नाते दीर्घकाळ का टिकत नाहीत? घ्या जाणून…

नाती न टाकण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे स्मार्टफोन. पहिले आपल्याला काही माहिती हवी असेल किंवा कुठल्या गोष्टी मध्ये अनुभव माहित करून घ्यायचा असेल तर आपण आपल्या घरातल्या मोठ्या व्यक्तींना विचारायचो. त्यामुळे त्यांच्याशी संवाद व्हायचा. पण आता सुनेला नवीन रेसिपी करायची आहे तर ती सासूला न विचारात आधी मोबाईलमध्ये youtube वर शोधते, मग तिला सर्व रेसिपीस चे नोटिफिकेशन्स आपोआप येत जातात मग कुणाला काही विचारण्याचा प्रश्न च येत नाही.
मग सासूबाईंना वाटते हि आधी मला विचारून करायची आता सगळं मोबाइललाच विचारते. तसेच लग्न झाल्यावर मुली नवीन शहरात किंवा नवीन जागेत जातात. तेव्हा तिथे काय चांगले मिळते कसे जायचे ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे google मुळे भेटून जातात. जो तो आपापल्या मोबाइलला चिकटलेला. सर्वाना पडलेले प्रश्न google देतोय.
त्यामुळे कोणाला ना काही विचारण्याची गरज ना प्रत्यक्ष संवाद साधण्याची. जो काही संवाद करायचा तो सगळा सोशल मीडिया वर. घरातल्यांशी काही देणे घेणे नाही आपल्याला अशी वृत्ती बनत चालली आहे.
अपेक्षा : आपल्याला समोरच्या व्यक्तीकडून काही अपेक्षा असतात पण त्याला वेगळे च काही तरी हवे असते. म्हणजे नवऱ्याला टिपिकल घर सांभाळणारी बायको हवी असते तर बायको ला घर कामापेक्षा करिअर मध्ये जास्त इंटरेस्ट असतो. इथे मग नात्यात वाद व्हायला सुरुवात होते. तसेच सोशल मीडिया वर मैत्रिणीने टाकलेले फोटो बघून हेवे सुरु होतात.
माझी मैत्रीण किती सुखात आहे ती पाहिजे तिथे जाऊ शकते, तिचा नवरा तिला किती खुश ठेवतो वगैरे. मग सुरु होते तुलना. नकळत ह्या गोष्टी तुमच्या नात्यात काही वाद नसतील तरी कालांतराने वाद निर्माण करतात.
गरज: कुठलेही नाते एका व्यक्तीला हवे आणि दुसऱ्याला नको तर टिकणार च नाही. दुसरा option नाहीये आणि आता लग्न केलं आहे म्हणून एकत्र राहणे भाग आहे असं वाटायला लागलं कि काही खरं नाही. नात्याची गरज दोघांना असली पाहिजे. ज्या दिवशी नात्यातली गरज संपते तेव्हा फक्त व्यवहार बनतो उरते फक्त औपचारिकता. प्रत्येक वेळेस मीच का माघार घ्यायची? मला च फक्त नात्याची गरज आहे का अशा गोष्टी सुरु होतात.
वेळ: तुम्ही एखाद्या व्यक्तीला कुठलं भारी गिफ्ट देऊ शकता तर तो तुमचा अमूल्य वेळ आहे. कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्याला तुमचा वेळ देता म्हणजे तुमच्या आयुष्याचा भाग बनवतात. आई वडिलांना महागडं गिफ्ट देण्या पेक्षा रोज ५ मिनिट तरी त्यांच्याशी बोला त्यांना दुसरं काही नको असतं.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद