अक्कलकोटला गेल्यावर काय होते? तिथे गेल्यावर काय मिळते?

श्री स्वामी समर्थ महाराज की जय|| श्री स्वामी समर्थांचे मूळ स्थान म्हणजे अक्कलकोट होय. आनंदनाथ महाराज हे स्वामींचे प्रिय शिष्य होते. याच आनंदनाथ महाराजांवर एक महत्वाची जबाबदारी सोपवली होती ती म्हणजे शिरडीचे साईबाबा यांना प्रसिद्धीस आणण्याची जबाबदारी. त्यांनी ती लीलया पेलली होती. नाशिक जिल्ह्यातील साबर गावी मठ स्थापून त्यांनी हे कार्य केले.
साईबाबा सुद्धा आनंदनाथ महाराज यांना आपले मोठे गुरू बंधू मानून त्यांचा सन्मान करत असत. आनंदनाथ महाराज भेटीला आल्यावर साईबाबा त्यांना आपल्या द्वारका माईतील आसन देत बसायला देत असत व स्वतः खाली बसत असतात. त्यांच्या भेटीचा आनंद त्यांना गगनात मावायचा नाही. आनंदनाथ महाराज यायच्या दिवशी ते सर्वांना आनंदाने सांगत आज तो मेरे भाग्य खुलने वाले है, आज मेरा बडा भाई आनेवाला है.
याचा उल्लेख साई स्वचरित्र या ग्रंथात आहे. स्वामीसुद हरिभाऊ तावडेनंतर स्वामींचे आत्मलिंग सापडणारी जर कोणती दुसरी एकमेव व्यक्ती असेल तर ती म्हणजे आनंदनाथ महाराज होय. यावरूनच त्यांची योग्यता आपल्याला कळते. एवढ्या मोठ्या पुरुषाचा साधा उल्लेखही स्वामी चरित्रात नाही यांचे नवलच वाटते.
आपण आनंदनाथ महाराजांचे वेगवेगळे अभंग ऐकत असतो. आनंदनाथ महाराजांनी स्वामींवरती शेकडो अभंग लिहले आहेत. त्यातील एक अभंगात महाराज म्हणतात की अक्कलकोट हे स्वतः स्वामींच्या पावन पदस्पर्शाने पावन झाले आहेत, परंतु अगणित दुराचारी, दोषी, धूर्त लोकही त्यामुळे धन्य धन्य झाले आहेत.
अक्कलकोट हे विश्वातील एकमेव अद्वितीय असे तीर्थराज आहे की जिथे जरी कुणी अवचितपणे गेले तरी , सहज उगीच गेले, किंवा थट्टा म्हणून फिरायला एन्जॉय करायला किंवा काही कामस्तव काही कारणाने गेले तरी त्या भूमीवर पाय ठेवल्यावर व स्वामींचे दर्शन घेतल्यावर तुम्हाला एक वेगळाच अनुभव येईल. स्वामींची कृपा तुम्हाला लाभेल.
स्वामी भक्तांसोबतच त्याच्या संपूर्ण कुळाचा उद्धार स्वामी करत असतात. इतकी स्वामींची असीम कृपा होते. आनंदनाथ महाराज म्हणतात की शक्य झाल्यास प्रत्येक पौर्णिमेला अक्कलकोट ठिकाणी जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे, अशी वारी करावी. पण ज्यांना हे शक्य नाही त्यांनी चैत्र पौर्णिमेला वर्षातून एकवेळ तरी नक्की जावे.
त्यामुळे स्वामी महती तुम्हाला कळेलच त्यासोबत तुम्हाला अक्कलकोट या पवित्र भूमीचे महत्व देखील कळेल, असे आपल्याला आनंदनाथ महाराज सांगतात. स्वामी आपली गुरुमाऊली, कृपेची सावली आहेत, ते आपल्याला संकटातून तारून नेतात, आपल्या मदतीला धावून येतात. आनंदनाथ महाराज सांगतात की तात्काळ अक्कलकोटला जा, प्रसंग सुखाचा असला तरी, दुःखाचा असला तरीही. ती योगीराज माऊली आपल्या भक्तांची वाट पाहतीय.
ती तुमचा उद्धार नक्की करेल. विनाविलंब अक्कलकोट वारी करा आणि जीवनाचे हित करून घ्या, निष्ठेने स्वामी भक्ती, स्वामी सेवा करा. स्वामी आपल्या भक्तांच्या मनोकामना नक्की पूर्ण करतात. स्वामी त्यांच्या भक्तांची कठोर परीक्षा घेतात तसेच त्यांना त्यातून बाहेर निघण्यासाठी मार्गही दाखवतात. स्वामी समर्थ महाराज ही गुरुमाऊली म्हणजे आपल्या कृपेची सावलीच आहे असे आनंदनाथ महाराज आपल्याला सांगतात.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद