अध्यात्मिक

जो दुसऱ्यांचे हक्क हिरावू न घेतो, खातो.. त्याच्यासो बत बघा काय घडते.. मृ’त्यूनंतर देखील त्याला.. पहा

मित्रांनो, जर आपण आपल्या जीवनात कुठल्याही व्यक्तीचा हक्क हिरावून घेतो मग तो भोजनात असू दे, संपत्ती मध्ये असू दे किंवा कुठल्याही आनंदाच्या क्षणी असू दे याचे परिणाम आपल्याला नक्कीच भो’गावे लागतात. जीवनात कधीही कुठल्या व्यक्तीचा हक्क हिरावून घेऊ नये. दुसऱ्याचा हक्क हिरावून घेणाऱ्या व्यक्तीसोबत त्याच्या मृ-त्यूनंतर काय होते हे आज आपण पाहूया..

शिवपुराणानुसार सूर्य देवाने आपल्या पुत्रांच्या योग्यतेनुसार त्यांना वेग-वेगळ्या क्षेत्राचे अधिपत्य प्रदान केले होते. आपल्या वडिलांच्या आज्ञेचा अपमान करून शनिदेवांनी आपल्या भावंडांच्या हक्काचे असलेले क्षेत्रावर सुद्धा आपल्या ताब्यात घेतले. सूर्य देवाने याबाबत आपल्या पुत्राची म्हणजेच शनि देवांची समजूत काढली परंतु शनिदेव आपल्या मतावर ठाम होते.हा सर्व प्रकार भगवान शंकर कैलासातून पाहत होते.

एका पित्या सोबत असे होताना पाहून भगवान शंकर यांना राग आला. भगवान शंकर यांनी शनिदेवा सोबत यु-द्ध करण्याचे ठरविले. असे म्हटले जाते की, हे यु-द्ध फार भयंकर होते आणि या यु’द्धात शनि देवांनी भगवान शंकरांवरती मार्ग दृष्टी टाकली तेव्हा महादेवांनी क्रोधित होऊन आपला तिसरा डोळा उघडला आणि शनि लोक जाळून भस्म केले.

एवढेच नव्हे तर महादेवाने आपल्या त्रिशूलाने शनि देवांना पराभूत केले. आपल्या भावांचा हक्क हिरावून घेतला यासाठी भगवान शंकर यांनी शनि देवांना शिक्षेच्या स्वरूपात १९ वर्षापर्यंत पिंपळाच्या झाडाला उलटे लटकविले होते. असे सांगितले जाते की, या एकोणीस वर्षात शनिदेव भगवान शंकराच्या आराधनेत मग्न होते. सूर्य देवाने आपल्या पुत्राच्या प्रेमापोटी,भगवान शंकरांना विनंती केली की त्यांनी शनि देवांना माफ करावे.

भगवान शंकरांनी विनंतीला प्रसन्न होऊन शनिदेवांना फक्त माफ केले नाही तर त्यांनी सृष्टीचा दंडाधिकारी म्हणून शनि देवांची नियुक्ती केली. दोन मित्रांची अजून एक कथा जी हक्क हिरावून घेण्यासं’बंधी प्रचलित आहे. हे दोन मित्र म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा.

भगवान श्रीकृष्णांचा ज’न्म एका सधन कुटुंबात झाला होता तर दुसरीकडे सुदामा एका ब्रा’ह्मणाच्या घरी ज’न्माला आले होते. दोघांमध्येही जमीन आसमानाचा फरक होता परंतु तरीसुद्धा या दोघांच्या मैत्रीचे किस्से आजही अमर आहेत. पौराणिक कथेनुसार असे सांगितले जाते की, सुदामा सुद्धा एकेकाळी फार श्रीमंत होते परंतु असे काय घडले की- त्यांच्यापासून त्यांची श्रीमंती नाहीशी झाली

यामागेही एक कथा आहे. पौराणिक कथेनुसार एकदा सुदामाला त्यांच्या पत्नीने चण्याच्या दोन पिशव्या दिल्या, त्यातली एक पिशवी श्रीकृष्णासाठी होती. सुदामा आणि श्रीकृष्ण परममित्र असून सुद्धा सुदामा यांनी सर्वच चणे एकट्यानेच खाल्ले. याचा परिणाम म्हणून सुदामाचे आयुष्य दुःखाने व्यापले होते. काही वर्षे उलटली आणि सुदामाच्या पत्नीने सुदामाला श्रीकृष्णाकडे जाण्याचे सांगितले,

पत्नीने सांगितल्याप्रमाणे सुदामा श्रीकृष्णाकडे जाण्यास निघाले. श्रीकृष्णाच्या महालाबाहेर सुदामा पोहचताच श्रीकृष्ण सुदामाचे पाय धुण्यासाठी थाळी घेऊन आले या दरम्याने श्रीकृष्णाने सुदाम्याला विचारले की, माझ्यासाठी काही आणलेस की नाही ? पीशवी मध्ये आणलेले तांदूळ सुदामा लपवत होते परंतु तरीदेखील श्रीकृष्णांनी त्यांच्या हातातील पिशवी काढून घेतली आणि,त्यातील तांदूळ आवडीने खाल्ले.

दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णांकडून सुदामा आपल्या घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांच्या मनात येऊन गेले की श्रीकृष्णाने आपल्याला भेट स्वरूपात काहीच दिले नाही, हा विचार करत सुदामा घरी परतले. घरी येऊन पाहतो तर काय ! छोटीशी झोपडी आता मोठा महाल झाली होती, सुदामांची पत्नी चांगली वस्त्रे आणि दागिन्यांनी सजली होती.

हे सर्व दृश्य पाहून सुदामांच्या डोळ्यात अश्रू आले आणि आयुष्यभरासाठी सुदामा कृष्ण भक्तीत लीन झाले. गरुड पुराणात असे म्हटले आहे की, जो मनुष्य दुसऱ्याचा हक्क हिरावून घेतो त्या मनुष्याला यमदूत दोरखंडाने बांधून नरकात घेऊन जातात. दुसऱ्याचा हक्क हिरावून घेणारा, कपट करणारा व्यक्ती पुढच्या ज’न्मात घुबड बनतो. खोटी साक्ष देणाऱ्या व्यक्ती पुढच्या ज’न्मात आंधळा बनतो.

मनुष्याचे जीवन हे फार अनमोल आहे ते छळ आणि कपट करून वाया घालवण्यापेक्षा मनात प्रेम व भक्तीची भावना ठेवून दुसऱ्यांशी चांगले वागले पाहिजे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button