्ती होते अस म्हटल जात.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद