मुली मुलांना पाहताना कुठल्या अवयवांवर लक्ष देतात? जाणून हैराण व्हाल…

टिकटॉक, इनस्टाग्राम इंफ्लूएनसेर, यूट्यूबर यांच्या सांगण्यावर विश्वास ठेऊन मूल स्वताला तस बनवण्याचा प्रयत्न करतात. जर एखादा कोणी म्हणत असेल की मुली रुंद खांदे आणि दाढी-मिशी असणाऱ्याना पसंत करतात किंवा जास्त प्राधान्य देतात तर ज्या मुलांकडे ते नाही त्या मुलांमध्ये कमीपणाची भावना वाढीस लागते. कुठल ही सौन्दर्य के खूप काही काळापर्यंत नाही राहत.
तुम्ही दाढी-मिशी कशी असणार ह्या बाबतीत खूप काही तुमच्या अनुवांशिकतेवर अवलंबून असते. तुम्ही दाढीवर डर्मारोलर कितीही फिरवला किंवा कितीही तेल मालीश केली तरीही खूप काही फरक पडणार नाही. आणि फरक जरी पडला तरी तो फार काळ टिकणार नाही. मुली काय पाहतात यापेक्षा मी स्वताला कसा हवा याकडे जास्त भर दिला तर छान होईल. तुम्ही शरीरयष्टी ही कोणत्या मुलीसाठी नाही तर स्वतःसाठी कमवा. सर्वकाही देह आकर्षणावर अवलंबून राहत नाही.
काही साधी सरळ गोष्टी सांगते ज्यात मुली ध्यान देतील. (सर्वच देतील अस नाही)
कमवते व्हा. तिच्यासाठी किंवा तिचा खर्च उचलण्यासाठी नाही तर स्वतःसाठी. याचा अर्थ हा नाही की मुली पैसे पाहतात. (कदाचित पाहतही असतील)
स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. चुकला तर चालेल कारण माणूस चुकतूनच शिकतो.
अनेक मुली म्हणतात की माझावाला चार-चौघात उठून दिसायला हवा. पण तो प्रत्येक स्थितीमद्धे उठून ददिसेल असे नाही. कदाचित रुपाच्या बाबतीत तो चार-चौघात उठून दिसेल पण नौकरी-व्यवसायात कोणीतरी दुसऱ्याच बाजी मारेल.
भाषेत मधुरता ठेवा. गरज पडली तर कठोरता पण हवी पण भाषेत माधुर्य असल्याने फक्त मुलीच नाही तर इतर लोकसुद्धा तुम्हाला पसंत व तुमचा अंदर करतील.5. नजर चांगली ठेवा. मला हा मुद्दा खूप काही विस्ताराने सांगणे गरजेचे आहे असे वाटत नाही कारण हा मुद्दा समजलाच असेल.
ऊंची फार महत्वाची नसते. 160 सेमी असली तरी पुरे आहे. लोक काय म्हणतील किंवा जोडा शोभत नाही अश्या म्हणणाऱ्या लोकांकडे ध्यान देऊन स्वतःमध्ये न्यूनगंड आणू नका. जोडा शोभत नाही अश्या लोकाना म्हणायला माझ्याकडे खूप मटेरियल आहे इथे नको.
जिम पर्सनॅलिटी किंवा खूप बॉडी बिल्डर असलं काही इतक जरूरी नाही. म्हणजे मोटापा बरा अस नाही. साधी सिम्पल आणि हेल्दी शरीर ठीक आहे. पुन्हा सांगते. शरीर स्वतःसाठी कमवा.
ड्रेसिंग सेन्स म्हणजे महागडी कपडे वापरणे असे नाही. साध्या कपड्यातसुद्धा मुलं पसंत केली जातात. सध्या कॉलेज मध्ये मुल ह्या बाबतीत खूप ध्यान देतात. ब्रॅंड पेक्षा निटनिटकेपणा पसंत केल्या जातो. मला मुलांच्या ड्रेसिंग बद्दल माहीत नव्हते म्हणून नवऱ्याला विचारल. तो म्हणाला, “तुम्ही पायात लखाणी घाला की बाटा घाला की स्पार्कक्स घाला. कोणीही तुमचा बूट वर करून तुमचा ब्रॅंड पाहून तुम्हाला पसंत किंवा नापसंत करत नाही. बूट अस्सी हजार के असले आणि मळकट वास मारणारे असले तर उपयोग काय? त्यापेक्षा साध सरळ वस्तु घ्या आणि त्याला निटकेपणाने परिधान करा.” हा मुद्दा फक्त बुटांमद्धे मध्ये नाही तर प्रत्येक बाबतीत लागू होतो.
मुलीसमोर मन मोकळ करायला शिका. पुरुष मंडळी शकतोवर मन मोकळ करत नाहीत. म्हणजे जि मिळेल तिच्यासमोर मन मोकळ करू अस नाही. शक्यतो अशी मुलगी जिला तुम्ही भावी अर्धांगिनी करू इच्छिता किंवा पत्नी असेल तर तिच्या समोर मन मोकळ करा. पुरुष होण्याच्या प्रिन्सिपल मध्ये भावना व्यक्त करण्यात फारस महत्व दिल नाही. पण जो पती अथवा पुरुष मन मोकळ करत असेल तो नाजुक, रडका, बाईलबुद्धी आहे अस कोणतीही मुलगी समजत नाही. उलट तुमच्यातले संबंध अधिक घट्ट होतील.
स्वाभिमानी बना. कितीही वाईट संकट येऊ द्या. संकटांचा सामना करा. पळ काढणार कितीही आकर्षक असला तरीही कोणतीच मुलगी त्याला पसंत करणार नाही. संकटांचा सामना करा याचा अर्थ हा नाही की मारामारी करा.
व्यसन करू नका. नुसती टाइमपास म्हणून पितो, मित्र आग्रह करतात म्हणून पितो, पार्टी होती म्हणून पितो, आनंद म्हणून पितो अस करता करता लत लागून जाते. माझ्या मते दारू, सिगरेट यांसारख्यापासून दूरच बरे.
प्रसंगी त्या व्यक्तीसाठी कठोर निर्णय घेता आले पाहिजे. अनेक मूल-मुली असतात जे आयुष्यभरचे स्वप्न रंगावतात पण लोकानी किंवा घरच्यानी थोडा जरी विरोध केला तरी सर्व मोडून टाकतात. याचा अर्थ हा नाही की पळून जाऊन लग्न करा. काही महाभाग असतात पण असे केल्याने उलट आणखीन विरोध वाढतो. त्यापेक्षा दोन्ही पक्षातील मंडळीला समजाऊन सांगा. ते नक्कीच समजतील. कदाचित काही दिवस राग मानतील पण तो राग पळून जाण्यापेक्षा बरा असतो. नंतर तो राग आपोआप नष्ट होतो.
शेवट इतकाच की जर समोरची मुलगी तुमच्यात आवड दाखवत असेल तर ती अल्पकालिक आणि देखाव्या गोष्टींकडे ध्यान देणार नाही. ज्याच्यासोबत संपूर्ण आयुष्य काढायच आहे त्याला निवडताना अल्पकालिक गोष्टींवर ध्यान देऊन निवड करणे बरे नाही. कदाचित प्रश्नकर्त्याला असे उत्तर नको होते पण प्रश्नात दडलेल्या भौतिकवादी गोष्टींची लालसा आणि त्याद्वारे समोरच्या व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करण्याची इच्छा त्या व्यक्तीस निराशेकडेच घेऊन जाईल. कारण या जगात कोणीही पूर्णपणे परफेक्ट नाही. असा कोणतच अवयव नाही ज्याकडे मुली आकर्षित होत असतील. आणि जर कोणी होतही असेल तर ती नुसती अल्प काळासाठी. तुमच्या अवयवपेक्षा जास्त आकर्षित करणार अवयव भेटला तर ती निघून जाईल.
अनेक मूल म्हणतात की मुलगी अल्प काळात मी कसा आहे ह्यापेक्षा मे कसा दिसतो हेच पहाणणार ना. तर ऐक भाई तु त्या अल्प काळासाठीचा कशाला विचार करतोय. रस्त्यावर चालताना आकर्षक पुरुष दिसला की मुलगी पहाणणार पण याचा अर्थ हा नाही की ती हो म्हणणार. काही गोष्टी फक्त नयनसुख देऊ शकतात. आणि अश्या तात्पुरत्या एटेन्शन साठी टू स्वतःला बदलतोय आणि स्वतःमध्ये कमीपणा पाहतोय यात तुझच नुकसान आहे.