मी स्वामींकडे काय मागत नाही कारण स्वामी मला काय कमी पडू देत नाहीत, मला आलेला स्वामींचा अनुभवश्रीस्वामी समर्थ.

नमस्कार मंडळी, आपण स्वामींची नियमित भक्ती करतो, स्वामींचे आलेले अनुभव बघत असतो, जेणेकरून स्वामी भक्तांना अजून विश्वास वाढेल व स्वामींची श्रद्धा वाढून तुम्हाला सुख मिळेल. आज स्वामींचा आलेला अनुभव आपण बघणार आहोत.आमच्या घरातील सर्व लोक स्वामींची भक्ती करतात. आम्ही स्वामींचे भक्त असून सेवा केंद्रामध्ये सांगितल्या जाणाऱ्या सर्व सेवांमध्ये सहभागी होतो. त्याचेच फळ म्हणून मी पहिल्याच प्रयत्नात इंजिनिअरिंग उत्तीर्ण झालो. अशीच कृपा स्वामी सर्वांच्यावर करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना.
स्वामी माझ्या प्रत्येक गोष्टीत साथ देतात कारण मी लहानपणापासून स्वामींच्या सेवेत कार्यरत आहे. मला बारावी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा होता, मात्र मला भीती वाटत होती. मला जमेल की नाही यानंतर मी स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेतले. व स्वामींचा आशिर्वाद घेतला.
माझ्या इच्छेनुसार मला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला. मला मात्र वारंवार भीती वाटत होती. यानंतर स्वामी एकदा माझ्या स्वप्नात आले व त्यांनी सांगितले भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. मग मला धीर वाटला. यानंतर स्वामींनी स्वप्नात आशिर्वाद दिला, यानंतर अधिक जोमाने मी सेवा करू लागलो. मग ठरवलं आता इंजिनिअर व्हायचं.
आमची घरची परिस्थिती मध्यम स्वरूपाची होती. कॉलेजची फी भरण्यासाठी देखील पैसे न्हवते. अनेक नातेवाईकांकडे मागणी केली मात्र कोणीच मदत केली नाही. अनेकांनी तुला जमणार नाही तू हे शिक्षण सोडून दे म्हणून सांगितले. पण मला विश्वास होता स्वामी नक्कीच काहीतरी करतील.
असेच दिवस जात होते, अचानक एक दिवस कॉलेज मध्ये शिक्षकांनी फी भरण्यास सांगितले. मात्र मला आता वाटले माझं शिक्षण संपणार, पण एक मन म्हणत होतं स्वामी काहीतरी करतील.पण दुसरं मन म्हणत होते, स्वामी पैसे कसे देणार. या विचारांनी मनात काहूर दाटलं होतं.
हे सुरू असताना मी गुरुवारी केंद्रात जाऊन स्वामींचा आशिर्वाद घेतला व म्हणालो स्वामी आता तुम्ही काय करायचं बघा. असे म्हणून मी त्या दिवशी कॉलेजला गेलोच नाही.
अचानक जाताना एक व्यक्ती वाटेत भेटला व म्हणाला काय करतोस? मी म्हणालो इंजिनिअरिंगला आहे. मग चर्चा वाढत गेली. त्यावेळी त्याने सांगितले मीही तेच करतो पण मी गरीब असल्याने मी बँकेकडून शैक्षणिक कर्ज घेतले आहे.
हे ऐकून मी थक्क झालो. त्याने सर्व प्रोसेस सांगितली, व लागणारी कागदपत्रे सांगितली. यानंतर मी बँकेत गेलो, व मला कर्ज मिळाले. मी अशाप्रकारे चांगल्या मार्काने पास झालो. यानंतर मला चांगली नोकरी मिळाली. मी आता खूप चांगला आहे. मी जो आहे तो स्वामींच्यामुळे.
स्वामींच्याकडे मी काही मागत नाही कारण स्वामी मला काही कमी पडू देत नाहीत.असं स्वामींच माझं नातं आहे. अशीच कृपा स्वामी आपल्यावर करोत हीच इच्छा. श्री स्वामी समर्थ.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद