हे ५ संकेत सांगतात समो रची व्यक्ती तुमच्यावर जळते. बघा तुम्हाला पण आला आहे का असा अनुभव.

तुम्हाला असा कधी अनुभव आला आहे का की अचानक तुमच्या जवळची व्यक्ती तुमच्याबरोबर विचित्र वागायला लागली, म्हणजे तुम्हाला अचानक दुर्लक्षित करायला लागली. याचे दोनच अर्थ असू शकतात. एक तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे कींवा ती व्यक्ती तुमचा मस्सर करते. अर्थात तुमच्यावर जळतीये. असेच पाच संकेत आहेत जे तुम्हाला आज आम्ही सांगणार आहोत.
या संकेतांपैकी एक जरी अनुभव तुम्हाला आला असेल तर समजून जा नक्कीच समोरची व्यक्ती तुमच्यावर जळते आहे. तुमची प्रगती तिला बघवत नाही. तुमच चांगल होताना तिला बघवत नाहीये. अशा व्यक्ती पासून सावध राहा. कोणते आहेत संकेत चला जाणून घेऊया.
एखादी अशी व्यक्ती जी तुमची नातेवाईक असेल तुमच्या मित्र-मैत्रिण असेल किंवा तुमच्या परिचयाची असेल. तुमचा कलीगही असू शकतो. अशी एखादी व्यक्ती सातत्याने तुम्हाला पाण्यात बघते. तुम्हाला अशा कधी अनुभव आला आहे का की तुम्ही एकदम उत्साहाने समोरच्याला तुमची चांगली बातमी सांगितली, पण समोरच्याने मात्र नकारात्मक प्रतिक्रिया देऊन ती फेटाळून लावली.
जस तुम्ही तुमच्या मित्राला सांगितल की मला प्रमोशन मिळालय. ज्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट बघत होता. पण तुमचा मित्र तुमची स्तुती करण्याऐवजी तुमचे अभिनंदन करण्याऐवजी तुमच्या मेहनतीचे कौतुक करण्या ऐवजी तुला हे प्रमोशन तुझ्या बॉसमुळे मिळाले अस म्हणतो किंवा तुला हे प्रमोशन मिळायला उशीर झालाय त्यामुळे तुझ नुकसान होतंय अशा प्रतिक्रिया समोरच्याकडून येत असतील तर समजून जा समोरचा तुमचा मत्सर करतोय.
अशा प्रकारच्या व्यक्तींना तुम्ही कितीही चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी ते काही ना काही त्रुटी त्याच्यामध्ये शोधूनच काढणार. त्याने तुम्हाला खजील वाटत. अपराधी वाटत. तुमचा आत्मविश्वास कमी होतो. पण मित्रांनो काळजी करू नका आणि यांच फारसा मनावर घेऊ नका. कारण समोरची व्यक्ती जळते हे तर स्पष्टच आहे. आणि म्हणूनच स्वतःच्या विवेक बुद्धीने काम करा.
दुसऱ्या संकेत म्हणजे तुमचा निर्णय चुकीचा आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे. जळणाऱ्या व्यक्तींना सवय असते की तुमचा निर्णय प्रत्येक वेळी कसा चुकीचा आहे हे सिद्ध करण्याच्या मागे लागलेले असतात. तुमची प्रगती त्यांना पाहवत नाही. त्यांना माहित असत की तुम्ही घेतलेला निर्णय तुमचे प्रगती करू शकतो. आणि म्हणूनच तुम्ही यशस्वी होऊ नये.
यासाठी तुमचा निर्णय कसा चुकीचा आहे हे तुम्हाला सतत सांगत राहतात. आणि तुमच खच्चीकरण करत राहतात. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास जातो तुमच्या निर्णय क्षमतेवर त्याचा परिणाम होतो. तर अशावेळी आपला आत्मविश्वास डगमग हो न देता स्वतःवर विश्वास ठेवा. समोरच्याच्या बोलण्याचा परिणाम स्वतःवर होऊ देऊ नका. तुम्ही घेतलेल्या निर्णय योग्य आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तो अमलात आणा.
तिसरा संकेत म्हणजे तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडल्यावर ते तुम्हाला टाळतात. मित्रांनो तुम्हाला असा कधी अनुभव आलेला आहे का, की तुम्ही तुमच्या मित्राला तुमच्या जवळच्या व्यक्तीला किंवा अगदी आपल्या जवळच्या नातेवाईक सुद्धा असू शकतात. अशा एखाद्या व्यक्तीला तुम्ही आनंदाची बातमी सांगितली पण समोरच्याने काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. ही चांगली बातमी ऐकल्यानंतर तो काही दिवस तुम्हाला टाळतोय. अचानक काहीसा गायब झाला. किंवा तुम्ही समोर आल्यानंतर तो तुमच्याकडे दुर्लक्ष करतोय.
असा जर अनुभव तुम्हाला आला असेल तर याचं कारण आहेस की समोरच्याला तुमच यश पाहवत नाही. आणि अशावेळी तुम्हालाच अस काहीतरी वाटत राहत की आपल काही चुकलंय का आपण काय बोलून गेलो एका त्याला राग आलाय का पण तुमची काहीही चूक नसते. समोरच्या व्यक्तीमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली असते. आणि त्याच्या मनात तुमच्याविषयी मत्सर निर्माण झालेला असतो. आणि म्हणूनच ती व्यक्ती तुम्हाला टाळायचा प्रयत्न करते.
चौथा संकेत म्हणजे ते तुमच्यापेक्षा कसे भारी आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. काय होत की जेव्हा तुम्ही समोरच्याला तुमच्याबद्दल काहीतरी सांगता. समोरचा तीच गोष्ट मसाला लावून मोठी करून सांगतो. की तुम्ही म्हणता माझ्याकडे अमुक अमुक कंपनीचा मोबाईल आहे. तर समोरचा म्हणतो माझ्याकडे त्यापेक्षा भारीतला मोबाईल आहे. किंवा यापेक्षा भारी मोबाईल मी लवकरच घेणार आहे. त्यांच्यामध्ये एक प्रकारची भीती असते. की तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस ठरत आहात का.
त्यांच्या मान्यता काहीतरी वेगळे असतात आणि म्हणूनच त्यांना वाटत असत की तुम्ही त्यांच्या पुढे जाऊ नये. आणि म्हणून ते तुमच खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही केलेल्या गोष्टीत चुका काढतात. सतत अगदी साध्या साध्या गोष्टी असतील घरातल्या त्या जरी तुम्ही केल्या तरी ते सतत तुमच्या चुका काढतात. कारण तुमच्या मध्ये आत्मविश्वास त्यांना येऊ द्यायचा नसतो. तुम्ही मोठे आहात तुम्हाला काही येत नाही हे वारंवार दाखवण्याचा प्रयत्न करतात.
यासाठी ते काय करतात तर तुमच्यात जी कमतरता आहे. तिच्याकडेच ते सतत बोट दाखवतात. पण लक्षात घ्या परिपूर्ण असा कोणीच नसतो. ती व्यक्ती सुद्धा स्वतः परिपूर्ण नसते. पण स्वतःच्या चुका लपवन हे त्या व्यक्तीला चांगल जमत असत. आणि ते कस स्वतःच्या कमतरता लपवण्यासाठी दुसऱ्याच्या कमतरतेवर बोट ठेवणे. त्याचा संकेत आहे की तुम्हाला अपयश आल की त्याला आनंद होतो. समोर ते मात्र तुम्हाला दाखवतील की ते तुमच्या बाबत चिंतेत आहेत.
सहानुभूती बाळगतील अशावेळी अति काळजी सुद्धा दाखवतील. पण जेव्हा कोणी तुम्हाला अति काळजी विनाकारण दाखवली ना तिथेच तुम्ही सावध व्हा. कारण समोरची व्यक्ती तुमच्यावर जळते आहे. तुमचा मत्सर करते आहे. अस वागण हे तिथेच स्पष्ट होत. तर मित्रांनो हे होते ते पाच संकेत. तर तुम्हाला यापैकी कुठलाही एक अनुभव आला असेल तर तुम्ही त्या व्यक्ती पासून लांब रहा. आणि असा अनुभव तुम्हाला आलाय का. आला असेल तर नक्की सांगा.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news