अंगावर काटा आणणारा एक भयानक अनुभव नक्की वाचा, श्री स्वामी समर्थ

प्र सु तीच्या वेळी महाराजांनी केलेली स्वामी लीला, प्रिय भक्त हो हा अनुभव आहे सौभाग्यवती धनश्री मंगेश कुलकर्णी या स्वामी सेवेकरी ताईंचा ताई सांगतात मी एका अत्यंत गरीब घराण्यातील मुलगी आहे आई-वडील लहानपणीच गेले लहानाचं मोठं आजीने केलं संस्कार दिले कसा वागाव याचं ज्ञान दिल आई-वडिलांच्या प्रेमाची तहान आजीने भागवली आजी माझ सर्वस्व होती आणि आहे वयाच्या विसाव्या वर्षी लग्न झालं यथाशक्ती आजीनेच लग्न करून दिल बाहेरचा ठेवा म्हणून श्री स्वामी समर्थांचा एक फोटो आणि पोथी तिने मला दिली यात तो अमूल्य ठेवा घेऊन मी सासरी आलेलग्नानंतर लगेचच गोड चाहूल लागली आजीने सांगितलं पोथ्या पुराण वाच पारायण कर सर्व चांगलं घडेल मुलांवर चांगले संस्कार होतील म्हणून मी शिवपुराण गणेशपुराण वाचले स्वामींचे आणि गजानन महाराजांची पोथी पारायण केली या
सर्वांचा परिणाम म्हणून की काय मला स्वप्नात दृष्टांत व्हायला लागले आठव्या नवव्या महिन्यात मला स्वप्नात दिसले माझं छोटंसं घर रस्त्यालगत आहे दारात गाय वासरू आहेत एक कुत्र आहे संपूर्ण घरात काळे मुंगळे इतके की सगळे घर मुंगळ्यांनी गच्च भरलेले आहे एक पलंग आणि पलंगावरती मी झोपलेले चार लहान मुलं स्वप्नात दिसत होती. नवल वाटतं की चार लहान मुलं आली कुठून जाग अल्यावर खोप विचार येतात म्हणजे काय कसला अनुभव नव्हता नववा महिना संपत आला होता आई-वडील नाहीत सासू-सासरे जवळ नाहीत तर माझ्याजवळ घरात कोणीच नव्हते एका बुधवारच्या रात्रीपासून अंगावरून पाणी जायला लागले.
उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे त्रास होत असेल असं वाटलंसंपूर्ण गादी ओलीचिंब झाली होती आणि समजत होतं की पोटातील बाळ फिरायचचं थांबलं आहे तरीही काय करावं काय कळत नव्हतं सकाळी उठून कामाला लागले तेवढ्यात माझ्या ओळखीच्या सौभाग्यवती माने घरी आल्या कशी आहेस त्यांनी विचारलं मी बरी आहे एवढं बोलले त्यांनी दरवाजा लावून घेतला आणि त्यांना काय जाणवलं कळले नाही पण सारखं सारखं काय होतय विचारत होत्या
मला काही कळलं नव्हतं मी शेवटी रात्रीची हकीकत सांगितली त्या ताडकन उठल्या माझ्या नंदेकडे गेल्या आणि त्यांना खूप ओरडल्या आणि मला लगेच दवाखान्यात ऍडमिट केले डॉक्टरांनी सांगितले पोटातील पाणी पूर्ण कमी झाले होते आई आणि बाळ या दोघांची खात्री घेता येत नव्हती मुलीची तब्येत फारच नाजूक आहे तिला सर्व झेपेल का सांगता येत नाही मी प्रयत्न करते डॉक्टरांनी बारा हजार रुपये तयार ठेवायला सांगितले आमची आर्थिक परिस्थिती फारच बिकट होतीत्यामुळे मिस्टरांना टेन्शन आले आजींनी स्वामींना प्रार्थना केली दुपारपर्यंत डॉक्टरांनी मला बघितलं पण नाही दुपारनंतर मला तपासले आणि म्हणाल्या सलाईन देऊन उपयोग होतो का ते बघू माझ्या हातात असं काहीच नाही पैसे लगेच भरणार असाल तर सिजर करु माझे सर्व दागिने मी दिले आणि निम्मे पैसे गोळा केले तो गुरुवारचा दिवस होता रात्री साडेअकरा वाजता ऑपरेशन झाले पावणे बारा वाजता माझी मुलगी मला मिळाली
हिचा जन्म 29 मार्च 2001 ला झाला स्वप्नातले काळे मुंगळे म्हणजे संकटाची सावली होती गाय वासरू आणि तीन मुलं ते म्हणजे दत्तगुरु माझ्यामागे होते आणि चौथा बाळ म्हणजे माझी मुलगी गौरी जिची त्यात त्रिमूर्तीनी सुखरूप सुटका केली होती स्वप्नाचा अर्थ मुलीच्या जन्मानंतर मला उलगडला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news