अध्यात्मिक

मागच्या जन्मातील कर्माची फळं असतात या ४ प्रकारची मुलं, आईवडिलांना देतात खूप त्रास.

पूर्वजन्मातील कर्मानुसारच आपल्याला या जन्मात आई वडील भाऊ बहीण पती पत्नी प्रियकर प्रियसी मित्र शत्रू सगे संबंधी आणि नातेवाईक इत्यादी या जीवनातील जे काही नाते संबंध आहेत ते मिळतात. कारण या सर्वांना आपल्याला काही द्यायचे असते अथवा त्यांच्याकडून काहीतरी घ्यायचे असते. आज आपण जाणून घेणार आहोत कि आपल्या मुला बाळांच्या रूपात आपल्या घरी कोण येते. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊ मित्रांनो तसे तर संतान रूपात आपल्या पूर्व जन्मातील कोणीतरी नातेवाईकच जन्म घेत असतात. ज्याला शास्त्रांमध्ये चार प्रकारे सांगितले गेले आहे.

यातील पहिले म्हणजे उदासीन पुत्र – या प्रकारची संतान आपल्या आई वडिलांची सेवा तर करीतच नाहीत व त्यांना त्रासही देत नाहीत. आई वडिलांची जी परिस्थिती आहे तशाच परिस्थितीत त्यांना राहू देते. एकदा विवाह झाला कि आई वडिलांपासून वेगळे म्हणजे त्यांच्यापासून दूर राहणे पसंद करतात.सेवक पुत्र – मागील जन्मी जर आपण कोणाची खूप जास्त सेवा केली असेल तर असा जीव त्यांच्यावरील सेवेचे ऋण उतरवण्यासाठी या जन्मात आपली संतान म्हणून जन्म घेतो आणि आपल्या सोबत आपले जीवन घालवतो. आपण जे पेरले असेल तेच तर उगवेल ना. आपण जर आपल्या आईवडिलांची सेवा केली असेल तर म्हातारपणात आपले मुले मुली आपली सेवा करतील. नाही तर कोणी पाणी पाजणारे देखील भेटणार नाही.

दुसरे म्हणजे ऋणानुबंध – मागील जन्मातील असा कोणी जीव याच्याकडून मागील जन्मी आपण ऋण घेतले असेल किंवा ज्याचे धन आपण नष्ट केलेले असेल असा जीव आपल्या घरात आपली संतान म्हणून जन्म घेतो व आपले धन त्याचे आजा रपण किंवा कोणत्याही वायफळ गोष्टींवर खर्च करणे अशा प्रकारे नष्ट होत राहते. जो पर्यंत त्या जीवाचा हिशोब संपूर्ण क्लियर होत नाही तोपर्यंत असेच चालते.

पूर्वशत्रू – मागील जन्मातील आपला एखादा शत्रू त्याचा बदल पूर्ण करण्यासाठी आपल्या घरात संतान म्हणून जन्म घेतो व मोठा झाल्यावर आपल्या आईवडिलांना मार झोड करणे, भांडण तंटे करणे, त्रास देणे अशा प्रकारे संपूर्ण आयुष्य भर त्यांना त्रासच देत राहतो. अशी संतान नेहमी वाईट साईट बोलून त्यांना दुखी करते, अपमानित करते व त्यांचे दुःख पाहून स्वतः आनंदी होईल.

मित्रांनो असे नाही कि या सर्व गोष्टी मनुष्य प्राण्यावरच लागू होतात. वर सांगितलेल्या चार प्रकारांमध्ये कोणताही जीव येऊ शकतो. जसे आपण एखाद्या गाईची निस्वार्थ भावनेने सेवा केली असेल तर ती देखील आपला मुलगा किंवा मुलगी बनून येऊ शकते. जर तुम्ही एखाद्या गाईला स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त दुधासाठी पाळले असेल व तिने दूध देणे बंद केल्यानंतर तुम्ही तिला सोडून दिले असेल तर तीच तुमची ऋणानुबंध म्हणून जन्म घेईल व आपले कर्ज परत मागेल.जर आपण एखाद्या निरअपराध जीवाला त्रास दिला असेल तर असा जीव आपल्या जीवनात आपली संतान शत्रू बनून येईल व त्याचा बदला घेईल.

म्हणूनच जीवनात कधीही कोणाचे वाईट करू नये. कारण निसर्गाचा हा नियमच आहे कि आपण जे काही कर्म करतो त्याची परतफेड आपल्याला या जन्मात नाही तर पुढील जन्मात अधिक पटीने मिळते. जर तुम्ही कोणाला एक रुपया दिला असेल तर तुमच्या खात्यात शंभर रुपये जमा होतील.

जर तुम्ही कोणाचा एखादा रुपया लुबाडला असेल परतफेड केली नसेल तर तुमच्या खात्यातून शंभर रुपये कमी होतील. विचार करा कि आपण येताना बरोबर कोणते धन आणले होते आणि आपण गेल्यानंतर बरोबर काय घेऊन जाणार आहे ? आपण मेल्यानंतर जे काही मागे उरते घर, गाडी, जमीन, बंगला, पैसा हे सर्व व्यर्थ आहे. देव तुम्ही माणूस म्हणून कसे जगलात हे बघतो. मी, माझे, मला हे सर्व इथल्या इथं राहणार आहे, काहीच आपल्या सोबत येणार नाहीये.

आपल्या बरोबर काही जाणार असेल ते म्हणजे फक्त आणि फक्त आपली कर्मे. आपले चांगले वर्तन. म्हणून जेवढे शक्य होईल तेवढे पुण्य साठवण्याचे कार्य करा. चांगली कर्मे करा. वाईट कर्मांपासून दूर राहून सत्कर्म करा. इतरांची सेवा करा. कोणाचे चांगले करता येत नसेल तर निदान वाईट तरी करू नका.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button