नामस्मरण म्हणजे काय?…नामस्मरण कसे करावे?…नमस्कार मित्रांनो..

आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! श्री स्वामी समर्थ. एखाद्या देवतेचे नाव किंवा मंत्र पुन्हा पुन्हा म्हणत राहणे म्हणजे नामस्मरण होय. भक्ताचे सर्व दोष हरण करून नामस्मरण त्याला दोष मुक्त करते. म्हणून जड जीवांना तारणारे नामस्मरणच आहे. एकाच नामस्मरणाची शेकडो हजारो आवर्तने झाल्यावर आपली स्पंदने त्या देवतेचा आकार घेऊ लागतात. घरात कोणतीही अडचण आली किंवा कोणाचा जीव धोक्यात असेल तर देवाचे नामस्मरण करण्याचा उपाय शास्त्रामध्ये देखील सांगितलं आहे.
कारण धार्मिक मान्यतेनुसार नामस्मरणा मध्ये इतकी शक्ती असते की त्याचा नियमित जप केल्यास मोठी समस्या सुद्धा दूर होऊ शकते. ज्या व्यक्तीची देवावर श्रद्धा आहे ती व्यक्ती भगवंताचे नामस्मरण नेहमीच करत असे.
मित्रांनो, नामस्मरणा मध्ये एका फार शक्ती आहे. नामस्मरण केल्याने एकाग्रता वाढते, चित्त शुद्ध होते वाचा सिद्धी प्राप्त होऊ शकते. दुष्ट विचारांचा प्रभाव मनावर होत नाही. मन कायम आनंदी राहते. सदैव देवतेचे स्मरण केल्याने सर्व मनो वांछित इच्छा पूर्ण होऊ शकतात म्हणून देवाची साधना करण्याचा नामस्मरण हा एकच उपाय आहे.
नामस्मरण हा उपासनेतील एक प्रकारचं आहे. नामस्मरण हे कुणालाही हानिकारक नाही. तसेच नामजपाला वयाचे बंधन देखील नाही. नामस्मरण करताना विविध मार्गांचा उपयोग केला जातो. नामस्मरण कसे करतात यात आपण जाणून घेऊ या.
मित्रांनो, शास्त्रानुसार मधल्या बोटाच्या पेरा वर माळ ठेवून तीच मनें आपल्याकडे अंगठ्याकडे ओढावे. माळेला तर्जनीचा स्पर्श होऊ देवू नाही आणि अनामिका आणि अंगठा यांची टोके एकमेकांना जोडावेत. नंतर मधल्या बोटाने माल वाढवावी. प्रत्येक देवतेशी संबंधित मंत्राचा जप एकाच माळेने केला तरी चालतो. पण शास्त्रामध्ये प्रत्येक दिवसासाठी वेगवेगळा वापरण्यास सांगितले आहे.
सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा कुणी तुम्हाला शिवीगाळ करता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? जर कोणी तुम्हाला म्हंटल की तुम्ही मूर्ख आहात तुम्ही गाडो बेताल आहात हे ऐकून तुम्हाला कसं वाटतं? आणि तुम्हाला काय होतं तुमच्या मध्ये काय निर्माण होतं तुम्हाला?
येतो तो फक्त राग आणि हां, तुम्हाला हादरवून टाकतो. तुमच्यामध्ये नकारात्मक तरंग उठतो. तुमच्या पोटामध्ये आणि डोक्यामध्ये काहीतरी होऊ लागते. तुम्हाला खूप संताप येतो. मित्रांनो, जर एखादा वाईट शब्द तुमच्या वर इतका शरीरक्रियात्मक प्रतिक्रिया घडू शकतो.
तर मग एखादा छानसा शब्द वैश्विक शक्तीने भरपूर असा एखादा मंत्र जप किंवा एखादा देवाचे नाम तुमच्या शरीरावर काहीच परिणाम करणार नाही का याचा तुम्ही नक्कीच विचार करायला हवा. मंत्राचा तुमच्या शरीरावर काहीच परिणाम होत नाही हे म्हणणे अगदी अशास्त्रीय आणि मूर्खपणाचं आहे. तसे नाही आहे.
परिणाम हा होतोच मंत्रामुळे तुमच्या शरीरातील सगळे सकारात्मक उर्जा बाहेर येऊ लागते म्हणून त्याला मंत्र कवच म्हणतात. मंत्रा मुळे तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच तयार होते जे तुमच्या प्रत्येक संकटातून संरक्षण करते.
मित्रांनो, बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न येतो की नाम घेतल्याने मानवाच्या जीवनामध्ये त्याचा काय फायदा होतो?परंतु रामदास स्वामी त्यांच्या अनुभवातून सांगतात की मानवाच्या जीवनामध्ये नामाने कशी फलप्राप्ती होते? जसं की 1,00,00,000 नामस्मरण झाले की आरोग्य प्राप्त होते 2,00,00,000 नामस्मरण झाले की संपत्ति प्राप्त होते. 3,00,00,000 नामस्मरणामुळे यश आणि कीर्ती प्राप्त होते 4,00,00,000 नामस्मरणा मुळे लोकांची सर्व सुख मिळू लागतात. तसेच 5,00,00,000 नामस्मरणामुळे कामक्रोधादि विकार जातात 6,00,00,000 नामस्मरणा मुळे नाना प्राप्ती होते.
7,00,00,000 नामस्मरणा मुळे अनुकूल पती पत्नी मिळतात. 8,00,00,000 नामस्मरणामुळे अपमृत्यू टळतो. 9,00,00,000 नामस्मरणा मुळे स्वरूप साक्षात्कार होतो. 10,00,00,000 नामस्मरणा मुळे प्रारब्ध कर्म नाशा होतात.11,००,००,००० नामस्मरणा मुळे संचित कर्म नाश होता. 12,00,00,000 नामस्मरणा मुळे क्रियमाण कर्म समते. 13,00,00,000 नामस्मरणा मुळे ज्या देवाच्या जीव नामस्मरण करतो तो देव त्याला प्रत्यक्ष भेटतो.
रामदास स्वामी ने 13 वर्षा मध्ये 13 कुठे नामस्मरण केले होते त्यामुळे त्यांना रामप्रभूने प्रत्यक्ष भेट दिली होती. आणि सर्वात महत्त्वा चं म्हणजे जर 13,00,00,000 च्या पुढे नामस्मरण झाले तर देव मागे पुढे उभा राहतो आणि तुमचे संरक्षण करतो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद