उपाय

कितीही संकटे बाधा असो बुधवारी करा हा गणपती चा उपाय सर्व संकटे बाधा दूर होतील…

आठवड्यातील बुधवार हा श्री गणेशांचा वार असल्याचे मानले जाते श्रीगणेशांना सर्व दुःखांचे निवारण करणारे दुखहर्ता मंगलमूर्ती असे म्हटले जाते हिंदू धर्मात आ पूजेचा म्हणजेच सर्व देवी-देवतांना मध्ये प्रथम पूजेचा मान हा गणपती बाप्पांचा आहे गणपती बाप्पांचे पूजन हे भौतिक दैविक आणि अध्यात्मिक कार्याच्या पूर्ततेसाठी केले जाते बुधवारी श्री गणेश यांचे विधिवत व श्रद्धापूर्वक पूजन केलेकी सर्व प्रकारच्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतात आपल्या कुंडलीमध्ये जर बुध ग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल तर बुधवारी केलेल्या पूजेमुळे तो ग्रह शांत होतो आज आपण बुधवारी करण्याचे अगदी साधे सोपे असे काही उपाय जाणून घेणार आहोत जे केल्याने गणपती बाप्पांची आपल्यावर कृपा होईल आणि आपल्या आर्थिक समस्या दूर होऊन आपण समृद्ध व्हाल हे उपाय आपण दिवसभरात कधीही कोणत्याही वेळी करू शकतो

गणपती अथर्वशीर्षाचे वाचन करणे गणपती अथर्वशीर्ष हे गणपती बाप्पांचे खूप आवडते आहे आणि बुधवारी जर आपण अथर्वशीर्षाचे वाचन केले तर गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर खूप लवकर होते.

प्रत्येक बुधवारी गणपतीबाप्पांना एक दुर्वांची जुडी अर्पण करावी त्याबरोबरच लाडू व मोदकांचा नैवेद्य दाखवावा यामुळे ही गणपती बाप्पा खुश होतात दुर्वांमध्ये गणपती बाप्पांचे आवडते एक जास्वंदीचे लाल रंगाचे फूल ही अर्पण करावे म्हणजे गणपती बाप्पांची कृपा होऊन ते आपल्याला सर्व संकटांपासून देखील वाचवतील

किन्नराला काही पैसे दान करावेत आणि त्यातून एक रुपया त्यांच्याकडून मागून घ्यावा तो रुपया घरी आणून देव घरात ठेवावा व रात्रभर तसाच राहू द्यावा आणि दुसऱ्या दिवशी एका लाल कापडामध्ये बांधून आपल्या तिजोरीत गल्यात किंवा पाकीटामध्ये ठेवून घ्यावा यामुळे तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही तुम्हाला शक्य झाल्यास जेव्हा कधीही किन्नर दिसेल तेव्हा तुम्ही अशा प्रकारे नाणे घेऊन जुने नाणे सामान्यापर्यंत वापरून नवीन नाणे पुन्हा तसेच ठेवू शकता यामुळे तुमची भरभराट होईल

एक तांत्रिक तोटका आहे यासाठी एका पूजेच्या सामग्रीच्या दुकानातून सात कवड्या आणाव्यात ज्या पूजा सामग्रीच्या दुकानात सहज मिळतात आणि त्यात एक मूठभर हिरवे मूग घ्यावे या दोन्ही वस्तू एका हिरव्या कापडात ठेवून त्यांची गाठोडी तयार करावी व गुपचुप जाऊन ती गाठोडी गणपती बाप्पांच्या मंदिराच्या पायऱ्यांवर ठेवून यावी पण हा उपाय करताना कोणालाही काहीही सांगू नये व कोणाला दिसणार नाही अशा प्रकारे ही गोठोडी गुपचूपपणे ठेवून द्यावी परंतु मनोभावे व श्रद्धा पूर्वक हा उपाय तुम्हाला करायचा आहेत यामुळे तुमची संकटे अडचणी आणि काही समस्या असतील तर या सर्वांपासून आपल्याला मुक्तता मिळेल

जर तुम्ही खूप कर्जबाजारी झाला असाल व कर्जापासून मुक्त होण्याची तुमची इच्छा असेल तर सव्वा पावशेर हिरवे मूग घेऊन ते शिजवून घ्यावे त्यात एक चमचा साखर व एक चमचा तूप टाकून बुधवारी हे मिश्रण गाईला खाऊ घालावे यामुळे आपल्या उत्पन्नात वाढ होईल व हळूहळू कर्जापासून आपल्याला मुक्तता मिळेल हा उपाय आपल्याला जोपर्यंत कर्ज फिटत नाही तोपर्यंत प्रत्येक बुधवारी करायचा आहे याचा परिणाम खूपच लवकर दिसून येईल

बुधवारी गणपती बाप्पांच्या मंदिरात जावे किंवा घरी गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला शेंदूर अर्पण करावे आणि पाच मूठभर हिरवे मूग हिरव्या कापडात बांधून त्याचे गाठोडे तयार करावे गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप करताना सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर हे गाठोडे पाण्यात अर्पण करावे असे केल्याने नोकरी आणि व्यवसायासह आर्थिक संकटात पासूनही आपल्याला
मुक्तता मिळते

नारद पुराणानुसार बुधवारच्या दिवशी अकरा वेळा गणेश चालीसा किंवा गणेश स्तोत्राचे वाचन केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात घरातील शांतता कायम राहते

दुसरीकडे कारकिर्दीत वृद्धी होण्यासाठी गाईला हिरवा चारा खायला द्यावा आणि गोमातेचे आभार मानावे असे केल्याने बुध दोषापासून आपला प्रभाव कमी होतो आणि करिअरमध्ये प्रगती ची शक्यता निर्माण होते

बुधवारी तुम्ही किन्नरांना हिरवी कपडेही दान करू शकता यासह तुम्ही कोणत्याही मंदिरात किंवा गरजुंना हिरवे मूग दान करू शकता असे केल्याने आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बळकट होतो आणि आरोग्याची संबंधित समस्या ही पासून ही आपल्याला मुक्ती मिळते बुधवारी या गोष्टींचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते

बुधवार हा श्री गणेशांचा वार आहे त्याशिवाय गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी मुगाचे लाडू अर्पण करावे असे सलग सात बुधवार करावे असे केल्याने आपल्या सर्व ईच्छित कामना पूर्ण होतात आणि बुध ग्रहाचा दोषही संपतो तर हे आहेत ते साधे व सोपे उपाय जे तुम्ही बुधवारी करून गणपती बाप्पाची कृपा प्राप्त करू शकता व आपल्या जीवनात सुखसमृद्धी आणि भरभराट आणू शकता

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button