22 ऑगस्ट चौथा श्रावणी सोमवार, कोणती शिवामूठ वाहावी? येथे जाणुन घ्या.

भगवान महादेवांनी कामासूरावर विजय मिळवला होता, तसे आपल्या मनातील, विचारातील वासना नियंत्रणात राहण्यासाठी श्रावणातील व्रते आयोजली असल्याची मान्यता आहे. जी व्यक्ती देहावर आणि मनावर नियंत्रण मिळवू शकते, ती कोणतीही गोष्ट मिळवू शकते, असा विश्वास श्रावणी सोमवारच्या उपासनेतून आणि व्रतामधून प्राप्त होतो. महादेवांची उपासना, आराधना आणि पूजन करण्यासाठी श्रावण महिना सर्वांत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. यंदाच्या श्रावणाची सुरुवात आणि सांगता सोमवारी होत असून, हा शुभ संयोग असल्याचे मानले जात आहे. श्रावणातील चौथा सोमवार, त्या दिवशी वाहण्याची शिवामूठ आणि काही शुभ योगांबाबत जाणून घेऊया.
चौथा श्रावणी सोमवार 22 ऑगस्ट 2022 रोजी असून, या दिवशी जव शिवामूठ म्हणून वाहण्याची परंपरा आपल्या कडे आहे. सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते. देशभरातील कोट्यवधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकरांची विशेष पूजा करतात. जलाभिषेक आणि रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो. शिवपूजन कसे करावे? श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा. तो दुसऱ्या दिवशी सोडावा.
मात्र, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरी चालते. श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा. यानंतर महादेव शिवशंकरांचे ध्यान करावे. ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्रोच्चारासह शिवशंकरांची तर, ‘ॐ नमः शिवायै’ या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित षोडशोपचारी पूजा करावी. या दिवशी एकभुक्त राहावे. शक्य असल्यास घरा जवळ च्या एखाद्या उद्यानात थोडा वेळ जाऊन यावे. अशा तऱ्हेने हे व्रत एकूण चौदा वर्षे करून मग त्याचे यथासांग उद्यापन करावे, असे सांगितले जाते.
शिवामूठ वाहताना म्हणावयाचा मंत्र – विवाह झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे स्त्रिया हे शिवास्त म्हणजेच शिवा मूठ वाहण्याचे व्रत करतात. श्रावणी सोमवारी शिवपूजन झाल्यावर शिवामूठ वाहावी. चौथ्या श्रावणी सोमवारी जव शिवामूठ म्हणून वाहण्याची पद्धत आहे. ‘नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने ।शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।’, असा मंत्र शिवामूठ वाहताना म्हणावा. ज्यांना शिवमंदिरात जाणे शक्य नसेल, त्यांनी घरीच शिवामूठ वाहावी. शंकराचे नामस्मरण करून ती काढावी आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना द्यावी, असे सांगितले जाते.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news