गरुड पुराणमधील हे उपाय केल्यास बदलेल नशीब!

मित्रांनो प्रत्येकालाच आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये तसेच आपली प्रगती व्हावी असे वाटत असते. त्यासाठी आपण दिवस-रात्र काबाड कष्ट करीतच असतो. तसेच आपण ज्योतिषीय उपाय देखील करीत असतो. परंतु काही उपाय काही वेळेस आपणास फायदेशीर ठरत नाहीत.
तुम्हाला आज मी गरुड पुराणातील अशा काही गोष्टी सांगणार आहे. या गोष्टीमुळे तुमचे नशीब नक्कीच बदलेल. तर नेमक्या या कोणत्या गोष्टी आहेत चला तर जाणून घेऊया. तर गरुड पुराणात या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत या तुम्ही अवश्य करायला हव्यात. यामुळे तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत. तुमचे नशीब तुम्हाला नक्कीच साथ देईल. तसेच तुमची प्रगती देखील होईल.
गरुड पुराणानुसार माणसाने रोज सकाळी उठल्याबरोबर देवाचे दर्शन घ्यायला हवे. जर सकाळी उठल्याबरोबर देवाचे दर्शन घेतले तर त्यांचा दिवस नक्कीच चांगला जातो. तसेच सकाळी घरी जेंव्हा जेंव्हा जेवण बनवता तेंव्हा पहिला घास किंवा पहिली पोळी काढून गाईसाठी ठेवावी.
शेवटची पोळी किंवा घास कुत्र्याला द्यावा. ज्योतिष शास्त्रानुसार यामुळे देवता आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो. जर तुम्ही घरी देवाची पूजा करत असाल तर दररोज स्वतःचे अन्न खाण्यापूर्वी देवाला अन्न अर्पण करा. लक्षात ठेवा की अन्न पूर्णपणे सात्विक असावे. त्यात अंडी, मांस, मासे, लसूण किंवा कांदा नसावा. त्यामुळे घरात आई अन्नपूर्णा वास करते.
तसेच तुम्ही रोज इतरांना खायला घालण्याचा नियम अवश्य पाळा. मग मुंग्यांना दोन दाणे साखर घातली तरी चालेल. तुम्ही कबुतरांना धान्य किंवा गायींना हिरवा चाराही देऊ शकता. असे केल्याने सर्व ग्रहांचा अशुभ प्रभाव संपतो. दररोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसभर देवाचे आभार माना. यासोबतच येणारा उद्याचा दिवसही चांगला जावो ही प्रार्थना.
तर तुम्ही देखील गरुड पुराणात सांगितलेल्या या गोष्टी जर पाळल्या तर यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही संकटांचा सामना करावा लागणार नाही. तसेच तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल. तुम्हाला अडीअडचणी देखील येणार नाहीत. तुमचे नशीब नक्कीच बदलेल.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकार ले. ल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं ध श्र द्धे चा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद