कितीही देवदेव करा ; परंतु जीवनात ह्या 9 चुका करणारा मनुष्य आयुष्यभर गरीबच राहतो!

मित्रांनो, तुम्ही कितीही देवाची पूजा करा. आराधना उपासना करा. ह्या 9 चूका करणाऱ्या व्यक्ती जीवनात नेहमी गरीबच राहतात. बरेच लोक श्रीमंतीसाठी ज्योतिषी उपाय करतात. टोटके करतात. मात्र कोणताही उपाय काम करत नाही. कितीही देवाची आराधना केली तरीही देव प्रसन्न होत नाही. पैसा हाती येत नाही आणि ह्याचा अर्थ असा नाही की, ज्योतिषी उपाय काम करत नाही.
तर लोक ह्या 9 चूका करतात. त्यामुळे हे उपाय निष्पन्न ठरतात. पैसा येणे बंद होतं आणि आला तरी टिकत नाही. कमावलेला पैसा विनाकारण बाहेर जातो. मासिक उत्पन्नापेक्षा मासिक खर्च अधिक होतो आणि गरिबी येते. तर जाणून घ्या ह्या 9 चूका ज्या तुम्ही टाळाव्यात.
मित्रांनो यामधील पहिली चूक म्हणजे प्रत्येकाच्या घरी सण समारंभाला पाहुणे हे येतच असतात. काही लोक पाहुणे आले की आनंदी होतात. तर काहीजण नाराज होतात. ज्या ज्या वेळी आपण अतिथी आल्यावर नाराज होतो त्या त्या वेळी प्रत्यक्ष माता लक्ष्मी, परमेश्वर आपल्यावर नाराज होतो. कारण अतिथीच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या घरी आलेले असतात.
म्हणून अतिथी घरी आल्यावर नाराज न होता त्यांचे स्वागत करावे. त्यांना योग्य तो मान द्यावा. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा कधीही अपमान करू नका. त्यामुळे परमेश्वर आपल्यावर प्रसन्न होतो आणि आपल्या घरात नेहमी लक्ष्मी नांदते.
त्यानंतर मित्रांनो पुढची चूक आहे ती म्हणजे बऱ्याच जणांना जेवण करताना चपाती दातांनी कुरतडून खाण्याची सवय असते. ही सुद्धा अत्यंत घातक सवय आहे. जेवण करताना कधीही भाकरी किंवा चपाती कुरतडून खाऊ नये. करतडून खाल्ल्याने अन्नपूर्णा देवी आपल्यावर नाराज होऊ शकते. अन्नपूर्णा देवी आणि माता लक्ष्मी ह्यांचं वास्तव्य एकसाथ असतं असं म्हंटलं जातं.
ज्या घरात अन्नाचा अपमान होतो त्या घरात अन्नपूर्णा देवी वास्तव्य करत नाहीच. तर सोबत लक्ष्मी सुद्धा त्या घरात राहणं पसंत करत नाही. म्हणून भाकरी किंवा चपाती कुरतडून खाऊ नये. तर मित्रांनो त्यानंतरची पुढची चूक आहे ती म्हणजे आपण दररोज देवपूजा करत असालच. देवपूजा करताना बरेच लोक आपल्या इष्टदेवतेचं पूजन करत नाहीत. देवघरात आपल्या इष्टदेवतेचा फोटो अथवा मूर्ती असावी. शक्य नसल्यास देवपूजा करताना आपल्या इष्टदेवतेचं स्मरण तरी करावे कारण इष्टदेव हे आपले प्रथमदेव असतात.
आपल्या कुटुंबाचे , वंशाची ची देवता असते म्हणून इष्टदेवतेची पूजा दररोजच्या देवपूजेसोबत होणे अत्यंत गरजेचे आहे. ज्या घरात इष्टदेवतेची स्मरण होत नाही त्या घरात माता लक्ष्मी वास करत नाही. तुम्ही घरात कितीही पैसा आणा. तो पैसा टिकणार नाही.
मित्रांनो चौथी जी चूक आहे ती म्हणजे आपल्यातील बऱ्याच जणांना आपली नखे दातांनी कुरतडण्याची सवय असते. ही चूक आपल्या घरात आजारपण घेऊन येते आणि ह्या आजारपणात बराच पैसा वाया जातो. हिंदू धर्मशास्त्र असं म्हणतं की जी लोकं आपल्या दातांनी नखे कुरतडतात ती लोकं वारंवार आजारी पडतात.
अशा लोकांच्या खिशात पैसा टिकत नाही. म्हणून ही सवय कोणाला असेल तर ती सुधारायला हवी. मित्रांनो पाचवीची चूक आहे ती म्हणजे आपल्या घरात कधीही कचरा किंवा भंगार साचवून ठेवू नये. शहरी भागात बऱ्याचदा कचऱ्याचा डबा हा घराबाहेर दरवाजात ठेवलेला असतो आणि घरातला सर्व कचरा हा ह्या डब्यात साचवून ठेवला जातो. ह्यात कचरा साचवून न ठेवता रोजच्या रोज तो रिकामा करावा. ज्या घरात कचरा साचवून ठेवला जातो त्या घरात अलक्ष्मीचं आगमन होतं.
मित्रांनो सहा नंबरची आणि सर्वात महत्त्वाची जी चूक आहे ती म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्यावेळी झोपून राहू नये. सूर्योदय आणि सूर्यास्त ह्या दोन वेळी माता लक्ष्मी संपूर्ण पृथ्वीतलावर विचरण करत असतात आणि आपल्या घरात प्रवेश करणार असतात.
म्हणून ह्यावेळी आपण जर झोपलेलो असू तर त्यांचं आगमन आपल्या घरात होत नाही. कितीही मेहनत केली तरीही घरात पैसा येत नाही. त्याच्या पुढची सातवी चूक आहे आपल्या घरासमोर उंबऱ्याजवळ आपण चपला काढतो. घरात जाताना किंवा बाहेरून घरी येताना पालथ्या चपला दिसल्यावर त्यावर दुर्लक्ष करून जर घरात जात असाल तर ती मोठी चूक आहे.
मुख्य गोष्ट म्हणजे आपल्या घरासमोर , उंबरठ्यासमोर आपण अशा चपला ठेवू नये. ज्या ज्या वेळी आपल्याला अशा पालथ्या चपला दिसतील तर त्या सरळ करणे गरजेचे आहे. आपल्या धर्मशास्त्रात ह्याचे उल्लेख आढळतात. मित्रांनो आठ नंबरची चूक आहे ती म्हणजे कपडे परिधान करताना आपला कोणता हात किंवा पाय प्रथम कपड्यामध्ये घालतो ते महत्वाचे आहे.
जे लोक कपडे परिधान करताना सर्वात आधी डावा पाय किंवा हात कपड्यामध्ये टाकतात त्या लोकांकडे पैसा टिकत नाही. म्हणून नेहमी कपडे घालताना सर्वप्रथम उजवा हात किंवा पाय कपड्यांमध्ये घालावा. शेवटची नववी चूक आहे ती म्हणजे आपल्यातील बरेच लोक झोपताना आपल्या उशाशी पाणी ठेवून झोपतात. हे पाणी जर उघडं ठेवलं, त्यावर प्लेट किंवा झाकण नसेल तर हे उघडं ठेवलेलं पाणी आपल्या घरातून बरकत काढून टाकतं. असलेला पैसा पाण्यासारखा वाहून जातो.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकार ले. ल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं ध श्र द्धे चा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद