राशिभविष्य

मिथुन राशीची पत्नी : स्वभाव गुण, अवगुण, प्रेम आणि बरच काही जाणून घ्या…

मित्रांनो आपण आज जाणून घेणार आहोत मिथुन राशीची पत्नी बद्दल. तिचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व नेमक कशा प्रकारच असत, त्यांचे राहणीमान कशा प्रकारच असत. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कशा प्रकारचा असतो, त्यांचे विचार कशा प्रकारचे असतात, एकंदरीत त्यांच्या अपेक्षा कोणत्या प्रकारच्या असतात या सर्व संदर्भातील माहिती आपण या लेखामध्ये घेणार आहोत.

मिथुन राशीच्या पत्नीबद्दल पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दिसून येते ती म्हणजे त्यांचे निरागस व्यक्तिमत्त्व. अतिशय निरागस अशा प्रकारचे व्यक्तिमत्त्व यांचं असत. इनोसन्स या व्यक्तीमध्ये खासकरून दिसून येतो.

उदाहरणच द्यायचं झालं तर जी छोटी मुलं असतात त्यांच्या प्रमाणे यांच व्यक्तिमत्व असत, म्हणजेच खेळकर असतात, हसरी असतात आणि रुसणं फुगणं सुद्धा याच्या मध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येत..

यांच्यामध्ये मुड स्विंग जास्त प्रमाणात दिसून येतो म्हणजे सकाळी एक मुड असेल, दुपारी वेगळा, संध्याकाळी वेगळा आणि रात्री पण वेगळाच असेल. तर मुड स्विंग हे पटापट होत जातात. मुड स्विंग होण्यासाठी फार मोठी गोष्ट घडायला हवी असं मात्र अजिबात नाही.

ज्या गोष्टी तुमच्यासाठी अगदी शुल्लक असतात त्या यांच्यासाठी फार मोठ्या असतात आणि त्यामुळे त्यांचा मूड कधी चांगला आहे कधी वाईट आहे किंवा कधी बरोबर नाही हे त्यांच्या पतीला सुध्दा समजणं कठीण असत, इतके वर्ष एकत्र असताना ही ते त्यांना समजत नाही.

त्यामुळे कधी कधी यांचे पती चाचपडत राहतात की नेमक कशामुळे बिघडलं. जीवनाकडे बघण्याचा यांचा दृष्टीकोन हा सकारात्मक असतो म्हणजे एखादी गोष्ट किंवा जीवनात दुःख असेल तर त्या कुरवाळत बसणार नाहीत. ही चांगली गोष्ट आहे आणि ती मिथुन राशीच्या पत्नी मध्ये दिसून येते.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांची वाणी यांच बोलण खूप चांगल असत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोलताना समोरच्या व्यक्ती दुखावली जाणार नाहीत आपले शब्द व्यवस्थित असावेत याकडे यांच बारीक लक्ष असतं. फार कमी असे आहेत की त्या संदर्भातला विचार करतात.

आपल्या वाणीने सुध्दा समोरचा दुखावला जाणार नाही याची खबरदारी घेणारी ही रास आहे त्यामुळे होतं काय यांची इमेज असते ती खूप चांगली असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप चौकस ही रास आहे एखादी गोष्ट का? कशाला? कशामुळे? या प्रकारचे बरेच प्रश्न यांच्या मनामध्ये असतात आणि याचे उत्तर सुद्धा ते मिळवतात.

अर्थात कुठल्याही एखाद्या क्षेत्राबद्दल खूप सखोल ज्ञान यांना नसत पण एकमेकांशी संवाद साधण्यापुरत महत्त्वाचे ज्ञान आहे मात्र त्यांच्याकडे असत. त्यामुळे कुठल्याही विषयावरती जर तुम्ही त्यांच्याशी बोलला तरी ते साधारण बोलण निभावून नेतील.

संवादकौशल्य त्यामुळे वाढतं आणि यांची इमेज खूप चांगल्या प्रकारे तयार होते आणि त्यामुळे त्यांचा मित्र परिवार खूप मोठा असतो. दुसऱ्याला मदत करतात आणि सहजपणे विश्वास ठेवतात. यांच्यावर तुम्ही विश्वास ठेऊ शकता स्वार्थ किंवा संधी साधुपणा हा या राशीमध्ये दिसून येत नाही आणि ही खूप चांगली गोष्ट आहे.

यांच्याकडे आकलन शक्ती खूप चांगली असते. यांना शारीरिक काम जास्त जमत नाहीत. मात्र बोलण, विचार करण, कम्युनिकेशन या क्षेत्रात व्यवस्थित करू शकतात. अशा क्षेत्रांमध्ये या व्यक्ती पुढे जाऊ शकतात. एकंदरीत रिलेशनशिप मेंटेन करण्यामध्ये ही रास खूप पुढे आहे.

यांच्याकडे निर्णय क्षमता थोडीशी कमी असते एखादी गोष्ट करायची झाली तर केल्यामुळे काय होईल वगैरे वगैरे आणि यामुळेच मानसिक त्रास यांना जास्त होताना दिसून येतो.

कारण छोट्या-मोठ्या गोष्टींचा त्रास घेत बसलात तर मानसिक तणावाखाली जाणं, मानसिक त्रास अनुभवन हा प्रकार या राशींच्या स्त्रियांमध्ये खास करून दिसून येतो. तर तिथे त्यांच्या पतीने लक्ष देणं थोडसं आवश्यक आहे, म्हणजे कुठली गोष्ट सांगायची, कुठली गोष्ट सांगू नये, कधी सांगावी, कशावेळी सांगावी या सगळ्याचा अभ्यास यांच्या पतीने करून घेणे गरजेचे आहे.

मात्र लबाडी करण, संधी साधूपणा हा या राशी मध्ये दिसून येत नाही. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो, जीवनाचा आनंद घेण्याकडे यांचा कल दिसून येतो. पैशाच्या संदर्भात, पैशाचे गणित हे सहसा मिथुन राशीचा पत्नीला जमताना दिसत नाही इथ थोडस लक्ष देणं महत्त्वाचं राहील.

मात्र करीयरच्या बाबतीत या अग्रेसर असतात आणि बौधिक किंवा कम्युनिकेशन अशा प्रकारच्या क्षेत्रांमध्ये मग ते एज्युकेशन किंवा टायपिस्ट, अकाउंट मध्ये ऑफिसची काम या क्षेत्रात या राशीची पत्नी करीयर करू शकते.

मिथुन राशीत एकूण तीन नक्षत्रे येतात. मृग, आद्रा आणि तिसरे पुनर्वसु नक्षत्र. मृग नक्षत्र बद्दल सांगायच झालं तर या स्त्री मध्ये खूप चांगल्या प्रकारचे गुणधर्म असतात, अभ्यासू असतात आणि वाचन यांना आवडतं, अभ्यासू वृत्ती असते. बरेच वेळेला यांना जनरल नॉलेज चांगल्या प्रकारे दिसून येत.

आद्रा नक्षत्र बद्दल सांगायच झालं तर या नक्षत्राच्या स्त्रिया या कार्यकर्तृत्व मध्ये पुढे जाणाऱ्या आणि थोडस बिनधास्त दिसून येतील. डीसिजिन पॉवर यांकडे पण थोडी कमी दिसून येते पण एकदा निर्णय घेतला की तो पूर्ण करून दाखवण्याची धमक या नक्षत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारचे दिसून येते.

पुनर्वसु नक्षत्र हा अतिशय चांगले नक्षत्र आहे. म्हणजेच मिथुन राशि मध्ये जे काय आपण चांगले गुणधर्म पाहतो ते सगळे चांगले गुणधर्म या नक्षत्रामध्ये दिसून येतात.

पुनर्वसू नक्षत्रामध्ये जर स्त्री पुनर्वसु नक्षत्राची असेल आणि तुमच्या जीवनामध्ये किंवा कुटुंबांमध्ये कोणतेही मोठे त्रास झाले तरी तुमचं पुनर्वसन होण किंवा व्यवस्थितपणे परत मार्गी लागण हा प्रकार पुनर्वसू नक्षत्राच्या स्त्रियांमध्ये खास करून दिसून येतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button