अध्यात्मिक

मानवी मुख असलेली जगातील एकमेव गणेशाची मूर्ती.. 99% लोकांना हे माहीती नाही..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. जाणून घ्या, मनुष्याचं मुख असलेल्या गणपतीच्या मूर्तीबद्दल.. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लोकमान्य टिळकांनी हा सार्वजनिक गणेशोत्सव समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला भव्य स्वरुप दिलं. आणि आज त्याला खऱ्या अर्थानं व्यापक स्वरूप प्राप्त झालंय. महाभारताचा लेखक म्हणून गणपतीकडे पाहिलं जातं.

अन्य देवतांप्रमाणे गणपतीनेही प्रत्येक युगात अवतार घेतले आहेत. गणपतीचे अनेक अवतार अगदी प्रसिद्ध आहेत. गणपतीचे स्वरुप आपण नेहमी गजमुखात पाहतो. मात्र, गणपतीला गजाचे मुख लावण्यापूर्वी म्हणजेच मानवी मस्तक असलेल्या रूपामध्ये गणपतीची मूर्ती असलेले मंदिर भारतात आहे. याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? चला तर जाणून घेऊयात भारतातील गणपतीच्या या अनोख्या मंदिराबद्दल…

फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात गणपतीचं पूजन केलं जातं. अगदी अफगाणिस्तानपासून ते जपानपर्यंत गणपतींची प्राचीन मंदिरं असलेली पाहायला मिळतात. तसेच हजारो वर्षांपासून तिथे गणपतीची पूजा केली जाते.

आता जगभरात प्रत्येक राष्ट्रात पोचलेल्या मराठी मंडळींनी आपल्या सोबत गणपती बाप्पाही तिथं नेला आहे. त्यामुळं गणेशोत्सव आता व्यापक स्वरूपात पाहायला मिळतो. स्त्री रूपातील वैनायकी, स्त्रीपुरुष रूपामध्ये एकत्र असलेला जपानमधील कांगितेन, अशा विविध रूपामध्ये गणपतीच्या प्राचीन मूर्ती पाहायला मिळतात.

जगभरातील गणपतीच्या प्रत्येक मूर्तीमध्ये गणेशाचे शीर हे गजमुख असलेलं आपण पाहतो. त्यामुळं गणपतीच्या अन्य रुपाची कुणी कल्पनाही करू शकत नाही. मात्र, दक्षिण भारतात गणपतीला गजाचे शीर लावण्यापूर्वी म्हणजे मानवी मस्तक असलेल्या रूपात गणपतीची मूर्ती असलेलं एक मंदिर आहे.

मनुष्याचं मस्तक असलेली ही जगातील एकमेव गणेश मूर्ती असल्याचं मानलं जातं. तामिळनाडूमध्ये कुथनूरपासूनजवळ तिलतर्पणपुरी जवळ हे मंदिर आहे. ‘आदि विनायक’ असं या मंदिराचं नाव आहे. गजमुखी अवतारापूर्वी मानवी रुपात असलेल्या गणपतीच्या मूर्तीमुळे याला आदि गणपती असं म्हटलं जात असावं.

गणपतीचे मंदिर असलेल्या भागाला तिलतर्पणपुरी म्हणून ओळखलं जातं. मात्र, यामागे एक श्रीरामचंद्रांशी निगडीत पौराणिक कथा आहे. या कथेनुसार, प्रभू रामचंद्र हे आपला पिता दशरथ यांचं श्राद्ध आणि पिंडदान करण्यासाठी आले. मात्र, पिंडदान केल्यावर त्या पिंडाच्या जागी किडे दिसू लागले.

श्रीरामांनी पुन्हा पिंडदान केले. मात्र, पुन्हा तिथं किडे दिसायला लागले. असं अनेकदा घडल्यावर शेवटी श्रीरामांनी महादेव शिवशंकराची आराधना केली. महादेवांची आराधना केल्यानंतर महादेव तिथं प्रकट झाले आणि त्यांनी श्रीरामांना मंथरावान या ठिकाणी जाऊन पिंड दान करण्यास सांगितलं.

त्यानुसार श्रीरामांनी तत्कालीन मंथरावन इथं जाऊन पिंडदान केलं. आश्चर्य म्हणजे श्रीरामांनी ज्या ठिकाणी पिंडदान केलं होतं त्याच ठिकाणी त्या चार पिंडांची चार शिवलिंगे तयार झाली. आजच्या काळातही ती शिवलिंगे या ठिकाणी पाहायला मिळतात. हा भाग मुक्तिश्वर या नावाने ओळखला जातो.

तिलतर्पणपुरी तीर्थाजवळच हे विशेष मानवी मुख असलेल्या गणपतीचं मंदिर आहे. महादेव शिवशंकराने गणेशाचे मानवी शीर भंग करण्यापूर्वीचे हे गणेशाचं रुप आहे, असे मानले जाते. म्हणूनच याला आदिगणेश किंवा नरमुख गणेश म्हणतात. या गणेशाला चार हात आहेत. उजवा पाय खाली सोडून ध्यानस्थ बसलेली ही गणेशाची मूर्ती आहे. लाखो भाविक दरवर्षी या गणपतीच्या दर्शनाला जात असतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button