अरे बघतोस काय, श्री स्वामी समर्थ लिही, तुझे सर्व दुःख नाहीसे होतील.

मित्रांनो, आज आपण सौ नंदाताई राहणार रावेर यांना आलेली स्वामींची प्रचिती पाहणार आहोत तेही त्यांच्या शब्दांमध्ये. आपल्यापैकी बरेच जण स्वामींचे सेवेकरी आहेत. आपण स्वामींचे अनेक मंत्रजप करीत असतो. अगदी मनोभावे पूजा, प्रार्थना करीत असतात. स्वामींचे अनेक चमत्कार अनेक भक्तांनी अनुभवलेले आहेत. तर मित्रांनो आज आपण स्वामींच्या एका भक्ताला स्वामींचा आलेला अनुभव पाहणार आहोत. मी नंदा ललित जंगले. मला नुकतीच स्वामी महाराजांची ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ याची प्रचिती आली मी स्वामी सेवेमधील अतिशय सामान्य सेवेकरी आहे. स्वामी महाराजांची सेवा मी मला जमेल तशी करायची.
माझे श्री स्वामी चरित्र सारामृत दिनांक 6/1/2022 गुरुवार रोजी 21 अध्यायचे वाचन जप व त्या दिवशीच्या इतर सेवा करत साडेअकरा वाजता पूर्ण झाले. आणि त्यानंतर मी आरामासाठी खोलीत गेले अंग टाकलेच असेल तर मला एका अनामिक ऊर्जेने प्रेरित केले की, ‘उठ आज गुरुवार आहे, तू काही दुसरे विशेष सेवा करत नाही तर निदान आज संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण तरी कर’ आणि त्या ऊर्जेने मी पटकन उठून बसले. माझ्या उजव्या गुडघ्याला मार लागल्याने मला उठ बस करताना त्रास होतो. स्वामी सेवा मार्गातील काही मासिके माझ्याकडे होती.
आणि नेमके गुरुचरित्राची पोथी माझ्या हाती आली. मी वाचन सुरू केले तेव्हा वेळ 11:40/45 झाली होती. मनात विचार आला की माझे वाचन बारापर्यंत वेळेत पूर्ण होईल का? पण असा विचार करून मी भारावल्यासारखे वाचन सुरू ठेवले. स्वामींनी बाराच्या आत माझ्याकडून सात अध्याया चे वाचन करून घेतले. कसे आणि काय हे मला माहीत नाही. मात्र त्यानंतर घडलेला प्रसंग मी जिवंत असे पर्यंत कधीच विसरणार नाही. स्वामी महाराजांनी माझे सौभाग्याचे दान माझ्या पदरात किती अलगद टाकले, हे विसरणं कधी शक्य नाही.
रात्री जेवण उरकून साडेआठ वाजता मी स्वयंपाकघरात आवराआवर करत होते. माझे पती शतपावलीसाठी गच्चीवर जाण्यास निघाले. पण थोडा वेळ मुलीशी गप्पा केल्या आणि तिच्या अभ्यासाची विचारपूस केली. सवयी प्रमाणे ते गच्चीवर गेले मोबाईल वर त्यांनी हनुमान चाली सा पाठ लावला आणि ते शतपावली करायला लागले.
साधारण दोन-तीन मिनिट झाले असतील आणि पाचव्या मिनिटाला कसे काय माहीत नाही पण माझे पती अचानक गच्चीवरून खाली असलेल्या गेटवर आणि त्यानंतर खाली रोडवर जोरात आपटले गेले. साधारण चौदा पंधरा फूट उंचीवरून आलेला आवाज इतका भयानक होता की, मी आणि माझ्या सासूबाई हातातील सगळी कामे सोडून बाहेर पळत निघालो.
माझे पती रोडवर निपचित पडलेले, काही हालचाल होत नव्हती. मात्र त्यांच्या हातात मोबाईल वर त्यांनी लावलेला हनुमानचालीसा पाठ सुरु होता, हे विशेष. शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना मी पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथून त्यांना रात्रीत साडेअकरा वाजता जळगावला सिटी स्कॅन करण्यासाठी नेले. पूर्ण रस्ता मी त्यांच्या नाडीवर श्री स्वामी समर्थ याचा जप सुरू ठेवला.
घरी सासूबाईंचा देखील अखंड जप सुरू होताच. सिटी स्कॅन केले रिपोर्ट पाहून मात्र सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण जिथे मी सिटी स्कॅन केले आणि ज्या डॉक्टर मंडळींना मी रिपोर्ट पाठवले, ते सर्व बोलले की जर हे रिपोर्टच्या माणसाचे आहे आणि तो माणूस थोडा फार बोलतोय, म्हणजे हा च*मत्कारच आहे. याला दुसरे जीवन भेटले आहे.
आम्ही शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता आमच्या गावी रावेर येथे परत आलो. सकाळी 11 वाजता हॉस्पिटलला ॲडमिट केलं. डॉक्टरांचं म्हणणं होतं की रिपोर्ट नॉर्मल आहेत. तुम्ही आता घरी नेले तरी चालेल, पण तरीही आम्ही ॲडमिट करून घेतले.
त्याच रात्री स्वप्नात पांढरे शुभ्र कपडे घातलेले गृहस्थ आले आणि मला बोलले,’का ग? आली का माझी प्रचिती’ हे गृहस्थ दुसरे तिसरे कोणी नसून श्री स्वामी समर्थ महाराज होते. पण माझ्या पतीने हाक मारल्यामुळे मला जाग आली. आता त्यांची खूप फास्ट रिकवरी होत आहे.
पण डॉक्टरांनी थोडा आराम करायला सांगितले. कारण उजव्या बाजूला थोडा मुक्कामार, उजवा खांदा डिस्कोलेट झाला आहे आणि डाव्या पायाच्या बोटाला तीन टाके आहेत. डॉक्टरांच्या मते इतक्या वरून पडल्यावर हे त्यांना जे लागल आहे ते खूपच कमी म्हणजेच नाहीच्या बरोबर आहे.
स्वामी महाराज आपल्या भक्तांना कधी संकटात एकटे सोडत नाहीत. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा, हरला नाही तर सांगा… अजून एक शब्द आहे… स्वामी, आर्ततेने बोलून बघा आणि मनासारखं नाही झालं तर सांगा मला!
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news