श्रावणात कुलदेवीची ओटी कशी भरावी? सविस्तर वाचा.

नमस्कार आपला पवित्र महिना श्रावण सुरू झालेला आहे. या श्रावण महिन्यामध्ये देव देवतांची पूजा वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. त्यांचे नामस्मरण जप केले जातात. आणि श्रावण महिन्यामध्ये देवांच्या सेवा देखील भरपूर केल्या जातात. कारण हा श्रावण महिना खूप पवित्र आणि प्राण महिना आहे. श्रावण महिना तर महादेवांचाच महिना म्हणून ओळखला जातो. आणि महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी बरीच सेवा केली जाते. त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांचे देखील सेवा केली जाते.
या महिन्यांमध्ये कुलदेवतेची लक्ष्मी मातेची दुर्गा मातेची काली मातेची ओटी भरली जाते. ओटी कशा पद्धतीने भरायची आहे. कुलदेवतेची लक्ष्मी मातेची किंवा अन्य कोणत्याही देवीची ओटी कशी भरायची असते. याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत मित्र-मैत्रिणींनो तुम्हाला देखील श्रावण महिन्यामध्ये देवीची ओटी भरायची असेल, तर देवीचा वार म्हणजेच मंगळवार किंवा शुक्रवार या दोन्ही वारांपैकी कोणत्याही एका दिवशी देवीची ओटी आपण भरू शकता.
देवीची ओटी भरण्यासाठी आपल्याला साडी लागणार आहे. ही साडी सुती किंवा रेशमी असायला हवी सुती किंवा रेशमी साडी यासाठी हवी आहे. देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी या कापडांमध्ये धरून ठेवण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात असते. देवीची साडी असेल तर आपल्याला ओटी भरता येते. साडी घ्यायची आहे. आणि त्यावर एक खण ठेवायची आहे.
आणि त्या खनिवर आपल्याला नारळ ठेवायचा आहे. नारळ ठेवत असताना नारळाची शेंडी देवीकडे असेल अशा पद्धतीने तो नारळ ठेवायचा आहे.
ओटीचे सामान घेतल्यानंतर आपले दोन्ही हात आपल्या छातीजवळ येतील, अशा पद्धतीने देवीच्या समोर उभे राहायचे आहे. देवीकडून चैतन्य मिळावे व आपले अध्यात्मक उन्नती व्हावी यासाठी देवीला कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे. साडी खण नारळ देवीच्या चरणावर अर्पण करावे. त्यानंतर तांदळाने देवीची ओटी भरावी तांदूळ हे धान्य सर्व समावेशक धान्य आहे. त्यामुळे चैतन्य ग्रहण करण्यात व प्रक्षेपण करण्यास कार्यक्षम असतात. त्यामुळे ओटी भरत असताना प्रामुख्याने तांदळाचा समावेश केला जातो. कधीही ओटी भरत असताना तांदळानेच ओटी भरायची आहे.
आणि आपण देवीच्या चरणावर जे वस्त्र अर्पण केलेले आहे. ते वस्त्र तिचा आशीर्वाद म्हणून स्वतः घालावे. आणि ओटी भरण्यासाठी आपण जो नारळ ठेवलेला आहे. तो नारळ प्रसाद म्हणून खावा. कुलदेवीची किंवा अन्य देवीची घरच्या घरी ओटी भरण्याची खूप साधी आणि सोपी पद्धत आहे. घरच्या घरी देवीची ओटी भरण्यासाठी आपल्याला एक सुती रेशमी साडी लागणार आहे. आणि एक खण व नारळ हे सर्व एकत्र करून ते आपल्या हातामध्ये घ्यायची आहे. आणि आपली जी काही इच्छा आहे. जे काही मागणी आहे, ते देवीजवळ मागायचे आहे.
आणि देवीच्या चरणावर ती साडी ठेवायची आहे. देवीच्या चरणावर साडी ठेवून झाल्यानंतर पाच किंवा सात मोठी तांदूळ घेऊन त्या साडीवर ठेवायची आहे म्हणजेच ती ओटी भरायची आहे. आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून देवीला प्रार्थना करायची आहे. आणि ती साडी दिवसभर रात्रभर त्या ठिकाणीच ठेवायची आहे. ती साडी आपण स्वतः वापरू शकतो. किंवा गरीब इतर कोणत्याही स्त्रीला ती साडी दिली तरी चालते. आणि ओटी भरण्यासाठी जो नारळ आपण वापरलेला आहे. तो नारळ प्रसाद म्हणून खाऊ शकता. अशा सोप्या पद्धतीने श्रावण महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची किंवा इतर कोणत्याही देवींची ओटी घरच्या घरी भरू शकता
टीप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रका रची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजा ने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोच वल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news