अध्यात्मिक

काय आहे स्वामींच्या देवी रुपातल्या फोटो मागची कथा ? | स्वामींना या रूपात का दाखवलं जाते । काय गोष्ट आहे हे जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा !

श्री स्वामी समर्थ अनेकदा हा प्रश्न विचारला जातो की, स्वामींचा जो देवी रुपतला फोटो आहे, त्याच्या मागे नक्की काय कारण आहे? स्वामींना या रूपात का दाखवलं जात काय गोष्ट आहे, म्हणून आपण काही गोष्टींची माहिती पाहुयात. महत्त्वाचं म्हणजे स्वामी महाराज आपले गुरू आहेत. की गुरूला आपण, नुसत गुरू नाही तर गुरुमाऊली देखील म्हणतो.

तर गुरुमाऊली म्हणजे काय तर ” माऊली म्हणजे आई, गुरू शिष्याच नात हे आई आणि मुलासारखेच असते”. जेव्हा शिष्य संकटात असतो, तेव्हा गुरूही काही आनंदात नसतो. ज्या वेदना शिष्याला होत असतात, त्या गुरुलाही होत असतात. म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचं पहायचं झालं तर जेव्हा भक्त संकटात असतात, तेव्हा स्वामी सुद्धा अस्वस्थ असतात.

आणि ते त्याला अनेक मार्ग सुचवत असतात, कि या संकटातून तो लवकरात लवकर कसा बाहेर पडावा. त्याला कमीतकमी त्रास होऊन कसा तो त्यातून योग्य मार्ग सापडून बाहेर पडावा. यासाठी स्वामी सुद्धा झटत असतात. एकदा स्वामी खूप अस्थिर होते. रात्रीची वेळ होती रात्रीची वेळ होती, तेव्हा बाळप्पा महाराजांनी स्वामींच्या विचारलं स्वामी काय झालं?

इतके अस्थिर का दिसताय, नक्की काय झालं, तेव्हा स्वामी म्हणले माझे भक्त संकटात असताना मी शांत कसा राहू म्हणून मी अस्थिर आहे, अस स्वामी म्हणतात. स्वामी ही म्हणजे आपली आईच आहे. गुरु माऊली जसं म्हंटलय म्हणून हे एक कारण आहे की गुरू हे आपल्या आईसारखेच असतात. त्यामुळे देखील त्यांचे आईच्या रूपातील देवीच्या रूपात ही पूजा केली जाते.

एकदा स्वामींनी त्यांच्या भक्तांना माता अन्नपूर्णे च्या हातून जेवण खावू घातलं होत. ती गोष्ट काय तर एकदा स्वामी आपल्या भक्तांन समवेत कोन्हाळे नावाच्या गावाजवळ जे एक जंगल आहे, त्यातून प्रवास करत होते. स्वामी सोबत जवळजवळ शंभर एक भक्तगण होते. आणि असा सगळ स्वामी आणि सगळ्या भक्तांचा जमाव त्या जंगलातून प्रवास करत होता.

भर दुपारची वेळ होती, जंगलात काटे कुटे होते. सगळ्यांना खूप भूक लागली होती. पण स्वामींनी सकाळपासुन काही खाल्लं नव्हतं नाही त्या भक्तांना खाऊ दिलं होतं. असं करता करता संध्याकाळ झाली. दिवस मावळायला आला होता. भक्तगण अस्वस्थ झाले, भूक त्यांना सहन होईना.

तेव्हा श्रीपाद भट म्हणून हे स्वामींचे भक्त होते. ते शेवटी स्वामींच्या वाटेत आडवे पडले आणि स्वामींना म्हणाले आम्हाला आता भूक सहन होईना, सगळे अस्वस्थ झाले भुकेमुळे तुम्ही आमचं काय तो प्राण घ्या, आणि मग जा तुम्हाला कुठे जायचं आहे तिथे. अस म्हंटल्यावर स्वामींनी काय hi तर तिथे एक जवळच असलेल्या आंब्याच्या झाडाखाली जाऊन स्वामी उभे राहिले.

स्वामी त्या झाडाजवळ उभे राहिल्यावर मग इतर भक्तांनी आजूबाजूला येऊन जागा वैगरे साफ केली. जवळ कुठे पाण्याची व्यवस्था आहे का ती पहिली. माणसाने जाऊन पाणी वैगरे घेवून आले. पण आत्ता रात्र व्हायला आली होती. सगळ्यांना भूक लागली होती. त्यामुळे त्यांनी स्वामींना विचारले की, स्वामी तुम्ही काही खाणार का ?

स्वामी म्हणाले की तुम्ही सगळे खा म्हणजे मी खाल्यासारखं झालं म्हणजे मला देखील मिळेल. पण आत्ता इतक्या रात्रीची वेळ त्यात जंगल इथे जेवणाची व्यवस्था होणार कशी हा सगळ्यांना प्रश्न पडला? आणि त्यांनी तो स्वामींना देखील विचारला की, महाराज इथे इतक्या रात्री आता भोजन मिळेल कुठून तेव्हा महाराज म्हणाले की ते पलीकडे तो मळा आहे

जाती तुम्हाला जेवण देईल, स्वामींचे हे असे उदगार एकूण काही भक्तांना आश्चर्य वाटले. की काय तिथे कोणी काय वाढून ठेवलं असेल, अस काहींच्या मनात आले. पण श्रीपाद भट यांचा स्वामींवर प्रचंड विश्वास होता. ते आपल्या समवेत चार- पाच इतर भक्तांना घेवून त्या मळ्याच्या दिशेने गेले. मळा तर होता तिथे गेल्यावर पहातात तो काय चमत्कार!

एका झाडाखाली एक अशी मध्यम वयस्क बाई उभी होती. श्रीपाद भटांनी तिला प्रश्न केला की, ताई इथे जवळपास कुठे गाव आहे का? खाण्यापिण्याची सोय होऊ शकते का इथे तेव्हा ती बाई म्हणाली की बघाना आमच्या गावातली काही माणसे आज इथे जेवायला येणार होती. पण अजून पर्यंत कोणीच आलं नाही.

मला प्रश्न पडला होता की इतक्या सगळ्या जेवणाच मी आता करू काय? पण बरं झालं, तुम्ही आलात ना आता असं करा सगळं जेवण आणि पाणी सुद्धा आहे इथे. हे सगळं तुम्ही घ्या आणि तुम्ही खा. श्रीपाद भट यांना फार बरं वाटल. त्यांनी ते सगळं जेवण म्हणजे अगदी सगळं छान सगळं जेवण होत. वरण, भात, पोळ्या, तूप, भाजी, वैगरे.

सगळ्याची अशी मोठमोठी पातीली होती. श्रीपाद भट आणि इतर भक्तांनी ती सर्व पातीली घेवून पुढे जाऊ लागले. तेव्हा श्रीपाद भटांनी त्या बाईंना विचारले की, ताई इतक्या रात्री तुम्ही इथे काय करताय, तुम्ही पण या स्वामींचे दर्शन घ्या. स्वामी आहेत तिथे आमचे. चला तुम्ही पण तेव्हा त्या बाई म्हणाल्या अस करा तुम्ही जा मी येते मागून, स्वामींना सांगा माझं नाव अन्नपूर्णा आहे.

जापुढे तुम्ही. ते पुढे चालू लागले, मागे बघतात तर काय तर ती बाई नाहीशी झाली, म्हणजे तिथे आसपास कुठे दिसेनाशी झाली होती. एकतर जंगल मध्ये एवढ्या पटकन ती बाई कुठे पळून जाणार त्यांना आश्चर्य वाटलं. पण तरी ते स्वामी जिथे थांबले होते होते, सगळे भक्त जिथे होते तिथं आले.

सगळ्यांनी छान जेवणाचा छान आनंद घेतला आस्वाद घेतला. सगळ्यात आधी स्वामींना नेवेद्य दाखवला. आणि मग सगळ्यांनी छान आनंद घेतला, गप्पा रंगात आल्या होत्या. तेव्हा कोणीतरी स्वामींना विचारलं, की ही कोण बाई होती? तेव्हा स्वामींनी सांगितलं की ती आमच्याच कुटुंबातील होती. तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आल.

ही जी अन्नपूर्णा, स्वामी म्हणाले होते ती म्हणजे दुसर कोणी नसुन साक्षात अन्नपूर्णा माता होती. आणि त्या भक्तांना इतका पश्चाताप झाला की, काय हे आपले दूरभाग्य माता अन्नपूर्णा आपल्याला भेटल्या पण आपण त्यांचे पाय सुद्धा पडलो नाही. आणि जे इतर भक्त होते जे गेलेच नव्हते, त्यांना तर अजून वाईट वाटले की काय आपण स्वामींवर असा अविश्वास दाखवला.

चक्क स्वामींनी आज आपल्याला माता अन्नपूर्णेचे आतून खाऊ घातलं आणि त्यांचे दर्शन घेण्यास लाभ होतात दर्शन घेण्याचा योग आला. आपण अविश्वास दाखवला, तर आपण माता अन्नपूर्णेचे दर्शनाला मुकलो. स्वामींनी अशाप्रकारे भक्तांना माता अन्नपूर्णा च्या हाती जेवण खाऊ घातल्या कारणांनी देखील स्वामींना माता अन्नपूर्णेचे रुपात म्हणजे देवीच्या रुपात पुजल जाते.

आता गमतीचा भाग असा आहे की सगळे जेवून झोपले आणि दुसऱ्याची सकाळी उठले आणि त्यांनी विचारलं की स्वामी ही भांडी काय करायचे? स्वामी म्हणाले तुमचीच आहे. सर्व भांडी घ्या ठेवून तुम्हाला. करा काय ते त्याच. यातून घ्यायचा बोध म्हणजे असा की स्वामींवरील विश्वास. जे श्रीपाद भट होते, त्यांचा स्वामींवर प्रचंड विश्वास होता.

त्यामुळं स्वामी जे म्हंटले त्यांनी लगेच त्यावर अंमलबजावणी करून लगेच ते त्या मळ्यात गेले. आणि त्यांना माता अन्नपूर्णेचे दर्शन झाले. आपण नेहमी म्हणतो की नाही स्वामींवर पूर्ण विश्वास, पूर्ण मनापासून भक्ती करा. बघा तुम्हाला जे हवंय ते नक्की मिळेल तुम्ही सुखी व्हाल, आयुष्य सुखी बनेल, स्वामी तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील काही अडचणी असेल तर त्यातून सुटण्याचा मार्ग दाखवतील, आपण पाहिले म्हंटले प्रमाने स्वामी शेवटी हे काय आहे तर स्वामी आपली आई आहेत.

आई कधीच मुलाचं वाईट चिंतीत नाही. त्यामुळे सतत स्वतः ला बजावत राहा की, माझे स्वामी माझ्या सोबत आहेत. स्वामी असताना माझं काहीही वाईट होऊ शकत नाही. हे सर्वात महत्वाची गोष्ट होती. आणि पुढे तर सर्वांना माहीतच आहे की, स्वामींनी अनेक त्यांच्या भक्तांना त्यांच्या आराध्य दैवतांचे रूपात दर्शन दिले आहे.

वेगवेगळ्या रूपात त्यांच्या भक्तांना दर्शन दिले आहे. कोणाला विठ्ठलाच्या रूपात, कोणाला शंकराच्या रूपात, कोणाला खंडोबाच्या रूपात, कोणाला हनुमानाच्या रूपात, तर कोणाला गणपतीच्या रूपात, अश्या वेगवेगळ्या देवतांच्या रुपात स्वामींनी आपल्या भक्तांना दर्शन दिलेले आहे. असच एका भक्ताला त्यांनी माता महालक्ष्मी च्या रूपात दर्शन दिले आहे… या काही गोष्टी होत्या.

या काही कारणामुळे स्वामींना आपण देवीच्या रूपात म्हणजे आईच्या रूपात देखील पाहतो पुजतो. त्या रूपात देखील स्वामींची पूजा होते. त्या रूपात देखील स्वामी किती दयाळू, मायाळू, किती तेजस्वी दिसतात, किती छान वाटतं स्वामींचा हा अवतार बघितला की, स्वामींचे करुणामय रूप दयाळूपणा आणि मातृत्व ममत्व स्वामीं मधलं हे खूप खूप उठून दिसतं. स्वामी तुम्हाला नेहमी सुखी, समृध्द, निरोगी ठेवो हीच स्वामी चरणी प्रार्थना. ना त्या मळ्यात जा तिथे अन्नपूर्णा वाट बघत आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button