अध्यात्मिक

जगी सर्वसुखी असा कोण आहे? विचारी मना तूच शोधून पाहे…

नमस्कार मित्रांनो.. या आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचं मनापासून स्वागत आहे.. आज आपण श्रीकृष्णाच्या गीतेतल्या काही भागाचं वाचन करणार आहोत. जगात सर्वात सुखी कोण आहे? यावर श्रीकृष्ण अर्जुनाला कोणता उपदेश देतात, ते आपण पाहाणार आहोत. महाभारतात युद्धापूर्वी हताश झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे गीता. हिंदू धर्मात गीतेचं महत्व अनन्य साधारण आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल हे उपदेश आजच्या काळातही माणसाला त्याच्या कर्तव्यांची माहिती करून देतं.

आपल्याच नातेवाईकांविरोधात युद्ध करण्यापूर्वी अर्जुनाचे हातपाय गळले होते. मी माझ्याच नातलगांविरोधात युद्ध कसं करू शकतो असा प्रश्न त्याला पडला होता. (Geeta Updesh Krishna Arjun Sanvaad) त्या सर्व प्रश्नांची उत्तरं गीतेच्या माध्यमातून श्रीकृष्ण अर्जुनाला देतो.

जगात सर्वात सुखी कोण आहे? श्रीकृष्ण म्हणतात, प्रत्येक व्यक्तीने (Geeta Updesh Krishna Arjun Sanvaad) रागाच्या वेळी स्वतःवर थोडे नियंत्रण ठेवले पाहिजे आणि चूकीच्या वेळी थोडेसे नतमस्तक झाले पाहिजे. या पद्धतीचा अवलंब केल्याने जगातील सर्व समस्या दूर होतात. राग आणि अहंकार या दोन्ही गोष्टी माणसाचा नाश करतात.

श्रीकृष्ण म्हणतात की जर तुमच्यात चुकीला चुक म्हणण्याची क्षमता नसेल तर तुमची प्रतिभा व्यर्थ आहे.आज आपण श्रीकृष्णाच्या गीतेतल्या काही भागाचं वाचन करणार आहोत. जगात सर्वात सुखी कोण आहे? यावर श्रीकृष्ण अर्जुनाला कोणता उपदेश देतात, ते आपण पाहाणार आहोत.

गीतेमध्ये असे म्हटले आहे की ज्यांनी तुम्हाला दुखवले आहे त्यांना देखील त्रास होईल आणि जर तुम्ही भाग्यवान असाल तर देव (Geeta Updesh Krishna Arjun Sanvaad) तुम्हाला हे पाहण्याची संधी देईल. म्हणूनच दुःखाच्या वेळी कधीही धीर सोडू नये.

श्रीमद्भगवद्गीतेनुसार विजयासाठी स्वतःला प्रेरित करणे आवश्यक आहे. श्री कृष्ण म्हणतात की प्रेरणेचा सर्वात मोठा स्त्रोत म्हणजे तुमचे स्वतःचे विचार, म्हणून मोठा विचार करा आणि स्वतःला जिंकण्यासाठी प्रेरित करा.

श्रीकृष्ण गीतेत म्हणतात, जगातील सर्वात सुखी लोक ते आहेत ज्यांना हे समजले आहे की इतरांकडून कोणतीही अपेक्षा करणे व्यर्थ आहे. (Geeta Updesh Krishna-Arjun Sanvaad) अपेक्षाच व्यक्तीच्या दु:खाचे कारण बनते.

श्रीकृष्ण सांगतात की, कोणतीही व्यक्ती त्याला जे बनायचं ते बनू शकते. जर त्याने सतत चिंतन करून त्याला इच्छित गोष्टीबाबत विश्वासाने प्रयत्न केला तर. त्या व्यक्तीने त्याचे प्रयत्न योग्य दिशेने आहेत यावर विश्वास ठेवला पाहीजे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button