चांगली वेळ येण्यापूर्वी शनीदेव देतात हे संकेत! वाचा सविस्तर

मित्रांनो, आपल्यापैकी सर्वचजण अनेक देवी देवतांची पूजा, अर्चना अगदी मनोभावे व श्रद्धेने करीत असतात. त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी अनेक सेवा प्रत्येक जण करीत असतो. आपल्या जीवनातील अडीअडचणी दूर व्हाव्यात तसेच आपल्या घरामध्ये वादविवाद असू नये. आपले घर कायम प्रसन्न राहण्यासाठी आपण प्रार्थना देखील करीत असतो.
मित्रांनो अनेक जण हे शनिदेवांचा उपवास करतात. शनि देवांवर अनेकांचा खूपच विश्वास आहे. शनिवारच्या दिवशी जर तुम्हाला यापैकी कशाचेही दर्शन झाले तर शनिदेव तुमच्यावर प्रसन्न झालेत असं समजा. तुमचा लवकरात शनी देवाच्या कृपेने चांगला काळ सुरू होणार आहे असा त्याचा अर्थ होतो. पण कशाच दर्शन झाल्यावर हे आपण चला जाणून घेऊया.
शनि देवांना सूर्यपुत्र आणि कर्मफल दाता म्हटलं जात. त्याचबरोबर शनी संबंधित अनेक मान्यता दिली आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल भाविकांच्या मनामध्ये थोडीशी भीती सुद्धा असते. पण शनिमहाराज हे आपल्या कर्माचे फळ आपल्याला देत असतात. आपली कर्म वाईट असतील तर निश्चितच आपल्याला वाईट फळ मिळेल.
चांगली कर्म करावी म्हणजे शनि महाराज आपल्याला त्याचे चांगलेच फळ देतील. शनिदेव प्रकृतीमध्ये संतुलन निर्माण करतात. प्रत्येक प्राण्याबरोबर योग्य तो न्याय करतात. जे लोक अनुचित गोष्टी करतात अनैतिक गोष्टी करतात त्यांना शनिमहाराज शिक्षा करतात. शनि महराजाना जुगार खेळणं, सट्टेबाजी करण, दारू पिणे या गोष्टी अजिबात आवडत नाहीत. शनि महाराजांना स्त्रीकडे वाईट नजरेने बघितलेले ही आवडत नाही. खोट बोलण निर्दोष लोकांना त्रास देण, माता-पित्याचा अपमान करणं, कर्मचारी यांचा अपमान करणं शनि देवाच्या विरुद्ध जाण मुक्या प्राण्यांचे हाल करणं, त्यांना त्रास देण या सर्व गोष्टी शनिदेवांना अजिबात आवडत नाहीत.
शनिदेव अत्यंत न्यायप्रिय आहेत. जी लोक इमानदार असतात त्यांचीच साथ शनि महाराज देत राहतात आणि त्यांना चांगले फळ देखील ते देतात. म्हणूनच शनि महाराजांना पृथ्वीचे न्यायाधीश असे म्हणतात त्यांना कोणावरही अन्याय झालेला बघवत नाही.
मित्रांनो शनि महाराज हे न्यायप्रिय आहेत आणि याच कारणामुळे बरेचसे लोक त्यांना घाबरतात देखील. कारण कदाचित त्यांच्या हातून एखादी चूक घडली तर शनी महाराज त्यांना शिक्षा देतील. ते नाराज होतील. पण मित्रांनो जर तुम्ही सच्चाई आणि इमानदारीने कोणतेही काम केले, कोणावरही अन्याय न करता तुम्ही जर तुमचे कार्य करत राहिलात तर शनी महाराज तुमच्यावर कायमच प्रसन्न राहतील.
जर तुम्हाला शनिवारच्या दिवशी यापैकी एकही गोष्ट दिसली तर समजून जा की शनिदेव तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि तुमच्या समस्यांचा अंत आता होणार आहे. आता मी तुम्हाला काही संकेत सांगणार आहे हे संकेत जर तुम्हाला तुमच्या जीवनात घडत असतील तर तुम्ही शनि महाराजांची पूजा संध्याकाळच्या वेळी शनी मंदिरात जाऊन करायची आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात खूपच शुभदायी घटना घडतील. तसेच सर्व अडचणी पासून तुमची सुटका होणार आहे. तर मित्रांनो त्यामध्ये सगळ्यात पहिला संकेत म्हणजे भिकारी. शनिवारी सकाळी कोणी तुमच्या दारामध्ये एखादी व्यक्ती तुमच्याकडे काही मागायला आली तर ते अत्यंत शुभ लक्षण आहे
तुम्ही त्या व्यक्तीला मदत केली पाहिजे. त्यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि त्याच बरोबर शनिवारी सकाळी सकाळी जर तुम्हाला सफाई कर्मचारी झाडू मारताना किंवा साफसफाई करताना दिसले तर हा सुद्धा एक चांगला संकेत आहे.
तुम्ही त्यांना काही पैसे नक्की द्या. तुमच्या धनामध्ये सुद्धा वृद्धी होईल आणि जर काळा कुत्रा शनिवारी जर तुम्हाला काळा कुत्रा दिसला तर हे नक्कीच शुभ मानले जातात. त्या काळात कुत्र्याला भाकरी किंवा पोळी आवश्यक खायला दया. त्यामुळे शनी महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊन आपल्याला भरपूर धनलाभ होऊ शकतो. शनिवारच्या दिवशी अंगणात कावळा दिसला आणि पाणी पिताना दिसला तर मात्र हे खूपच शुभ मानले जाते. लवकरच तुम्हाला शुभ समाचार मिळणार आहे. असा त्याचा अर्थ होतो.
पण जर शनिवारी कावळा तुमच्या डोक्यावर येऊन चोच मारत असेल तर मात्र हा अशुभ संकेत आहे. त्यामुळे नक्की तुमच्या कडून काहीतरी चूक झाली आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणूनच तुम्ही अशा वेळी शनी मंदिरात जाऊन देवाची क्षमा मागावी. जर तुम्ही शनिवारच्या दिवशी कोणत्याही महत्त्वपूर्ण कामासाठी जात असाल आणि तुम्हाला रस्त्यात काळ्या गाईचे दर्शन झाले तर हा सुद्धा अतिशय शुभ संकेत आहे आणि तुमची कार्यपूर्ती नक्कीच होणार आहे असा त्याचा अर्थ होतो. असही मानल जात की, शनिवारी दारावर काळ्या गाईचे येणे सुद्धा शुभसंकेत आहेत. शनिवारी काळ्या गाईची पूजा सुद्धा नक्की करा. त्यामुळे तुमची इच्छा पूर्ती नक्कीच होईल.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकार ले. ल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं ध श्र द्धे चा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद