अध्यात्मिक

नवरात्रीत कुलदेवीची ही प्रभावी सेवा करा, देवी आई प्रसन्न होईल, प्रश्न मार्गी लागतील

बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की नवरात्रीमध्ये कोणती कोणती सेवा करावी सोबतच कोणती सेवा केल्याने देवी प्रसन्न होते आणि चटकन फळ देणारी सेवा अशी कोणती त्या बद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत नवरात्रीमध्ये आपल्याला कोण कोणती सेवा करायची आहे.आणि या सगळ्या सेवा करून कुलदेवी जर प्रसन्न झाली तर आपले जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लागू शकतात नवरात्रीमध्ये जी आपली कुलस्वामिनी आहे ती जास्तीत जास्त सेवा करायची आहे तसं तर कुलदेवीची सेवा आहे ते आपल्याला वर्षभर करायची असते

पण वर्षभर आपलं ऑफिस आणि जे बिझी शेड्युल असतो यामुळे जर तुम्हाला जमत नसेल तर एकदा तरी आपण कुलदेवीचा मूळ स्थानी जाऊन तिचा मानपान करायचा असतो पण हे जर तुम्हाला जमत नसेल तर नवरात्रीच्या वेळी आपल्या घरी कुलस्वामिनी ची सेवा आपण करू शकतोआणि नवरात्रीमध्ये जी आपण कुलस्वामिनीची सेवा करतो ती वर्षभर सेवा केल्याची पुण्य आपल्याला या नऊ दिवसांमध्ये मिळत असते त्यामुळे जर वर्षभर तुमच्याकडून कुलस्वामिनीची सेवा झालेली नसेल मानपान झालेला नसेल तर नवरात्रीमध्ये नक्की करा

हे नऊ दिवस अतिशय प्रभावी असतात या नऊ दिवसांमध्ये केलेल्या सेवेला देवी चटकन प्रसन्न होत असते त्याचं फळ आपल्याला लवकर मिळत असतो त्यामुळे हे नऊ दिवस जे आपल्या हातात आहे ते तुम्ही वाया जाऊ देऊ नका आज काल आपण बघितला असेलती खरच लेडीज जीवन खूप धकाधकीचं झालेला आहे म्हणजे काय तर बऱ्याच या महिला 98% ज्या महिला आहेत त्या वर्किंग आहेच म्हणजे त्या जॉब सुद्धा सांभाळतात घरपण सांभाळतात आणि मुलांकडे सुद्धा लक्ष देतात घरामध्ये नोकर असेल सगळं असेल

घरकामाला जरी बाई असेल तरी पण घरातल्या स्त्रीला अमुक एवढी जबाबदारी असते कामे असतात ती करावीच लागतात मग अशाच वर्किंग महिलांसाठी एक विनंती आहे ती तुम्ही सर्व काही आपल्या कुटुंबासाठी करत असत आपल्या मुलालेकरांसाठी करत असतात.तर तुम्ही नवरात्रीमध्ये काही उपाय सुद्धा नक्की करा काही सेवा सुद्धा नक्की करा या सेवा केल्यामुळे तुमच्या फॅमिलीचा खूप चांगलं होणार आहे आपल्या घरासाठी जी सेवा आहे ती लागू पडणार आहे त्यामुळे जर तुमच्या शेड्युल थोड बिझी असेल

तरीसुद्धा तुम्ही अजून लवकर उठा अर्धा ते एक असा एक तास देवीसाठी देवासाठी काढण्याचा प्रयत्न करा तुमच्या कुटुंबासाठी इतका प्रयत्न तुम्ही नक्की करू शकता सगळ्यांसाठी ही कळकळीची विनंती आहे की तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये काहीतरी सेवा नक्की करात्याचे फळ तुम्हाला खूप लवकर मिळणार असते लग्न जमत नाही मूलबाळ होत नाही जॉब मिळत नाही त्यानंतर बिजनेस मध्ये प्रॉब्लेम येत आहे शिक्षणामध्ये अडचणी येत आहेत असे बरेचसे प्रॉब्लेम सर्वांनाच असतात माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम नाहीये असा एकही माणूस नसतो

एकही घर नसतं याचे मूळ प्रॉब्लेम काय असते की आपण सेवा कमी करतो किंवा सेवा चुकतो कुठेतरी आपण कमी पडतो त्यामुळे आपल्याला या काही काही गोष्टी आहेत त्या भोगावे लागतात तर आज आपण नवरात्रीमध्ये कुलस्वामिनीची काय सेवा करायची आहे या बद्दल बरीच माहिती जाणून घेणार आहोतबरेचसे व आपण जाणून घेणार आहोत या पैकी तुम्हाला कोणती सेवा जमेल किंवा कोणत्या सेवा जमतील त्या तुम्ही नक्की करायचे आहेत आज ज्या काही सेवा आपण जाणून घेणार आहोत या सगळ्या सेवा जर तुम्ही केल्या तर अतिउत्तम पण तुम्हाला जर नाही जमत

सगळ्या सेवा करायला त्यापैकी तुम्हाला जे जमतं ते तरी नक्की करा तुमच्या वेळेनुसार बघा तुम्हाला कोणती सेवा करायला जमते आणि नक्की जाणून घ्या ही सेवा आणि नक्की करा यामुळे तुमच्या कुटुंबाचे रक्षण होणार आहे देवीचा संरक्षण कवच आपल्या कुटुंबा वरती राहणार आहेत्यातील पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला देवीच्या पहिला माळे पासून दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ अतिशय महत्त्वाचा आहे त्यामध्ये एक 13 अध्याय आहेत एक ते 13 अध्याय म्हणजे एक गण म्हणजे एक पाठ होतो असे तुम्हाला 14 पाठ केल्याने तुम्हाला नवचंडी पूजा केल्याचे पुण्य मिळत असतं

नवचंडी ची पूजा करायला तीन ते पाच दिवस लागतात ही पूजा खूप खर्चिक आहे आणि वेळ सुद्धा खूप लागतो त्यामुळे दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे आपल्या हातात आहे आपल्या वेळेत आहे त्यामुळे आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ यासाठी वेळ नक्की काढला पाहिजेजर तुम्हाला जमलं तर तुम्ही या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्या कुलस्वामिनी साठी दुर्गा सप्तशतीचा पाठ नक्की करा याची भाषा सुद्धा काही अवघड नाही मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध होते तुम्ही सहज वाचू शकता यानंतरची दुसरी सेवा आहे सिद्ध कुंजिकास्तोत्र तुम्हाला अकरा वेळा वाचायचे आहे

किंवा सोबतच या सोबतच तुम्हाला दररोज कुंकूमार्चन करायचा आहे तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल देवीचा टाक असेल देवीची मूर्ती असेल देवीचा फोटो असेल काहीही असेल तर तुम्ही कुंकूमार्चन करा कुंकूमार्चन अतिशय प्रभावी असतो देवीला अतिशय प्रिय अशी ही गोष्ट आहेदेवीवर कुंकुमार्चन केल्याने देवी लवकर प्रसन्न होते आणि आपल्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा देवी माता पूर्ण करत असते यानंतर तुम्ही रोज महालक्ष्मी अष्टक म्हणू शकता यामध्ये महालक्ष्मीच्या आठ नावांचा समावेश आहे आणि हे अतिशय प्रभावी आहे तर तुम्ही रोज एकदा महालक्ष्मी अष्टक सुद्धा म्हणू शकता

यानंतर एक माळ नवार्णव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे एक माळ म्हणजे 108 वेळेस हे अतिशय प्रभावी आहे खूप ईफेक्टिव्ह आहे वाचनाच्या सगळ्या सेवा करायला तुम्हाला वेळ नाही मिळणार तर तुम्ही नवार्णव मंत्राचा मंत्रजप नक्कीच करू शकताहे करण्यासाठी तुम्हाला फक्त पाच ते दहा मिनिटं लागणार आहेत तर हे तुम्ही नक्की म्हणा यानंतर आहे लक्ष्मी स्तोत्र तुम्ही म्हणू शकता त्यानंतर आहे कनकधारा स्तोत्र हे अतिशय प्रभावी आहे आपल्या आयुष्यातले अनेक दोष कमी करण्यासाठी जे पण आपल्या कडून कळत नकळत दोष लागले असतील

काही पाप झालेले आहेत त्याच्यातून मुक्तीसाठी तुम्ही ही जी सेवा आहे की तुम्ही नक्की करू शकता या सगळ्या सेवा जर तुम्हाला जमलं तर नक्कीच करा हे सगळे मंत्र स्तोत्र गुगल वर सुद्धा अवेलेबल आहेत स्वामींची नित्य सेवा या पुस्तकांमध्ये सुद्धा आहे

तुम्ही बघा तुम्हाला समजेल तुमच्या वेळेनुसार तुम्ही सेवा करू शकता सेवा करायची इच्छा सर्वांनाच असते पण वेळ मिळत नसतो त्यामुळे सेवा करणे जमत नसते नवरात्रीमध्ये नऊ दिवस नाही जमलं तर एक दिवस तरी नक्कीच सेवा करा जेव्हा आपण देवीची सेवा करतो तेव्हा कसे नऊ दिवस निघून जातातहेच आपल्याला कळत नाही कारण आपण प्रसन्न वातावरणामध्ये असतो आपलं मन प्रसन्न असते किंवा आपल्या घरातील जर दुसरा कोणी देवीची सेवा करत असेल तर ते बघून सुद्धा आपल्या मनाला समाधान वाटत असतं आणखीन एक उपाय म्हणजे तुम्हाला या सगळ्या सेवा करायचे आहेत पण वेळ मिळत नाही

यासाठी हे सगळे मंत्र हे वाचवणे सगळे आपल्याला ऑनलाईन ऑडिओ स्वरूपात सहज उपलब्ध होत असते त्यामुळे जेव्हा तुम्ही सकाळी वर्किंग आहात डबा करायचा आहे तुम्हाला कामे असतात त्यावेळेस देव पूजन झाल्यानंतर तुमच्या कानावर हे मंत्र हे स्तोत्र हे पडू द्या तुमचं लक्ष कामांमध्ये असले तरी कान तिकडे असले पाहिजे

ती सुद्धा देवीचे एक सेवा करण्याची पद्धतच आहे चे मंत्र फक्त आपल्या कानावर पडू द्या ऐकल्याने सुद्धा आपण जी मानस पूजा करतो ती सुद्धा खूप महत्त्वाची असते मनातून आलेले भाव ते अति महत्त्वाचे असतात त्यामुळे जर तुम्हाला सेवा करायला वेळ मिळाला नाही तर ऍटलिस्ट हे तुमच्या कानावर तरी पडू द्यातुमच्या घरात जरी नऊ दिवस तुम्ही हे युट्युब वर चालू ठेवलं तरी यामुळे फायदा असा होतो की घरातील लहान मुले मुली किंवा इतर सदस्य त्यांच्या कानावर सुद्धा हे मंत्र पडत राहतात आणि देवीचे मंत्र देवाची स्तोत्र ही सगळं वाचायला ऐकायला खूप भारी वाटत असतं त्यानंतर या नऊ दिवसांमध्ये आपल्याला रोज न विसरता कुलस्वामिनी ची ओटी भरायची आहे

तुमची जी कुलस्वामिनी देवी असेल त्या देवीचे मंदिर जर तुमच्या घराच्या आसपास असेल तुमच्या गावांमध्ये तुमच्या शहरांमध्ये असेल तर तिथे जाऊन तुम्ही त्या देवीची ओटी भरली पाहिजे जर तुम्हाला देवीच्या मूळ स्थानी जाऊन ओटी भरणे जमत नाहीये तर असं गावामध्ये असणाऱ्या मंदिरात किंवा शहरांमध्ये असणाऱ्या मंदिरांमध्ये जाऊन तुम्हाला देवीची ओटी न चुकता भरलीच पाहिजे

देवीचा मान सन्मान केला पाहिजे नवरात्री तुमच्या परीने तुम्हाला जी सेवा जमेल ती सेवा तुम्ही नक्की करा आणि देवीची ओटी सुद्धा भरा त्यानंतर रोज कसा आपण आपल्या देवासमोर दिवा लावत असतो रोज सकाळी आणि संध्याकाळी देवापुढे दिवा लावून अगरबत्ती ओवाळले जाते आणिप्रत्येक घरांमध्ये सुखकर्ता दुखहर्ता दुर्गे दुर्घट भारी आणि घालीन लोटांगण प्रार्थना तर नक्कीच होत असतात पण जर तुम्ही करत नसेल तर नक्की करायला सुरू करा या तीनही प्रार्थना अगदी सोपे आहेत पाच ते सात मिनिटांमध्ये म्हणून होतात तुम्ही जर ही आरती करत असाल ही प्रार्थना करत असाल तर अति उत्तम

पण प्रत्येक कुलस्वामिनीची एक वेगळी आरती असते ते आरती वाचून म्हणा बघुन म्हणा किंवा ऑडिओ स्वरूपामध्ये ऐका पण आपल्या घरात आपल्या कुलस्वामिनी ची आरती नक्की केली पाहिजे तर अशा काही सेवा आपल्याला या नऊ दिवसांमध्ये करायचे आहेत जेणेकरून घरातील वातावरण सुद्धा प्रसन्न होईल

आणि देवी आईला आपल्या घरामध्ये राहावा असं वाटेल देवी माता आपल्या घरामध्ये अगदी प्रसन्न पणे राहील आणि तिला पण आनंद होईल अशा काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत कोणती सेवा असो आपण एकदा केली की त्याचं फळ आपल्याला कित्येक वर्ष कित्येक काळ आपल्यासाठी टिकून राहत.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button