लग्नाला बघायला गेलेल्या मुलीशी बोलायची सुरुवा त कशी करावी?

घड्याळ पाहून गुडमॉर्निंग, एव्हनिंग वगैरे ठरवावं. मराठीत अभिवादन करणार असाल तर सरळ नमस्कार वगैरे म्हणू शकता, पण ते खूपच औपचारिक होईल. ‘Hi’ हा पर्याय तसा बरा वाटतो.
दोघांनीही पूर्वसंमतीनेच एकमेकांचा एकेरी उल्लेख करावा, अन्यथा ते उद्धटपणाचं वाटेल. एकदा लग्न ठरलं की अरे, तुरे, मी रे, मीच रे वगैरे गोष्टी होणारच वातावरणाचा हाल हवाल विचारू शकता, पण जास्त खोलात शिरू नये, नाहीतर चर्चा पावसापासून सुरू होऊन कांद्याच्या दरवाढीवर येऊन थांबेल.
‘घर छान सजवलंय’ अशी कॉम्प्लिमेंट देऊ शकता, पण त्यासाठी खरंच घर सजवलेलं असायला हवं नाहीतर पोपट होऊ शकतो. घर भाड्याचं असेल तर मासिक भाडं आणि डिपॉसिट याची चौकशी करू नये.
पोहे कुणी बनवलेत? असा गहन प्रश्न विचारू नये. सिनेमात सगळं खोटं खोटं दाखवतात.मुलीला पोहे बनवण्याइतका वेळ मिळत असेल असं वाटत नाही. शिवाय आजकाल रेडी-टू-इट वाले पॅकेट्स मिळतात, उगाच इथेही पोपट व्हायचा.
पहिल्याच भेटीत सगळ्या अटी व शर्ती मान्य करू नये. आयुष्यभर पाळले जातील असेच प्रॉमिस करावेत. मुलींची स्मरणशक्ती मजबूत असते, नंतर वांदा नको. कार्यक्रम आटोपल्यावर लगेच Whatsapp नंबरची देवाणघेवाण करू नये. बऱ्याचदा Interview उत्तम होऊनही निवड होत नाही.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news