देश

जगापासून आजही हे सत्य लपून आहे, भारतात 4000 वर्षांपूर्वी धातूचा रथ अस्तित्वात होता, बघा हे दृश्य…

आपण ऐकलं असेलच भारतीय आयुर्वेद शास्त्राची कॉपी बऱ्याच देशांनी केली आहे. अक्षरशः लाकुड जळून झालं की जी राख उरते ती राख सुद्धा ऑनलाईन मार्केटमध्ये विक्री साठी येऊन गेलीय असो विषय फक्त हा आहे की तुम्ही हे खूपदा ऐकलं असेल की भारतातून सोन्याचा धूर निघायचा! आपल्या देशातली सभ्यता, संस्कृती खूप प्राचीन आहे, सुबत्ता असलेल्या आपल्या देशावर अनेक विदेशी लोकांनी आक्रमण करून आपल्या देशाची संस्कृती आणि इतिहासाची मोडतोड केली!

दिल्लीपासून साधारण ६७ किमीवर असलेल्या उत्तर प्रदेश इथल्या सीनौली गावाची ही गोष्ट. २००५ साली या गावातल्या गावकऱ्यांना शेतीसाठी खोदकाम करताना जुन्या भांड्यांचे, सोन्याचे धातूचे अवशेष सापडायला लागले. आणि तिथल्या गावकऱ्यांनी त्या सगळ्या वस्तू साठवायला सुरुवात केली. या सगळ्या प्रकाराची Archaeological Survey of India या सरकारी खात्याला माहिती मिळाली, आणि त्यांनी सीनौली येथे उत्खनन करायला सुरुवात केली. आणि त्यांच्यासमोर जे सत्य उघडकीस आलं ते पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला!

या सगळ्या उत्खननात जवळजवळ ११६ मृतदेहांचे अवशेष सापडले आणि त्यांनी त्यावर अभ्यासही सुरु केला. पण काही कारणास्तव हे उत्खनन थांबवावं लागलं, आणि थेट २०१८ मध्ये पुन्हा यासाठी परवानगी मिळाली! या उत्खननात सापडलेल्या मृतदेहांवर जय प्रकारे अंतिम संस्कार केले गेले ती पद्धत आणि त्या वेळेस वापरलेली सामुग्री, शिवाय त्यातल्या शवपेट्यावर चढवलेलं तांब्याचे आवरण हे सगळं पाहून तिथली लोकं चकित झाली.

शिवाय या उत्खननात ४००० वर्ष जुनी हत्यारं, तलवारीसुद्धा मिळाल्या. तलवारीच्या मुठीवरचं धातूचं आवरण आणि त्यावरचे अवशेष जेंव्हा अभ्यासले गेले तेंव्हा ही गोष्ट समोर आली की हडप्पा मोहेंजो दारोच्या उत्खननात सापडलेल्या हत्यारांपेक्षा ही हत्यारं बरीच आधुनिक होती!

शिवाय सीनौली इथल्या साईटवर जे मृतदेह आढळले त्यातले बरचसे मृतदेह हे महिलांचेसुद्धा होते आणि त्याच्या मृतदेहापाशीसुद्धा अशाच काही आधुनिक हत्यारांचे अवशेष सापडले.

पण या सगळ्या उत्खननात खरा ट्विस्ट तेंव्हा आला जेंव्हा ४००० वर्ष जुने असलेले ३ रथ ASI च्या लोकांना सापडले. हे रथ जरी दिसायला वेगळे असले तरी याची रचना ही जगातल्या इतर तत्कालीन संस्कृतीशी मिळतीजुळती होती! या रथांची रचना, त्यातल्या चाकांवर केलेलं काम आणि त्यातले धातूचे अवशेष पाहता हा रथ नेमका कीती जुना आहे याचा अभ्यास केला गेला, आणि या रथाचा इतिहास लोकांच्या समोर आला.

आर्यांनी रथ सर्वप्रथम भारतात आणले आणि त्यासाठी घोड्याचा वापरसुद्धा त्यांनीच केला ही पोकळ थेअरी कीती चुकीची आहे याची जाणीव हा रथ सापडला तेंव्हा झाली. २००५ नंतर थेट २०१८ मध्ये या साईटवर या सगळ्या गोष्टी मिळाल्या. मधल्या कालावधीत हे उत्खनन का थांबले यामागे काही राजकीय हेतू होता का? अशा कित्येक प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नाहीत. पण भविष्यात याबद्दल आणखीन गोष्टी समोर येतील अशी आशा करुयात!

या सगळ्या तज्ञांचा अभ्यास पाहता आपल्या देशातल्या प्राचीन संस्कृतीचा, सभ्यतेचा, भारतीय वेदीक आणि सनातन संस्कृतीच्या इतिहासात कीती छेडछाड झाली आहे याचा अंदाज येईल! डिस्कव्हरी प्लस या प्लॅटफॉर्मवर ही डॉक्युमेंट्री तुम्ही पाहू शकता. आपल्या देशाचा इतिहास नेमका काय आहे आणि आपल्या शालेय पाठ्यपुस्तकातून कशाप्रकारे चुकीचा इतिहास आपल्याला शिकवला गेला याची जाणीव तुम्हाला ही डॉक्युमेंट्री बघताना नक्की होईल!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही
प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button