दिप अमावस्येला गुपचूप मातीच्या भांड्यामध्ये या 2 वस्तु ठेवा, मोजून थकाल एवढा पैसा येईल.

आज आम्ही तुम्हाला पैसा, सुख, संपत्ती यासाठी म्हणजे पैशाचा ओघ सतत वाढावा. यासाठी अगदी घरगुती साध्या साहित्यापासून भन्नाट असा उपाय सांगणार आहे. तो केल्याने लक्ष्मी तुमच्याकडे सतत आकर्षित होईल. शिवाय घरातील वास्तु मधील काही दोष असतील ते देखील दूर होतील. जे तुमच्या प्रगतीच्या आड येत आहेत. तुम्हाला ज्या पण पैशासंबंधी अडचणी येत आहेत त्या सर्व या उपायाने दूर होणार.
पैसा कमावताय टिकत नाही, खर्च होतो आहे. कर्जाच्या रकमा वाढत चालल्या आहेत. ज्या काही तुमच्या पैशाच्या समस्या आहेत त्या दूर होतील. आता तुम्ही विचाराल हे व्यवसायात, दुकानात, ऑफिस मध्ये ठेवायचे का? तर नाही. हा उपाय घरीच करण्यासाठी आहे. हा उपाय सर्वांसाठी पण घरातच करण्याचा आहे. आता यासाठी काय लागणार आहे तर बाजारात जे सुगड (कुल्लड) मिळतात म्हणजे जे संक्रांती मध्ये आपण पुजतो.
म्हणजे जे मातीचे छोटेसे बोळके असतात अगदी छोट्या आकाराचा माठा सारखे दिसणारे ते आपल्याला घ्यायचे आहेत. फार दूरचा दिवस नाही अमावस्याच्या दिवशी 28 तारखेला हा उपाय तुम्ही करायचा आहे. त्यादिवशी गुरूपुष्यामृत योग आहे. त्या दिवशी हा कुल्लड तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे. सकाळी, दुपारी जेव्हा जमेल तेव्हा. त्यानंतर तो धुऊन पालथा घाला जेणेकरून आपल्या मनाची शुद्धी होईल. त्यानंतर तो पुसला, सुकला की त्यामध्ये सगळ्यात खाली थर घालायचा कापुराचा.
कापूर हा भीमसेनीच आणा. त्यानंतर एक एक रुपयाची अकरा नाणी घाला. हा स्वतः गुरुआचर्यांचा उपाय आहे. यावर साल एकच हवं. आता 2022 ची असतील तर सगळी 2020 ची नाणी हवी. म्हणूनच हा उपाय मी अगोदर सांगत आहे. जमवाजमवी करायची आहे. सर्वात आधी कापूर त्यानंतर एक रुपयाची ती नाणी त्यावर पिवळ्या मोहरीचे दहा बारा दाणे आणि त्याच्यावर पुन्हा कापूर. एवढे साहित्य तुम्हाला लागणार आहे.
झाकण न घालता कोणालाही दिसणार नाही भिंतीला वर असेल तरी चालेल. काहीतरी idea अशी करा जेणेकरून बाजूने फुल लावू शकता. कोणी त्याला हातही लावणार नाही, कोणी बघणार नाही. अशा ठिकाणी ठेवायचे आहे. हे कधीपर्यंत ठेवायचे तर जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत पैसा हवा. माणसं जशी हवी तसा पैसा हवा.
त्यामुळे जोपर्यंत आपल्याला आपल्या घरात पैशाचा ओघ जोपर्यंत चालू रहावा असे वाटते तोपर्यंत ठेवायचे आहे. अधून मधून अमवस्येला चेक करा. कापूर जर उडून गेला असेल तर नवीन कापूर घाला. बाकी 1 रुपयाची नाणी तीच वापरा. मोहरी दुसरी वापरा. झाडाखाली टाकून द्या. दुसरी मोहरी टाका. सोपा उपाय आहे. फक्त दिशा लक्षात ठेवा. ईस्ट दिशेला ठेवा. इस्टच्या मध्यातच तुम्हाला हे ठेवायचे आहे.
कुठल्याही कोपऱ्यात जाऊन द्यायचे नाही. भलेही भिंतीला असू दे असाच हा उपाय आहे. त्याला अशी काही सजावट करा की ते कोणाला दिसणार नाही. कोणी नाही विचारलं पाहिजे की काय आहे. अस नाही की ही आयडिया तुम्हाला लपवून करायची आहे. तुमच्या घरात तुम्ही करायचा आहे. येणाऱ्या जाणाऱ्याला कळून देऊ नका. पैसा चुंबकासारखा खेचला जाईल. लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल.
आता आपण हे बघूयात या उपायचा विधी कसा आहे – अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. घरातील देवघरासमोर बसायचे आहे. पुजा अर्चा करायची आहे या कुल्लडची, या पैशाची. पाच उदबत्ती, पाच कापूर लावायचे आहेत. आपल्या कुलदेवीच्या किंवा किंवा लक्ष्मी मातेच्या चरणाशी कुल्लड ठेवून व्यवस्थित याची रीतसर, पंचोपचार पूजा करायची आहे. त्यानंतर पूजा झाल्यावर त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी हे उचलून मी सांगितलं आहे.
त्या ठिकाणी ठेवायचे आहे. याची व्यवस्थित पूजा अर्चा करायची आहे. पुजा अर्चा म्हणजे काय? तर प्रथम त्या कुल्लडला हळदी कुंकू लावा. अगरबत्ती दाखवा. फुल वाहा. मनोभावे प्रार्थना करा. हे लक्ष्मी माते माझ्या घरी निरंतर वास कर. त्यानंतर मी सांगितलेल्या ठिकाणी करा. घरातील स्त्रीने हा उपाय करा, पुरुषांनी करा, मुलांनी करा. कोणीही करा. फक्त मनोभावे, श्रद्धेने, निष्ठेने करा. अतिशय छोटासा उपाय होता. तितकाच प्रभावी आहे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news