अध्यात्मिक

आपल्या जीवनात सकारात्मक बदल होण्यापूर्वी, देव देतात हे 3 शुभ संकेत.

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो,आपण बघतो की आज कालच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये माणसाला स्वतःलाही आणि घरच्यांच्या स्वास्थ्याला देखील सांभाळून पैशांची कमाई करणं मोठं जिकिरीचे काम होऊन बसले आहे. उद्योग, व्यवसायांमध्ये आतोनात स्पर्धा वाढताच आहेत.

नोकरीमध्ये सुद्धा प्रतिस्पर्धी वाढत आहेत. दुकान थाटलं जातं परंतु गिऱ्हाईकांच्या वेगवेगळ्या मागण्या वाढतात. भांडवलाची कमतरता असल्यामुळे गिऱ्हाईक सुद्धा फारसं होत नाही. अशा एक ना अनेक समस्या आपल्यापुढे दत्त म्हणून उभ्याच असतात.

तरीही आपण एक चांगली अपेक्षा उराशी घेऊन रोजच हसत हसत या परिस्थितीला सामोरे जात असतो. अशातच आपल्या मनात वारंवार आपल्या आर्थिक परिस्थिती बद्दल निरनिराळे विचार येत असतात. त्यातला एखादा विचार अगदीच आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा ठरत असतो.

आपल्याला असं वाटतं की त्यानंतर जसे काही आपलं आयुष्यच आश्चर्य जनक रितीने बदलणार असते. आपल्या घरात असणारे दारिद्र्य नाहीसे होऊन आपण करत असलेल्या व्यवसायामधून, नोकरीतून किंवा नशिब आजमावून बघतो.

जसे की एखादं लॉटरीचं तिकीट विकत घेतो वेगवेगळ्या पर्यायातून आपली काही न काही धडपड सुरूच असते. कधी कधी मोठा सावकर, किंवा धनाढ्य बनण्याची चाहूल आपल्याला लागत असते.

तसेच व्यवसायातून मिळणारे उत्पन्न किंवा नोकरीतून मिळणारा भरघोस पगार यामुळे आपली चांगलीच घडी बसणार असते. आपल्याला भरभराटी, ऐश्वर्य लाभणार असतं. आणि मित्रांनो आपल्याला हे जेव्हा वाटतं किंवा घडणार असतं त्यावेळी भगवंतच आपल्याला पूर्वीच काही शुभ संकेत देत असतात. आपल्याला फक्त ते उमगत नाही.

पहिला संकेत मित्रांनो, आपणास आपल्या स्वप्नांमध्ये कोणत्याही देवाचे दर्शन जर झाले तर, स्वप्नात देव येणे हा अतिशय शुभ अस संकेत असतो. अशी मान्यता आहे की ज्या कुणाच्या स्वप्नात देव येत असतो ती व्यक्ती सात्विक विचारांची आहे आहे असे समजावे.

पवित्र आणि शुद्ध विचारांची आहे कसे जाणून घ्यावे. आणि देव स्वप्नात येणे म्हणजेच आपल्या येणाऱ्या पुढच्या आयुष्यात आपले कल्याण होण्याचे संकेत आपल्याला त्यातून मिळत असतात.

दुसरा संकेत मित्रांनो, जर आपण रात्री झोपल्यानंतर पहाटेच्या सुमारास तिन वाजेनंतर आपल्याला अचानक जाग जर येत असेल तर, आणि आपल्या कामाच्याबद्दल किंवा आपल्या व्यवसायाच्या बद्दल मनात विचार येत असतील, आणि त्याच वेळेला जर तुमची श्रद्धा असलेल्या देवाचं नाव तुम्ही घेतलं.

आवडत्या देवाचं जर स्मरण तुम्हाला झालं तर, असं म्हणतात की पहाटेच्या वेळी देव-देवतांच्या शक्ती ह्या जागृत होत असतात आणि याच वेळी जर कधी आपली ही शक्ती जागृत झाली तर आपल्या विचारांना चांगली गती प्राप्त होण्याचे ते संकेत आहेत हे समजून घ्यावे.

संकेत तिसरा जर तुम्ही झोपला आहात व तुम्हाला स्वप्न पडलं आहे की समोर मोठ मोठ्या पर्वतांच्या रांगा दिसतायेत. तसेच पर्वतापासून थोड्याच अंतरावर आपल्याला मोठा पाण्याचा झरा किंवा पाण्याचा एखादा प्रचंड स्त्रोत जर दिसला तर, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाणी पित आहात असे तुम्हाला जर दिसले तर असे समजावे की आपली आता प्रगती होणार आहे.

मित्रांनो, ज्या देवावर आपली अतुट श्रद्धा आहे, तेच दैवत आपल्याला असे शुभ संकेत देत असतात. म्हणून या प्रकारातील पडलेली स्वप्नं आपण कुणालाही सांगयची नसतात.

कारण ही स्वप्नं आपल्याला भविष्यात होणाऱ्या लाभांचे संकेत देत असतात. परंतु या अशा स्वप्नांबद्दल दुसऱ्या कुणाजवळ बोल्याने आपल्या स्वप्नाचा योग्य तो लाभ आपल्याला होणार नाही. म्हणून असे स्वप्नं कुणालाही सांगण्याचे आपण टाळावे.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना ही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button