कालचक्र : भगवंत जसा ठेवेल तसंच राहण्याचा प्रयत्न करा, समाधानी व्हाल!!

श्री स्वामी समर्थ.. मित्रांनो.. एकदा गंगेला विचारण्यात आलं तुझ्या पाण्यात अंघोळ केली की सर्व पाप धुतली जातात, त्या सर्व पापांचं तू काय करतेस. ती म्हणाली मी समुद्रात नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आलं तू त्या पापांच काय करतोस? त्यावर समुद्र म्हणाला की मी ते ढगात नेऊन टाकतो. ढगाला विचारलं तू काय करतोस त्या पापांचं? ढग म्हणाला मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा त्यांच्या घरावर नेऊन टाकतो.
लक्षात ठेवा कालचक्र ही असंच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसंच राहण्याचा प्रयत्न करा, समाधानी रहा आणि आयुष्यात पुण्य कर्म करत रहा. कारण जसं तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार हे कालचक्र आहे. ते कुणालाही सुटलेलं नाही.
तुम्ही जितकी पुण्य कर्म कराल तितकं तुमच्या आयुष्यात चांगलेच होईल आणि तुम्ही जितकी वाईट कर्म कराल ते दुष्कृत्य तुमच्यावरच पडणार आहे. त्यामुळे भगवंत जसा ठेवेल तसंच राहण्याचा प्रयत्न करा समाधानी रहा. ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान श्री स्वामी समर्थ.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद