का.? स्त्री पुरुष जवळच्या व्यक्तीपेक्षा अनोळखी वक्तीकडे आकर्षिले जातात…

निसर्गाचा अद्भूत अविष्कार म्हणजे नर व मादी, माणूस म्हणून त्यांची ओळख स्री पुरुष अशा प्रकारे होत असते. त्यांच्यातले आकर्षण हे नैसर्गिक आहे. ती एकमेकांसाठीच बनलेली आहेत.मानवासाठी काही नियम असतात, रुढी परंपरा, बंधने असतात त्यानुसार वागावे लागते. पुरुषांपेक्षा स्त्रीला अधिक बंधने असतात. तसेच ती स्वतः सुद्धा त्या बंधनात राहू इच्छित असते.
कटाक्षाने मर्यादा पाळत असते. माहेर, सासर,मुले, समाज यांचा विचार करून ती परक्या पुरुषांबरोबर संबंध प्रस्थापित करत असते. केवळ औपचारिक बोलणे असेल तर त्यासंबंधी स्री पुरुष मनात कुठलेही आढेवेढे न ठेवता बोलतात पण इथे प्रश्न आहे जवळच्या व्यक्ती पेक्षा अनोळखी व्यक्तीवर आकर्षित होतात.
अनोळखी माणूस हा अचानक संपर्कात आलेला असतो. त्याच्याविषयी कुठलीच माहीती नसते, स्वभाव माहीत नसतो त्यामुळे त्याचे आकर्षण निर्माण होईल पण तात्पुरते होईल जवळीक होणार नाही. उलट जवळचा रोजच्या परिचयाचा माणूस हा ओळखीचा असो वा नसो त्याची माहीती असते किंवा काढता येईल. एकदम अनोळखी माणूस असेल तर त्याचे आकर्षण तात्पुरते असेल तो नजरेआड झाला की आकर्षण संपुण जाईल.
अचानक समोर आलेली अपरिचित स्री एखाद्या पुरुषाला आवडुन तो तिच्याशी बोलण्यचा प्रयत्न करील ती जर बोलली,हसली तर जवळीक साधणयाचा प्रयत्न सुद्धा करेल. पण स्री अशी अनोळखी,अपरिचित व्यक्तीशी प्रथम दर्शनी जवळीक साधणयाचा प्रयत्न करणार नाही असे वाटते. मग तो कितीही सुंदर असो.
जवळची व्यक्ती ही एकमेकांना ओळखत असल्यामुळे अधिक जवळीक साधून जर बोलणे केले तर त्यांच्या एकमेकांच्या कुटुंबीयांसह शेजारयांना सुद्धा समजून वेगळाच संशय, अर्थ निघु शकतो म्हणून अनोळखी व्यक्ती अधिक सुरक्षित आहे असे वाटून त्याच्या बरोबर बोलावे , संबंध ठेवावेत,असे असु शकेल.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद