NashikplacesUncategorized

नाशिक पर्यटन स्थळे

नाशिक हे उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. नाशिक हे महाराष्ट्रातील निसर्गरम्य पर्यटन स्थळांपैकी एक आहे. नाशिकची द्राक्षं जगभरात प्रसिद्ध आहेत. ज्यामुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर नाशिकला उत्तम दर्जाच्या दाक्षं आणि वाईनसाठी ओळखलं जातं. शिवाय नाशिक हे गोदावरीच्या कुशीत वसलेलं एक तिर्थक्षेत्रदेखील आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध मंदिरे नाशिकमध्ये आहेत. ज्यामुळे नाशिकला पर्यटक आणि भाविकांची नेहमीच वर्दळ असते.

रामकुंड

रामकुंड हे ठिकाण नाशिकमधील गोदावरीच्या पात्रात बांधण्यात आलेलं आहे. असं म्हणतात वनवासात असताना प्रभू रामचंद्र या ठिकाणी स्नान करत होते. ज्यामुळे रामकुंडाला पवित्र स्थळ मानलं जातं. पेशवेकालिन कालखंडात या कुंडाची पुर्नबांधणी करण्यात आली. या कुंडाजवळच अस्थिविलय तीर्थदेखील आहे. महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी,यशंवतराव चव्हाण अशा राजकीय नेत्यांच्या अस्थी रामकुंडात विसर्जित करण्यात आलेल्या आहेत.

सप्तश्रुंगी मंदिर

नाशिक जिल्हात वणी येथे सप्तश्रृंगी देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. पौराणिक कथांमध्ये 108 शक्तिपीठांचा उल्लेख आहे. त्यातील साडेतीन शक्तिपीठे महाराष्ट्रात आहेत. त्यापैकीच एक सप्तश्रृंगी हे अर्धे शक्तिपीठ आहे. नांदुरी गावाजवळील वणी गडावर वसलेली ही देवी अनेक घराण्यांची कुलदैवता आहे. सप्तश्रुंगी हे आदिशक्तीचे मुळ रूप मानले जाते. या मंदिरातील देवीची मुर्ती स्वयंभू असून तिच्या गाभाऱ्याला शक्तिहार, सुर्यहार आणि चंद्रहार असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाज्यांतून देवीचे दर्शन घडते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button