देवघरात गरुड घंटीला इतके महत्त्व का.? 90% टक्के लोकांना याबद्दल माहिती नाही..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे… आपल्या घरातलं देवघर असेल किंवा भव्य मंदिर, पूजेच्या वेळी मंदिरात घंटा तर आपल्या देवघरात आपण घंटी वाजवतो. (Garud Ghanti In Deoghar) पूजेच्या वेळी घंटीला विशेष महत्व आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावरही घंटी आवर्जून वाजवतात. घंटी वाजवल्याशिवाय पूजा अपूर्ण असते अशी मान्यता आहे. मंदिरात घंटा वाजवण्याला धार्मिक महत्त्व आहे.
याशिवाय हे वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झाले आहे की घंटा वाजवल्याने वातावरणात सकारात्मकता येते. याशिवाय मंदिरातील घंटा किंवा देवघरात घंटी वाजवणाऱ्या बहुतांश लोकांना घंटीवर कुठल्या देवतेचे चित्र आहे आणि त्यामागे काय कारण आहे ते माहिती नाही.
गरूड घंटीदेवघरात (Garud Ghanti In Deoghar) आपण जी घंटी वाजवतो त्याला गरूड घंटी म्हटले जाते. घंटीवर गरूड देवतेचं चित्र काढलेलं असतं. पूजेच्या वेळी गरूड घंटी वाजवणं फार शुभ मानलं जातं. घंटीच्या आवाजाने आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. यासोबतच गरुड घंटी वाजवल्याने भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे.
हिंदू धर्मात गरुड देवाला भगवान विष्णूचे वाहन मानले गेले आहे. त्यामुळे घंटीवर त्यांचे चित्र काढण्यात आले आहे जेणेकरून ते भक्तांच्या सर्व इच्छा विष्णूदेवापर्यंत पोहोचवले आणि ते भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. अशी मान्यता आहे की गरुड घंटा (Garud Ghanti In Deoghar) वाजवल्याने माणसाला मोक्ष प्राप्त होतो.
गरुड घंटीतून हा नाद निघतोहिंदू धर्मानुसार, ज्या आवाजाने विश्वाची निर्मिती झाली, तोच ध्वनी गरुड घंटीतून निघतो. म्हणूनच गरुड घंटीतून निघणारा हा आवाज विशेष मानला जातो.
त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या प्रवेशद्वारावर घंटा टांगलेली असते, भाविक मंदिरात प्रवेश करताच घंटा वाजवतात. त्यामुळे वातावरणात (Garud Ghanti In Deoghar) सकारात्मकता येते. आरतीमध्येही घंटा किंवा घंटी नक्कीच वाजवली जाते.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद