जीवनात नेहमीचं सुखि राहायचं असेल तर स्वामींनी सांगितलेले हे उपदेश पाळा.

0

स्वामींनी जीवनाबद्दल विविध उपदेश केलेले आहेत. या आधुनिक जीवनातही हे उपदेश कामी येवू शकतात. अशेच आठ उपदेश स्वामींनी आपल्याला सांगितले आहेत. त्यामुळे तुमच्या जीवनातील विविध अडचणी पासून तुम्ही दुर राहू शकता. तर पाहूया कोणते असे उपदेश आहेत जे स्वामी सांगतायेत.

धर्मावर विश्वास न ठेवणाऱ्या आणि सज्जन ज्ञानी लोकांची खिल्ली उडवणार्‍या लोकांचा विनाश लवकर होतो. जे लोक सज्जन लोकांची चेष्टा करतात, तर नेहमी अपयश त्यांच्या पदरात पडत असते. सज्जन लोक्काना आपल्यापेक्षा जास्त ज्ञान असते, उलट आपण त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजेत.

खोटं बोलने किंवा कोणत्याही खोट्या गोष्टीला समर्थन देणे. एक असे अज्ञान आहे त्यामध्ये बुडालेले लोक कधीही खरे ज्ञान किंवा यश प्राप्त करू शकत नाहीत. आपल्याला लहानपणापासून सांगत आलेले आहेत कि खोटे बोलू नये. खोटे बोलल्याने अनेक वेळा सत्य लपवण्यासाठी एक झाले कि एक खोटे हे बोलावे लागते.

जे काम केल्याने पुण्या ची प्राप्ती आणि इतरांचे भले होत असेल ते काम करण्यात उशीर करू नका. मनामध्ये असे काम करण्याचा विचार आला लगेचच ते काम करून टाका. बऱ्याच वेळा स्वामी आपल्याला संधी देत असतात. ती संधी आपल्यासाठी योग्य आहे हे समजलेलं पाहिजे. आपण संधी ओळखून लगेचच कृती केली पाहिजे.

पृथ्वीवर चांगले ज्ञान, शिक्षण हेच स्वर्ग असून वाईट सवयी आणि अज्ञान नरक आहे. अज्ञानाने माणूस आणखीनचं अडाणी बनतो असतो म्हणतात. आपण नेहमी चांगले शिक्षण घेतले पाहिजे. चांगल्या लोकांच्या संगतीत राहिले पाहिजे.

मोह, हव्यास माणसाला कधीही असू नये. व्यक्तीला मृत्यू कधी येईल हे हि सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला जेवढे शक्य आहे तेवढे चांगले जागून घ्यावे. त्यामुळे आपण सतत हसत आणि खुश राहिल्याने तो माणूस दीर्घायुष्य तर होतोच परंतु तो सुखी जीवन प्राप्त करतो. त्यामुळे नेहमी आनंदी राहा.

पुण्यकर्म अवश्य करावे, परंतु त्याचा देखावा करू नये. जो व्यक्ती समाजामध्ये लोकांनी आपले कौतुक करावे यासाठी पुण्यकर्म करतो त्याला त्याचे शुभ फळ कधीच प्राप्त होत नाही. आपण जे काही चांगले काम करतो, त्याचा आढावा आपले स्वामी नक्कीच घेत असतात. आणि आपल्याला त्या चांगल्या कामाचे फळ देखील मिळत असते. आपण जर केलेले काम बोलून दाखवले तर केलेल्या कामाचा काहीच उपयोग होत नाही.

सर्वांना समान वागणूक आणि सन्मान देणारा तसेच इतरांबद्दल मनामध्ये प्रेमाची भावना ठेवणारा व्यक्ती जीवनात सुख प्राप्त करू शकतो. आपल्याला लहानपणापासून आपल्या घरी सांगण्यात आले आहे कि, सर्व लोकांशी प्रेमाने आणि नम्रतेने बोलावे. असे केल्याने त्यांचे आशिर्वाद आपल्याला मिळतात आणि आपल्याला सुख प्राप्त होते.

स्वतःचे मन आणि इंद्रिय वष मध्ये ठेवणाऱ्या मनुष्याला जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत नाही. अशा लोकांच्या मनामध्ये इतरांचे सुख धन पाहून वाईट विचार येत नाहीत.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed