अनंत सुखाच्या प्राप्तीसाठी आज गुरुचरित्रातील हा एक अध्याय अवश्य वाचा.

श्री स्वामी समर्थ अनंत चतुर्दशी व्रत, व्रतांमध्ये उत्तम व्रत | अंतनाम विख्यात, बांधावा र क्त पट्टसूत्र हाती |श्रीमदनंत प्रसादे| भाद्रपद शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत आहे. यावेळी अनंत चतुर्दशी 9 सप्टेंबर रोजी आहे. अनंत म्हणजे ज्याला सुरुवात किंवा शेवट माहित नाही. म्हणजेच ते स्वतः श्री हरी आहेत. चातुर्मास हा व्रत-वैकल्ये व सण-उत्सवांचा काळ मानला जातो. श्रावण महिन्यात व्रत-वैकल्यांची रेलचेल असते. भाद्रपद महिन्यात हरितालिका पूजन, गणेश चतुर्थी, राधाष्टमी, परिवर्तिनी एकादशी, वामन द्वादशी साजरी केल्यानंतर भाद्रपद चतुर्थीला अनंताचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आहे.
अनंत चतुर्दशी व्रताचे महत्व – श्री गणेश विसर्जना च्या दिवशी अनंताच्या धाग्याचे पूजन करून परिधान केल्यास गतवैभव, सुख,आनंद, समाधान प्राप्त होऊन मानवी मनातील अहंकाराचा त्याग होतो. पूजा साहित्य – अनंताचा धागा, 2 पाण्याने भरलेले कलश, गहू, 1 दर्भाची काडी, लाल कापड, 2 डिश ( चिपट असलेली )धूप – दीप, गंध, अक्षदा, हळदी – कुंकू, फुल पान, औदूंबर, वड, पिंपळ, आंबा, जांभूळ ( प्रत्येकी 2पान असावेत)
नैवेद्य-14 चूरम्याचे लाडू, वरण-भात,14 वाण्याची भाजी ( 14 प्रकारच्या भाजीपालाची एकत्र भाजी करणे.) मांडणी – अनंत चतुर्दशीच्या दिवशी देवघरात एक चौरंग मांडून त्याचा अवती भोवती रांगोळी काढावी. मग चौरंगावर लाल कापड अंथरावा त्यावर 2 पाण्याने भरलेले कलश ठेवावे, दोन्ही कलशाच्या खाली मूठ भर गहू ठेवावेत. त्यानंतर दोन्ही कलशात वरील 5 प्रकारचे पान एक -एक ठेवावेत. त्या दोन्ही कलशावर 2 डिश ( चिपट ताट असलेली ) ठेवावी.मग लाल कापड डिश वर टाकावे, त्या कापडावर दोन्ही ठिकाणी गायत्री पद्म रांगोळी काढावी. रोंगोळीच्या मध्य भागी अनंताचा धागा ठेवावा व दर्भाची काडी ठेवावी.
पूजा विधी – पूजा मांडणी झाल्यावर पूजेचा समोर नैवेद्य ठेवावा, चर्म्याचा लाडुवर प्रत्येकी एक – एक तुपाची फुलवात पेटवून ठेवावी. मग “गुरुचरित्राचा 43 वां अध्याय वाचावा”, अध्यायात सांगितल्या प्रमाणे पूजचा उल्लेख केला आहे तशा प्रकारे वाचन करता करता पूजन करावे. वाचन करतांना जिथे पुरुष सूक्त म्हटले आहे तेव्हा पुरुष सूक्त पठन करावे. सोबत पंचोपचार पुजा करून घ्यावी. ज्या सेवेकऱ्यांकडे मागील वर्षील अनंताचा धागा असेल त्यांनी तिजोरीतून आधीच काडून ठेवावा. व 43 वां अध्यायात विसर्जन मंत्र म्हटल्यानुसार त्या धागाचे दुसऱ्या दिवशी विसर्जन करावे.
पूजेची सांगता – पूजन झाल्यावर दुसऱ्या दिवशी पूजा मांडणी उचलून घ्यावी. अनंताचा धागा – पूजा मांडणी उचलून घेतल्यावर धागा घरातील करता पुरुषाचा हातात बांधावा. मग 1 दिवस हातात बांधून झाल्यावर दुसऱ्या दिवशी तिजोरीत वर्षभरासाठी ठेवावा. पुढील अनंत चतुर्दशीला तो धागा विसर्जन केला जातो.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news