अध्यात्मिक

कितीही पूजा पाठ हवन केल तरी फळ मिळत नाही, स्वामींनी सांगितलेली फक्त ही 1 गोष्ट करा…

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परं ब्रम्हं श्री सच्चिदानंद सदगुरू अवधूत चिंतन अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय, स्वामी नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवावेत हीच स्वामी चरणी प्रार्थना.

श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आज आम्ही तुम्हाला आपल्या स्वामी समर्थ महाराजांचे अतिशय सुंदर वचन सांगणार आहोत. नक्कीच माहीत पाहिजे त्यामुळे तुमचे जीवन सुखी होईल आणि स्वामीमय देखील होईल.

भक्तांनो ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भुत आणि अचंबित करणाऱ्या आहेत. स्वामींचा भक्त परिवार मोठा आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असल्याचे दिसते.

यातुन महाराज यांचे चरित्र त्यांचे संदेश शिकवण लिहिलेत, कीर्तन वाचन केले जातात. स्वामी केंद्रात जाता आले नाही तरी ते घरी राहून स्वामींची पूजा स्वामींच्या नामस्मरण उपासना करत असतात.

स्वामी समर्थ पाठीशी असल्याचे अनुभव त्यांचे भक्त नेहमी सांगत असतात. स्वामी समर्थांच्या लीला असतील, त्यांची कृती असेल, त्यांचे वचने असतील, कायम समाज बोधप्रद ठरत असतात त्यामुळे तुम्ही जर श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त किंवा सेवेकरी असाल तर तुम्हाला स्वामींनी सांगितलेली प्रत्येक बोध वचने ऐकली पाहिजेत.

श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे बोधवचन आपण सर्व स्वामी भक्तांनी ऐकले पाहिजे. कोणावरही आलेले वाईट वेळ निघून जाते, पण जाताना चांगल्या लोकांचे खरे रूप दाखवून जाते,त्यामुळे कपडे कितीही साफ आणि चकाचक असले तरी वाईट आणि मळलेले चरित्रे लपू शकत नाही .

त्यामुळे जीवनात प्रत्येक माणसाची कदर करायला शिकले पाहिजे कारण मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही आणि या जन्मातील माणसं पुन्हा पुन्हा भेटत सुद्धा नसतात त्यामुळे आपण प्रत्येकाशी प्रेमाने वागले पाहिजे.काही वेळा माणसाचे प्रकृती औषधाने नव्हे तर त्यांना शाब्दिक आधाराने ठीक होत असते म्हणून शब्दाला धार नको आधार पाहिजे.

आयुष्यात एखाद्याला रडवून तुम्ही कितीही पूजापाठ केली होमहवन केले तरी काहीच फायदा होणार नाही.मात्र तुम्ही रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणले तर तुम्हाला साधी अगरबत्ती देखील लावायची गरज पडणार नाही ,भक्तांनो हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे अतिशय सुंदर वचन तुम्ही ऐकलेच असेल आणि तुम्हाला कळले देखील असेल की आपल्या जीवनाचे काय महत्व आहे.

आपण आपल्या जीवनाची किंमत करायला सुरुवात केली पाहिजे कारण हे जीवन आणि आपल्या जीवनात आलेली अनेक माणसे मग त्यामध्ये मित्र नातेवाईक असतील हे कोणी असतील ते परत परत पुन्हा पुन्हा भेटत नसतात.म्हणून आपण आपल्या जीवनात प्रत्येक वेळेची आणि प्रत्येक माणसाची किंमत करायला शिकले पाहिजे आणि त्यांना जपून ठेवून पुढे जायला पाहिजे. हे स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेले आहे.

आपल्या स्वामी समर्थ महाराज माऊली नेहमी सांगतात की आपण सुखाचे झाडे जेव्हा दुसऱ्याच्या दारात लावतो तेव्हा त्या झाडाची फळे ही आपल्या अंगणात पडत असतात.तसंच आहे तेव्हा आपण निस्वार्थी मनाने दुसऱ्यांना मदत करत असतो त्यांच्या संकटात धावून जात असतो तेव्हा त्याचे पुण्य स्वामी समर्थ महाराज आपल्याला देत असतात.

स्वामी भक्तांनो आपण निश्चितच स्वामी समर्थांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे वागणार आहोत की ज्यामुळे आपले आयुष्य आपले जीवन सुखी होणार आहे .

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकार ले. ल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं धश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button