कितीही संकटे असू द्या आज या 2 वस्तूंचे दान करा दुर्भाग्य सौभाग्यात बदलेल..

आजच्या माहितीमध्ये आपण पाहणार आहोत की, आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलण्यासाठी काय करावे ते. शिव महापुराणात काही अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या वस्तूंचे दान केल्यास आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलू शकते. देवा दी देव महादेव हे भोलेनाथ आहेत. ते भक्तांच्या थोड्याशा पूजनानेही प्रसन्न होतात.
महादेवांच्या शिवमहापुरणात व्यक्तीचे दुर्भाग्य सौभाग्यात बदलण्यासाठी अशा सहा वस्तू सांगितलेल्या आहेत ज्या वस्तूंचे दान आपण केले तर महादेवांच्या आशीर्वादाने आपले दुर्भाग्य सौभाग्यात जरूर बदलेल. शास्त्रांमध्ये असे म्हंटलेले आहे की, दान केल्याने आपल्याला त्याची परतफेड 100 पटीने परत मिळते.
म्हणून दान करताना कधीही आपला हात आखडता घेऊ नये. असे म्हणतात की, देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. आता तुम्ही म्हणाल हे असे कसे काय? कोणी काही देत असेल तर काय त्या व्यक्तीचे हातही घेऊन टाकायचे का? नाही याचा अर्थ असा आहे की, नेहमी फक्त घेत राहू नका.
घेता घेता आपणही दान करण्याची सवय लावावी. म्हणजे आपलेही हात देणारे हात होतील. शिवपुराणात असेही म्हंटलेले आहे की, आपण महादेवांना एखादी वस्तू अर्पण केली किंवा महादेवांच्या नावाने एखादी वस्तू जर दान केली तर त्याचे सहस्त्र पटीने फळ आपल्या प्राप्त होते. म्हणून दान जरूर करावे. चला तर पाहुयात की, त्या कोणकोणत्या वस्तू आहेत.
त्यातील सर्वात पहिली वस्तू म्हणजे मीठ. मीठ हे सर्वात स्वस्त व सगळीकडे उपलब्ध असते म्हणून मिठाचे दान हे अगदी सहज करता येण्यासारखे दान आहे. मिठाचे दान केल्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रकारचे जे काही त्रास असतील त्या सर्व त्रासांपासून आपली सुटका होते. सोमवारी मिठाचे दान करणे खूप शुभ असते.
यामुळे आपले दारिद्र्य, दुर्भाग्य, संकटे, वाईट शक्तींचा वावर हे सर्वकाही दूर पळते. म्हणजेच आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलण्यासाठी मिठाचे दान करणे खूपच फायदेशीर असते. परंतु मिठाचे दान करताना या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे की, मीठ सरळ आपल्या हातातून कोणाच्या हातात ठेवू नये. जर जाड मीठ असेल तर त्याचे दान करणे तर खूपच चांगले असते.
परंतु जर जाड नसेल तर पुडीतल्या बारीक मिठाचा वापरही आपण दानासाठी करू शकतो. दुसरी वस्तू म्हणजे गूळ. गुळाचे दान केल्याने आपले नातेसंबंध सुधारतात. जर आपले कोणाशी पटत नसेल, पती-पत्नीचे संबंध बिघडले असतील, कोणाशी भांडण तंटे, वादविवाद होत असतील तर महादेवाच्या मंदिरात सोमवारी जाऊन गुळाचे दान करावे.
महादेवांनाही गुळ अर्पण करावा. तसेच पोळीमध्ये गुळ टाकून ती पोळी खायला दिल्यासही आपले नातेसंबंध मधुर होतात. तसेच देवी लक्ष्मीचीही प्राप्ती होते. पुढील वस्तु म्हणजे काळे तीळ. काळ्या तिळाचे दान केल्याने आपल्या आत्मविश्वासात वाढ होते. आपण सोमवारी किंवा शनिवारीही काळ्या तिळाचे दान करू शकतो.
पुढील वस्तू म्हणजे साजूक तूप. साजूक तुपाचे दान केल्याने आपले आरोग्य सुधारते, आजारपण आपल्यापासून दूर राहतात. मुले जर वारंवार आजारी पडत असतील तर मुलांच्या हाताने साजूक तुपाचे दान करावे म्हणजे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल. गाईचे तूप असेल तर खूपच चांगले. महादेवांनाही साजूक तूप अर्पण केल्यास आजारपण व संकटांपासून आपले रक्षण होते आणि धनसंपदा मिळते.
पुढील वस्तू म्हणजे धान्य. कोणत्याही प्रकारची वेगवेगळी धान्ये जर आपण दान केले तर देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वाद आपल्याला मिळतो व आपल्या घरात भरभराट येते. कोणत्याही प्रकारच्या अन्नधान्याची कमतरता कधीच भासत नाही. ज्यांच्या घरात देवी अन्नपूर्णा सदा निवास करते अशा घरातून देवी लक्ष्मीही बाहेर जात नाही. म्हणून अन्नधान्य धनसंपदा या दोघांचे भरभराट आपल्या घरात राहते.
पुढील वस्तू म्हणजे कपडे. कपड्यांचे दान केल्याने आपण दीर्घायुषी होतो, आपले आयुष्य वाढते. कोणत्याही गरीब व गरजू व्यक्तींना कपडे, ब्लँकेट आपल्याला जे काही शक्य होईल ते दान जरूर करावे. परंतु जुने कपडे कधीही दान म्हणून देऊ नयेत.
नवीन कपडे आणून त्या कपड्यांचे दान केल्यास आपले दुर्भाग्य सौभाग्याच बदलते. आपल्या जीवनात चांगल्या चांगल्या घटना घडू लागतात. मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की, महादेवांना प्रसन्न करण्यासाठी व आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलण्यासाठी कोणकोणत्या वस्तूंचे दान करावे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news