दीप अमावास्या जवळ येतेय, तिला “गटारी” म्हणून अपमान करू नका, वेळ काढून नक्कीच वाचा..

श्रावण मासात विविध सण उत्सवांची रेलचेल असल्यामुळे सबंध महिनाभर अनेक जण मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य करतात. सणाचे पावित्र्य राखावे, यासाठी धर्मशास्त्राने मानवी मनावर घातलेले हे बंधन आहेदिनदर्शिकेचे जुलै महिन्याचे पान उलटताच ऑगस्ट महिन्यात केशरी रंगाने भरलेल्या रकान्यांचे दर्शन घडले, की मनाला उभारी येते. कारण सर्व महिन्यांचा राजा श्रावण याच्या आगमनाचे, व्रत वैकल्याचे, आनंद- उत्सवाचे ते चिन्ह असते.
दिवा मांगल्याचे प्रतीक आहे. दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. या दिवशी घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुऊन स्वच्छ करावेत. पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत. पाटाभोवती सुरेख रांगोळी काढावी. फुलांची आरास करावी. सर्व दिवे प्रज्वलित करावेतहळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी.
आघाडा, दूर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पुजा करावी
कणकेचे उकडीचे गोड दिवे बनवून नैवेद्य दाखवावा.
या मंत्राने दिव्याची प्रार्थना करावी. दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम । गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥
अर्थात ‘हे दीप, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण करघरातील इडापिडा टाळू न, अज्ञान, रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हेच आपली संस्कृती सांगते.
अशा या श्रावण मासाच्या पूर्वसंध्येची सुंदर ओळख आपल्या संस्कृतीने करून दिली आहे, ती म्हणजे ‘दीप अमावस्या.’ तिलाच आपण दिव्यांची आवस असेही म्हणतो. मात्र काही समाजकंटंकांनी तिला `गटारी’ अशी ओळख देऊन संस्कृतीला बट्टा लावला आहे.
श्रावण मासात विविध सण उत्सवांची रेलचेल असल्या मुळे सबंध महिनाभर अनेक जण मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य करतात. सणाचे पावित्र्य राखावे, यासाठी धर्मशास्त्राने मानवी मनावर घातलेले हे बंधन आहे. परंतु, याचा अर्थ असा नाही, की महिनाभर जे खायचं – प्यायचं नाही, ते महिना सुरू व्हायच्या आदल्या दिवशी चापून घ्यायचं!
डॉक्टर जेव्हा पथ्य म्हणून दिवसातून एकवेळ जेवा असे सांगतात, त्याचा अर्थ असतो आहारावर नियंत्रण आणा. मात्र आपण आपल्या सोयीने दोन्ही वेळचे जेवण एकाच वेळी ताटात वाढून घेणार असू, तर त्या पथ्याचा उपयोग तरी काय? हाच नियम धर्मसंस्कृतीने मानवी मनावर घालण्यासाठी निदान महिनाभरासाठी शाकाहार करा असे सुचवले आहे.
घरातल्या गृहिणींमुळे तरी शाकाहाराचे व्रत पाळले जाते, परंतु मद्यपींना पिण्यासाठी कोणतेही निमित्त चालते. ते आनंद झाला म्हणून पितात, दु:खं झाले म्हणूनही पितात. अशात एक महिनाभर व्रतस्थ राहायचे, म्हणजे महिन्याभराचा कोटा पूर्ण करण्याचे आयते निमित्त चालून आल्यासारखे आहे. अशा मूठभर लोकांनी आषाढ अमावस्येला ‘गटारी’ घोषित करून शब्दश: गटारात लोळण्याचा जणू परवानाच मिळवला आहे.
मात्र, हे असे वागणे म्हणजे आपणच हाती राखून आपल्या संस्कृतीचे वाभाडे काढण्यासारखे आहे. आपली संस्कृती आपल्याला आयुष्याच्या उत्कर्षाचे धडे देते. आषाढ अमावस्येला चंद्राची अनुपस्थिती असली म्हणून काय झाले? श्रावण मासाच्या स्वागतासाठी शेकडो दिव्यांचा प्रकाश ती उणीव पूर्ण करेल अशी खात्री देते. हा आपल्या आयुष्यासाठी केवढा मोठा गूढ संदेश आहे, की जेव्हा आपल्याही आयुष्यात काळोखाचे साम्राज्य पसरते, तेव्हा उदास न होता पणतीच्या ज्योतीने का होईना तो दिवस साजरा करावा, तरच आपल्याही आयुष्यात श्रावण नक्कीच येईल.
अशा उदात्त विचारांनी युक्त असलेल्या आपल्या संस्कृतीला गालबोट लागणार नाही, याची खबरदारी घेणे, ही आपली जबाबदारी आहे. म्हणून उद्या कोणी तुम्हाला विचारले की, ‘ यंदा गटारीला काय विशेष?’ तर त्यांना खडसावून सांगा, ‘त्या दिवशी दिव्यांची आवस आहे, गटारी नव्हे!’ या दिवशी घरातले दिवे उजळून त्याची पूजा करायची असते तसेच दिव्याचे तेज आपल्या कुलदी पकाला म्हणजेच मुलांना लाभावे म्हणून दिव्याने ओवाळले जाते.
अशा रीतीने आपण आपल्या धर्माची, परंपरांची, नीती मूल्यांची जपणूक करणे गरजेचे आहे. आज आपण जे वागणार आहोत, त्याचे अनुकरण उद्याची पिढी करणार आहे. त्यांच्यासमोर योग्य तोच आदर्श ठेवला पाहिजे. शेवटी म्हणतात ना, ‘धर्मो रक्षति रक्षित:’ अर्थात जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे रक्षण धर्म करतो चला तर, आपणही धर्मरक्षक बनुया.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news