मार्गशीर्ष गुरुवार कधी सुरु होत आहेत.? महालक्ष्मी व्रताची तिथी.. महत्त्व व पूजा विधी जाणून घ्या.

नमस्कार मित्रांनो हिंदू धर्मियांमध्ये व विशेषतः महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी वैभव लक्ष्मी व्रत करण्याची मान्यता आहे. दिवाळीनंतर थंडावलेला उत्साह मार्गशीर्ष गुरुवारच्या निमित्ताने पुन्हा जीवित होतो. हिंदू धर्मियांमध्ये व विशेषतः महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी वैभव लक्ष्मी व्रत करण्याची मान्यता आहे. महालक्ष्मीचे पूजन करून घट मांडण्याची पद्धत प्रचलित आहे. या महिन्यात सवाष्णींना वाण देण्याला तसेच कन्या पूजेला विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिना यंदा 24 नोव्हेंबर पासून सुरु होत आहे. 24 नोव्हेंबरला कार्तिक अमावस्या असून याच्या दुसऱ्याच दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारचा योग जुळून आला आहे. यंदा कोणत्या तारखेला मार्गशीर्ष गुरुवार असतील तसेच, या गुरुवारच्या व्रताचे महत्त्व, पूजा विधी काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.
मार्गशीर्ष गुरुवार महत्त्व – आपल्या कुटुंबाला धन- धान्य- समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात. द्वापार युगात सौराष्ट्रचा राजा भद्रश्रवा, भद्रश्रवाची राणी सुरतचंद्रिका, भद्रश्रवाची कन्या शामबाला व महालक्ष्मी यांच्या कथेचे पठण या व्रताच्या निमित्त करण्याची पद्धत आहे. आपल्याकडे जे जे चांगले आहे त्याप्रती सद्भावना ठेवणे व समाधान मानणे का महत्त्वाचे आहे हे भद्र श्रवाराजाच्या कथेतून महालक्ष्मी सांगितले आहे अशी भाविकांची श्रद्धा असते.
मार्गशीर्ष गुरुवार 2022 तारीख – यंदा मार्गशीर्ष मासाचा पहिलाच दिवस म्हणजेच 24 नोव्हेंबर हा मार्गशीर्ष गुरुवार आहे. तर 24 डिसेंबरला मार्गशीर्ष अमावस्या आहे. यादरम्यान चार मार्गशीर्ष गुरुवार येत आहेत. यंदा 24 नोव्हेंबर, 1 डिसेंबर, 8 डिसेंबर, 15 डिसेंबर व 22 डिसेंबर या दिवशी मार्गशीर्ष गुरुवार आहेत.
मार्गशीर्ष गुरुवार पूजाविधी – मार्गशीर्ष गुरुवारी घट मांडण्याआधी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा. चौरंगावर लाल कपडा ठेवून त्यावर तांदूळ व वर तांब्याचा कलश ठेवावा. कलशाला हळद-कुंकु लावून आत दूर्वा, एक नाणं आणि सुपारी घालावी. विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी, पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा.
तसेच चौरंगावर श्री लक्ष्मीदेवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे. कलशापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा. आपण आपल्या इच्छेप्रमाणे व शक्य होईल तसा नैवेद्य मनोभावे दाखवू शकतात.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news