जरा हटके

जोडीदार आपल्याला गृहित धरतोय हे कसे ओळखाल? ही ३ लक्षणे दिसत असतील तर वेळीच सावध व्हा..

3 Signs For Healthy Relationship: प्रेम नवं नवं असताना जोडीदाराबाबतच्या काही नकारात्मक गोष्टी दिसत असूनही लक्षात येत नाहीत. पण पुढे जाऊन त्याच गोष्टींचा त्रास होऊ लागतो. तुमचंही तसंच होत नाहीये ना?

नव्याने प्रेमात पडल्यावर जोडीदाराचं सगळं सगळं काही आवडायला लागतं. आपल्याला मिळालेला जोडीदार परफेक्ट वाटायला लागतो. सुरुवातीला डोळ्यांवर प्रेमाची धुंदी पण अशी असते की त्याखाली जोडीदाराच्या अनेक लहान- मोठ्या नकारात्मक गोष्टीही दिसत नाहीत. किंवा दिसत असून, समजत असून आपण त्याच्याकडे डोळेझाक करतो.

पण प्रेमाचे नऊ दिवस जसे जसे सरतात, तसं तसं मात्र जोडीदाराच्या वागण्यातलं, स्वभावातलं बरंच काही खटकू लागतं. ज्या गोष्टींकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं, तसं केलं नसतं तर किती बरं झालं असतं, असं वाटू लागतं. म्हणूनच जोडीदार आपल्याला गृहित धरत असेल, तर ते वेळीच लक्षात घ्या. कारण भविष्यात जोडीदाराचं असं गृहित धरणं डोईजड होऊ शकतं…

जोडीदार आपल्याला गृहित धरतोय हे कसं ओळखाल.. इमोशनल करत असेल तर – जोडीदार कायम त्याच्याच गोष्टी तुम्हाला ऐकवत असेल, तुमच्याकडून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत असेल, तर ही धोक्याची घंटा आहे.कारण अशा व्यक्तींना कायम त्यांच्यावरच फोकस हवा असतो. तो ढळला तर ते त्यांना अजिबात आवडत नाही. त्यांच्या दुःखाला ते कुरवाळत बसतात आणि दुसऱ्यांनीही तेच करावं, अशी त्यांची कायमच अपेक्षा असते.

स्वत:ची चूक मान्य करत नसेल तर- चुका सगळ्यां कडूनच होतात. पण ती चूक मान्य करण्याची क्षमता सगळ्यांमध्ये नसते. त्यामुळे तुमचा जोडीदार जर वारंवार चुकत असेल आणि चूक करूनही त्याला त्याची जाणीव नसेल, त्याबद्दल सॉरी म्हणावं असं वाटत नसेल, तर पुढे जाऊन जोडीदाराची ही सवय त्रासदायक ठरू शकते.

निर्णय घेताना मत विचारतो का- ही बाब खूप महत्त्वाची आहे. आणि अगदी लहान लहान गोष्टीतूनही तुम्ही हे ओळखू शकता. साधं हॉटेलमध्ये गेल्यावर चहा घ्यायचा की कॉफी किंवा कोणत्या हॉटेलमध्ये जायचं, कुठे जायचं… हे जर तुम्ही मिळून मिसळून ठरवत असाल तर मात्र तुमच्या जोडीदारासाठी तुमचं मतंही महत्त्वाचं आहे, हे लक्षात येतं.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button