कुठल्याही परपुरूषाला स्पर्श झाला की होत होतं असं काही… जे घडलं ते पाहून अंगावर का उभा राहील…?

ती तिच्या मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये कॉफी घेत होती. एकमेकांमधे काहीतरी बोलणं झालं होत आणि आता दोघीही गप्प बसल्या होत्या. तिच्या मैत्रिणीने कॉफीचा कप टेबलावर ठेवला आणि तिच्या हाताला हात लाऊन बघितल. मग तिने तिच्या दंडाला आणि नंतर मग तिच्या गालावर हात ठेवून पाहिले.
” अग तू पूर्णपणे सामान्य आहे.”, “हो… आता… कारण… कारण तू मला स्पर्श करत आहेस”, “काय बोलतोयस?”, “माझ्यावर विश्वास ठेव… हे माझं अंग त्यावेळेला अस नसत… म्हणजे असच दिसत पण… हात लावल्यावर चटका बसावा इतकं गरम झालेल असतं. “हे खूप हास्यास्पद आहे.”, “हो… आहे… पण… पण खरं आहे”
“मी तुला सांगते, जेव्हा जेव्हा एखादा माणूस मला स्पर्श करतो, म्हणजे तो सहन करू शकत नाही, माझ्या शरीराचा चटका”, “हे कसे शक्य आहे?”, “मला माहित नाही… पण हे माझ्या बाबतीत घडत आहे”, ” म्हणजे तुला म्हणायचे आहे की, या तुझ्या वयाच्या पस्तिशित च तुझ्या सगळ्या भावना मेल्या आणि तुला आता त्यात काहीच रस नाही, आणि म्हणून हे सगळ होत आहे का..?
“नाही, मी खोटं का बोलू?, आहेत भावना अजूनही, तीन वर्षांपूर्वी तो गेला, पण त्यानंतर मी स्वतःची काळजी घेण्याचा खूप प्रयत्न केला… आणि काळजी घेतली सुद्धा, शरीर आणि मनाचीही काळजी घेतली… पण… पण माझीही एक नैसर्गिक गरज होती, आणि ती येणारच ना, मी तेच सांगतेय तुला की गेल्या वर्षभरात मला असे तीन वेळा आकर्षक क्षण आले.
जेव्हा मी सर्वकाही काढून टाकण्यास आणि माझे सर्वस्व देण्यास तयार होतेपण… पण ते तिघेही माझ्या जवळ आले, पण अक्षरश: काहीतरी जळल्यासारखे माझ्यापासून दूर गेले… जणू माझे शरीर धगधगत्या भट्टीसारखे होते. “अरे पण कसं?” म्हणजे… हे कसं शक्य आहे?”, “मी फक्त विचार करत होते याचा आणि … आणि मला बहुतेक मला उत्तर मिळाले.”, “काय? तुला उत्तर मिळाले आहे का?”, “मला असे वाटते, दोन दिवांपूर्वीच माझ्यापासून लांब होताना तो बोलला की, तुझ्या अंगातून भयानक धग बाहेर पडतेय.. हो, धगच…!
” मला कळेल अस सांगशील का?”, “मी वयाच्या बत्तीसाव्या वर्षी विधवा झाले, ज्या वयात एक स्त्री पूर्ण बहरलेली असते, त्याच वेळी, मी माझ्या हक्काच्या सुखपासून वंचित झाले होते. माझ्या पतीची चिता जळत असताना, चिता शांत होईपर्यंत मी बाजूला उभी राहिली.”, “तर काय?, म्हणजे समाजाचं न ऐकता ती तिथे गेलीस आणि स्मशानात शेवटपर्यंत थांबलीस,
त्याबद्दल कौतुक आहे मला तुझं…कारण ज्याला त्याच्या जाण्याने सर्वात जास्त फरक पडतो, त्याने फक्त घरूनच निरोप घ्यावा का? स्मशानात जाण्यासाठी शेवटची सोबती पण व्हायचे नाही?… आणि ती एक स्त्री आहे म्हणून का?… हे सर्व बकवास आहे… “पण आता वाटतंय, मी तिथे गेलेच नसते तर?, तरच बरं झालं असत. “काय? काय बोलतेय तु?”
“हो, पूर्ण दोन तास मी त्या आगीच्या धगित होते.” आणि तीच धग’ बहुधा माझा नवरा माझ्याभोवती संरक्षक कवच सारखी लपेटत होता.जेणेकरून त्याच्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकणार नाही.”, “तू वेडी आहेस का? हे कसे होऊ शकते?”, “मी तुला सांगते, त्या रात्री माझा नवरा माझ्यासोबत, माझ्या जवळ आला होता, पण मी खूप थकलेले… त्याने खूप प्रयत्न केले, त्याने सांगून समजावून, मस्का मारून,
पण त्या रात्री मी त्याला रिस्पॉन्स दिलाच नाही. आणि मग चिडचिड करून झोपला तो, पण थोड्या वेळाने मला त्याची हालचाल जाणवली आणि मी गाढ झोपले. सकाळी डोळे उघडल्यावर बघितल तर त्याची हालचाल कायमचीच थांबली होती. मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले होते. मी… मी त्याला त्या रात्री माझ्या शरीराजवळ येण्यास संमती दिली नाही… आणि आता… आता तो माझ्या शरीराजवळ इतर कोणत्याही पुरुषाला येऊ देत नाही.
त्याच्यातला तो पुरुषी असंतोष, त्याच्या चीतेची ती धग आता माझ्या शरीराला कवटाळून बसली आहे. आणि ती धग मला परपुरूषा पासून दूर ठेवते… म्हणूनच मला आता माझे पुढचे दिवस केवळ शरीरानेच नाही तर मनानेही होरपळत घालवायचे आहेत. हे सर्व ऐकून तिची मैत्रीण स्तब्ध झाली. मेल्यानंतर सुद्धा एखाद्याच एखाद्याच्या शरीरावरील हक्क न सोडणे तिने अनुभवलं होत…
कॉफीचे बिल भरून दोघीही उठल्या. जाताना तिने पर्समधून दहा रुपये काढून वेटरला दिले. ते घेताना त्याच्या बोटांचा हलकेच स्पर्श तिला झाला आणि जोरदार चटका बसल्यासारखा त्याने हात मागे घेतला. तिने मैत्रिणीकडे पाहिले. मैत्रिणीने पुन्हा तिच्या हाताला हात लाऊन पाहिलं. तिला ते सामान्य च जाणवलं…!
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद