राशिभविष्य

२४ ऑगस्टपर्यंत बुधदेवाचे महागोचर, ‘या’ राशी होतील लखपती? तीन टप्प्यांमध्ये ‘असा’ मिळू शकतो अपार पैसा…

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह वेळोवेळी गोचर करून राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतो. ज्याचा प्रभाव मानवी जीवन व पृथ्वीवर कमी अधिक प्रमाणात दिसून येऊ शकतो. ज्योतिष अभ्यासकांनी सांगितल्यानुसार येत्या ७ जूनलाच बुध मार्गीक्रमण सुरु होणार आहे. मधला काही काळ बुध वृषभ राशीत येऊनही त्याचे मार्गीक्रमण संथ वेगाने कायम असणार आहे.

बुधदेव वृषभ राशीत गोचर, राशीत अस्त व उदय व त्यानंतर पुन्हा राशी बदल या उलाढालींमध्ये २४ ऑगस्ट पर्यंत प्रभावी असणार आहे. या उलाढालींसह २४ ऑगस्टपर्यंत काही राशी या फायद्यात असण्याची शक्यता आहे. या राशींना नेमका कसा व काय लाभ होऊ शकतो हे आता जाणून घेऊया…

२४ ऑगस्टपर्यंत बुधदेव घडवतील महाबदल, ‘या’ राशी होतील श्रीमंत?

सिंह रास (Leo Zodiac)
बुध ग्रह हा सिंह राशीच्या नवव्या स्थानी भ्रमण करत आहे. हे स्थान भाग्य व प्रवासाचे स्थान मानले जाते. यामुळेच येत्या काळात सिंह राशीला अचानक लाभदायक स्थिती अनुभवता येऊ शकते. आपल्याला कामाच्या निमित्ताने काही दिवस भ्रमंतीची संधी आहे. कामाच्या निमित्ताने प्रवास घडल्याने करिअरच्या दृष्टीने आयुष्याला वेग येऊ शकतो. तुमचे वडिलांसह व वडिलधाऱ्यांसह संबंध सुधारण्यास मदत होऊ शकते. स्पर्धा परीक्षांमध्ये तुमच्या राशीला मोठ्या यशाची चिन्हे आहेत. भागीदारीमध्ये प्रचंड मोठे फायदे होऊ शकतात. तुम्हाला मेहनत व परिश्रमाचे फळ मिळू शकते.

कर्क रास (Cancer Zodiac)
बुध ग्रह मार्गी होणे हे कर्क राशीसाठी मोठे यश घेऊन येऊ शकते. बुधदेव आपल्या राशीच्या दहाव्या स्थानी भ्रमण करणार आहेत. बेरोजगार मंडळींना येत्या काळात नोकरीची संधी मिळू शकते. या काळात आपली कष्टांपासून सुटका होणे कठीण दिसत आहे. पण तुम्हाला प्रत्येक मेहनतीचे, कामाचे योग्य फळ मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचा सल्ला एखादा बहुमोल फायदा घडवून आणू शकतो ज्यामुळे तुम्हाला पद, पगार व मान- सन्मान वाढल्याचे दिसून येऊ शकते. संतती सुखाची चिन्हे आहेत.

मकर रास (Capricorn Zodiac)
मकर राशीत बुध देव हे चतुर्थ स्थानी भ्रमण करणार आहे. येत्या काळात आपल्याला भौतिक सुखाने समृद्ध आयुष्य जगता येण्याची संधी आहे. आपल्या कुंडलीत वाहन- प्रॉपर्टीच्या खरेदीची संधी आहे. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक लाभदायक ठरू शकते. शिवाय शेअर बाजारातून म्हणजेच गुंतवणुकीतून धनलाभ होण्याचा योग आहे. बुध गोचराच्या तिसऱ्या टप्प्यात मकर राशीच्या दहाव्या स्थानी बुध ग्रह सक्रिय असणार आहे. यामुळे तुम्हाला करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळू शकते. जुलैच्या पहिल्या टप्प्यात आयुष्यात प्रेमाची पालवी बहरून येऊ शकते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button