मोर पंखाचा हा तोडगा बनवेल तुम्हाला मालामा ल

मित्रानो शास्त्रामध्ये मोर पंखाविषयी खुप सांगितले आहे. मोरपंखामुळे हा घरातील वास्तू दोष कमी होतात. मोर हा अतिशय सुंदर पक्षी आहे. ज्योतिष, वास्तू, धर्म, पुराण यामध्ये मोराचे अत्यंत महत्व मानले गेले आहे. मोर पंख घरात ठेवल्याने अमंगल असे काहीच होत नाही. चला तर मग जाणून घेऊया मोरपंखाच्या अशा अनोख्या गोष्टी…..
मोर, मयूर असे कितीतरी सुंदर नाव आहेत, मोर हा जितका सुंदर दिसतो तितकेच त्याचे सुंदर फायदे आहेत. आपल्या देवी देवतांना ही अत्यंत प्रिय आहेत. माता सरस्वती, माता लक्ष्मी, श्रीकृष्ण, इंद्रदेव, कार्तिकेय, श्री गणेश या सर्वांना मोरपंख कोणत्या ना कोणत्या रूपाने पसंद आहे.
पौराणिक काळात याच मोरपंखाचे शिव यांच्या द्वारे कलम बनवून मोठं मोठे ग्रंथ लिहिले गेले आहेत. मोराच्या विषयी मानले गेले आहे की हा पक्षी कोणत्याही वाईट शक्तीपासून आणि प्रतिकूल शक्तीच्या प्रभावापासून त्या परिसराचा बचाव करतो आणि याच कारणामुळे अधिक लोक आपल्या घरात मोरपंख लावतात.
मोर पंखाचे जितके महत्व भारतात आहे तितके चुकूनच कोणत्या देशात असेल. आपल्या इथे मानले जाते की मोर हा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी प्रभावशाली आहे. पण विसाव्या शतकाच्या वेळी पाश्चिमात्य लोक याला दुर्भाग्याचे प्रतीक मानत होते पण मोर पंखाच्या शुभतेचा अनुभव आल्यानंतर याला शुभ मानले गेले.
ग्रीक पौराणिक कथेनुसार मोराला हेराशी संबंधित केले जाते. मान्यतेनुसार अर्ग ज्याला 100 डोळे होते त्याच्यापासून हेराने मोराची रचना केली आणि हेच कारण आहे की ग्रीक लोक मोराला चांदण्या आणि चंद्र यांच्याशी जोडतात.
हिंदू धर्मात मोराला धनाची देवी लक्ष्मी व ज्ञानाची देवी सरस्वती याच्या सोबत जोडून बघितले जाते. लक्ष्मीला सौभाग्य, धन धान्य याच्यासाठी पुजले जाते. मोरपंखाचा उपयोग लक्ष्मीच्या याच गोष्टी मिळवण्यासाठी केला जातो.
मोरपंखाला बासरी सोबत जोडल्याने नात्यांमध्ये प्रेम टिकून राहते. आशिया मधील बहुतेक देशांमध्ये मोरपंखाला अध्यात्मासोबत जोडले जाते. तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या असतील तर तुमच्या बेडरूम मध्ये मोरपंख लावा यामुळे पती- पत्नी मध्ये प्रेम वाढते.
शत्रूता नष्ट करायची असेल किंवा शत्रू त्रास देत असेल तर मोरपंखावर भगवान हनुमानाच्या सिंदूर ने त्या शत्रू चे नाव मंगळवार किंवा शनिवारी लिहून ते घरातील देवघरात ठेवा आणि सकाळी उठून ते वाहत्या पाण्यात सोडा.
वास्तुशास्त्रानुसार मोरपंख दक्षिण दिशेला असणाऱ्या तिजोरीत ठेवल्याने घरात धनाची कमतरता कधीच होत नाही. राहू दोष असल्यास मोरपंख घराच्या पूर्व दिशेला लावा. तुमच्या घरात जर मोरपंख असेल तर कोणतीच वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही. आग्नेय कोपऱ्यात मोरपंख लावल्याने घराचे वास्तुदोष कमी होतो.
मोरपंख घरातील नकारात्मक शक्ती दूर करून सकारात्मक शक्ती वाढवण्यास मदत करते. वास्तुशास्त्रानुसार मोरपंख घरात ठेवल्याने तुमच्या घरातील सर्व दोष नष्ट होतात. मोरपंख घरातील पूर्व दिशेला लावल्यास किंवा तुमच्या डायरी मध्ये किंवा खिशात ठेवल्यास राहू कधीच त्रास देत नाही.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news