दोन सेकंद वेळ असेल तर वाक्य पूर्ण करा श्री स्वामी…!!

!! श्री स्वामी समर्थ नमः !!
अनेक भक्तांना नामस्मरण, पूजा व जप करताना किंवा स्तोत्र म्हणताना, अनेकवेळा मनात खूप विचार किंवा वाईट विचार येत असतात. अडथळे होत असतात. तसेच, आपण आपल्या विचारांवर ताबा ठेवू शकत नाही.असे का होत असते यांचे प्रश्न सर्वांनाच पडत असते.
आपल्यातील अशा बऱ्याच व्यक्तीबरोबर असे घडत असते व या समस्येशी निगडित असलेल्या सर्व स्वामी भक्तासाठी, श्री स्वामी समर्थ महाराजांनी, एका स्वामी भक्ताला, या समस्या व अडचणीवर, उत्तर पटवून देण्यासाठी एक उदाहरण दिले.
ते पुढीलप्रमाणे:- स्वामी समर्थ यांच्याजवळ एक स्वामी भक्त येतो व स्वामींना म्हणतो की स्वामी समर्थ महाराज ‘ज्यावेळी प्राथर्ना, जप, नामस्मरण करतो तेव्हा माझ्या मनात फार वेगवेगळे वाईट विचार येत असतात. त्यां विचारावर मी ताबा ठेवू शकत नाही. असे का होतेय.
आपल्याला माहीतच आहे की श्री स्वामी समर्थ हे अंतर्ज्ञानी आहेत. या प्रश्नाचे उत्तर स्वामी समर्थ महाराज सांगतात आणि भक्ताला विचारतात की तुझे दोन घर आहेत ना? भक्त म्हणतो, हो एका घरात मी राहतो आणि दुसरे घर भाड्याने दिले आहे.
मग स्वामी विचारतात, भक्ताला, जर तू घर दिलेल्या भाडेकरुला सांगितलेस की आजच्या आज घर खाली कर, तर ती व्यक्ती ताबडतोब घर खाली करू शकेल का? ती व्यक्ती ताबडतोब घर खाली करू शकणार नाही.ह्या गोष्टीला तो विरोध करेल, आरडाओरड करेल जेवढे प्रयत्न करता येतील, तेवढे करेल व घर न खाली करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत राहणार.
त्याचप्रमाणे देवपूजा, नामस्मरण, जप करत असताना आपल्या मनात वाईट विचाराचे घर सहजासहजी रिकामे होणार नाही… आणि चांगले कार्य करत असताना अडथळे अशाप्रकारे निर्माण होत राहणार. अशा शब्दात स्वामी समर्थ महाराजांनी त्या भक्ताला समजावून सांगितले.
याप्रकारेच, आपण देवाचे नामस्मरण, पूजापाठ, जप करत असतो. आणि आपले मन स्थिर राहत नाही व मनामध्ये वेगवेगळे वाईट विचार येत राहतात. आपल्याला देखील असेच मनात वाईट विचार येत असतील तर काही काळजी करू नका.
नामस्मरण करताना आपल्या मनामध्ये कितीही वाईट विचार आले तरी नामस्मरण सदैव करत राहावे. त्यामुळे हळूहळू मनातले नकारात्मक विचार कमी होवून आपल्याला सकारात्मक विचार येण्यास सुरुवात होईल. आणि वाईट
विचारापासून सुटका होईल.
नामस्मरण, जप हा सोपा मार्ग जेणेकरून आपले वाईट विचार काढून टाकण्यास मदत होते व मन एकाग्र होते.
!! जय जय श्री स्वामी समर्थ !!
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news