लक्ष्मी नारायणाचा जोडा असतात या दोन राशींचे लोक, दुधात साखरेसारखे असतात परफेक्ट मॅच.

मित्रांनो प्रेम आणि रो’मान्स व्यक्तीच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहेत. ज्याशिवाय जीवनात तुम्हाला एकटेपणाची जाणीव होत राहते. व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रेमाचे रंग त्याच्या जीवनामध्ये आनंद देतात. आपण सर्वांनीच घरातील थोरामोठ्यांना असं बोलताना ऐकलं आहे की, लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात.
आज आपण पाहणार आहोत, सर्वोत्तम अशा वधू वर राशींच्या जोड्यांबद्दल मित्रानो ज्या जोडप्यांच्या बद्दल आपण सांगणार आहोत त्याबाबतीतला तुमचा अनुभव कसा आहे? हे तुम्ही पुढे या लेखात बघाल. त्याचं बरोबर तुमची व तुमच्या जोडीदाराची रास कोणती? हे सुद्धा बघा.
मित्रानो एखाद्या व्यक्तीला जाणून घेण्यासाठी बऱ्याच गोष्टी गरजेच्या असतात. तर काही जोड्यांच्या बाबतीत हे तंतोतंत जुळतं. त्यांची जोडी अगदी स्वर्गात बांधल्यासारखीच असते. परंतु बऱ्याचदा एका परफेक्ट मॅच साठी त्यांचे स्वभाव आणि गुणधर्म जुळायला लागतात. आपल्या प्रत्येकाच्याच मनात एक जीवलग व्यक्ती असते तिच आपली आयुष्याची जोडीदार व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते
आपल्यासाठी कुणीतरी प्राणसखा जगात आहे अशी आपल्याला खात्री असते आणि त्याला जेव्हा आपण भेटतो तेव्हा हे जगात आनंद भरून राहिलाय आणि आपल्या भवतालचं सारं विश्व सुंदर आहे असं आपल्याला वाटतं. फक्त आपण त्या शोधतो. पण लग्न करण्यासाठी पार्टनर शोधण्यासाठी तुम्ही काय करता? स्थळं शोधता. पण तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला कसा लाइफ पार्टनर पाहिजे हे बऱ्याच अंशी राशींवरही अवलंबून असतं
ज्योतिषशास्त्रानुसार अशाच काही राशींच्या आयुष्यात असलेल्या प्रेम आणि लग्नाबाबत काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. तसेच कोणत्या राशींच्या व्यक्ती एकमेकांसोबत विवाहबद्ध होऊ शकतात. हे देखील सांगण्यात आलं आहे. जसं की त्या दोघांचं आवडतं भोजन, आवडता रंग, एखादं रो’मॅंटिक गाणं आणि बरंच काही, तसेच आपल्या आवडीच्या जोडीदाराची निवड करणं हे फारच अवघड काम आहे
पण ज्योतिषशास्त्रमध्ये राशींच्या अशा काही जोड्या सांगण्यात आल्या आहेत ज्यांची लग्न झाली आणि त्यात कुठलीही अडचण नसेल तर अशी लग्न दीर्घकाळ टिकू शकतात. शिवाय ते एकमेकांचे उत्तम जीवनसाथी देखील होऊ शकतात. राशींपैकी पहिली जोडी जी असणार आहे, ती म्हणजे तुळ रास आणि सिंह राशीची.
या व्यक्तींचे उदाहरण म्हणजे दोघांचाही स्वभाव थोडासा सारखा असतो. ते मनमिळाऊ असतात लोकांना भेटणं, मनमोकळेपणाने बोलणं हा या दोघांचाही छंद असतो, त्यांना स्वतःला मनमोकळेपणाने व्यक्त व्हायला आवडतं त्याचमुळे या दोन राशीचे लग्न जर झाले तर ते लग्न दीर्घ काळ टिकू शकते
दुसरी जोडी जी आहे ती मेष आणि कुंभ राशीची – या दोन्हीपण राशीचे लोक जर एकमेकांचे जीवनसाथी झाले तर ते बहुतांशी उत्तम निर्णय घेऊ शकतात. या दोघांतही प्रेम आणि रो’मान्स ख’च्चून भरलेला असतो, अशा गोष्टी पसंत करतात. अर्थात ही दोघही सृजन आत्मक असतात व ते स्वच्छंदता पसंत करतात आणि नेहमीच आपल्या जोडीदाराला योग्य स्पेस देणं पसंत करतात
मेष आणि कर्क रास – मेष राशीचे लोक नेहमी बहादूर आणि नीडर असतात आणि कर्क राशीचे लोक उर्जावान असतात. हे जोडीदाराला देखील ऊर्जावान ठेवतात. त्यामुळे या दोघांची जोडी उत्तम जोडी मानली जाते.
मित्रांनो पुढील जोडी आहे ती राशीपैकी पहिली रास मेष आणि राशीचक्रातील शेवटची रास मीन या राशीची जोडी. मेष आणि मीन राशीच्या लोकांचे आपापसात अगदी स्नेहाचे सं’बंध बनतात एकमेकांसोबत हे अगदी क र्तव्यनिष्ठ आणि एकनिष्ठ असतात.
मेष रास ही अग्नीतत्वाची रास असल्यामुळे स्वभावाने थोडी तापट असते परंतु त्यांचं लग्न जलतत्वाच्या मीन राशीच्या शांत स्वभावाच्या व्यक्तीशी झाल्यास, अस लग्न दीर्घकाळ टिकू शकत. आपल्याकडे म्हणतात की एक म्हण आहेच ना एकजण आग झाला तर दुसऱ्याने पाणी व्हावंच लागतं.
मित्रांनो यानंतरची जोडी आहे राशी आहे वृषभ रास आणि कर्क रास – या राशींचे दोघंही एकमेकांना समान आदर देणारे असतात ते एकमेकांची भरपूर प्रशंसा देखील करतात वृषभ आणि कर्क यांच्यात उत्तम ताळमेळअसतो. कर्क राशीची लोकं ही खऱ्या मनाची असतात, तर ऋषभ राशीचे लोक हे दुसऱ्यांना मदत करण्यास नेहमी तत्पर असतात. दोघही घर परिवाराचे महत्त्व जाणून असतात. आणि मग उत्तम जोडीदारासाठी काय हवं असतं.
मित्रांनो वृषभ राशीचा आणखीन एका राशी सोबत चांगला पटतं आणि ती रास म्हणजे मकर रास – या राशीचे लोक एकमेकांसोबत प्रेमाने आणि समजुतीने वागतात. वृषभ रास असणारे नेहमी मकर राशीच्या लोकांच काम आणि प्रसन्नचित्त व्यवहाराची प्रशंसा करतात. तर मकर राशीचे लोक वृषभ राशीच्या उदारतेला आणि समजदारीला पसंत करतात.
मित्रांनो त्यानंतर मेष आणि धनु राशी – धनु राशीचे लोक नेहमी आपल्या मनातच ऐकतात, कुठल्याही प्रकारची नखरे नाटक यापासून ते दूर राहतात. हास्य विनोद करणे यांना पसंत असते, तसेच मेष राशीची लोकही सामाजिक दृष्ट्या सक्रिय असतात. आणि वास्तवात जगण त्यांना जास्त आवडतं. मित्रांनो यानंतर ची जोडी आहे दोन्ही जलतत्वाच्या राशींची कर्क आणि मीन राशी या दोन्ही जलतत्वाच्या राशी आहेत.
जे त्यांच्या आत्मिक आणि अध्यात्मिक संबंधाना दर्शवत दोन्ही राशींची लोक भाऊक असतात आणि एकमेकांना दुःख होणार नाही याची नेहमी काळजी घेतात. आता बघूया स्पष्ट बोलणाऱ्या सिंहच कोणाशी पटत, तर धनु राशीच्या लोकांशी चांगलं पटतं सिंह राशीचे लोक थोडे स्वभावाने जिद्दी असतात. पण धनु राशीच्या लोकांना यांचा आत्मविश्वास फार आवडतो, त्यामुळे हे दोघं प्रत्येक समस्येच समाधान काढण्यात यशस्वी होतात.
यानंतरची जोडी आहे कन्या आणि मकर राशी – कन्या राशीचे लोक काळजी करणारे असतात ज्याने त्यांचा स्वभाव अंतर्मुख होऊन जातो. पण कन्या राशीची लोक जेव्हा बोलतात तेव्हा ती खूप मनमोकळी बोलतात, आणि त्यांचा हाच स्वभाव मकर राशीच्या लोकांना आकर्षित करतो. सिंह आणि मिथुन राशी – सिंह राशीचे लोक मानसिक रित्या सशक्त जोडीदाराची इच्छा ठेवतात, तसेच मिथुन राशीचे लोक त्याला प्रेमाची जाणीव करून देण्याला प्राथमिकता देतात
यानंतरची जोडी आहे वृश्चिक आणि कर्क रास – दोघंही जलतत्वाची रास आहे. या राशीचे लोक एकमेकांना सह्योगतमक पद्धतीने वागतात. या राशींचे लोक संवेदनशील असतात. एकमेकांना समजून घेण्याचा चांगला प्रयत्न करतात. जोतिष शास्त्रानुसार राशींच्या काही जोड्या ज्यांची लग्न झाली आहेत ती दीर्घ काळ टिकू शकतात.
पुढच्या राशी आहेत कुंभ आणि मिथुन राशी – या राशीच्या लोकांकडे आपण आता वळूया! दोन्हीही वायू तत्व असणाऱ्या रास आहे. या राशीचे लोक जीवनातील प्रत्येक चढ उतार मध्ये साथ देतात. मिथुन राशीचे लोक चांगल्या गोष्टींची प्रशंसा करतात. तर कुंभ राशीचेदोन्हीही वायू तत्व असणाऱ्या रास आहे. या राशीचे लोक जीवनातील प्रत्येक चढ उतार मध्ये साथ देतात. प्रत्येक समस्येवर शांततेने तोडगा काढतात
यानंतर नंबर येतो वृषभ आणि वृश्चिक या राशींचा या राशीचे लोक बऱ्याच बाबतीत एकसारखे असतात. दोघंही उत्साहपूर्ण आणि आवेशपूर्ण असतात. आपापसातील संबंधांमध्ये दोघंही समान व्यवहार करू शकणारे ठरतात. वृश्चिक राशीचे सर्वात उत्तम जोडीदार म्हणून वृषभ राशीच्या लोकच असतात.
मिथुन राशीचे लोक चांगल्या गोष्टींची प्रशंसा करतात. तर कुंभ राशीचे जातक कलात्मक असतात. ही बाब दोघांमध्ये ताळमेळ घालण्यास मदत करते. मिथुन राशीच्या व्यक्तींच आणखी एका व्यक्तीशी पटत ते म्हणजे तुळ राशी. या दोन्ही राशि एकमेकावर पूर्ण अधिकार दाखवणाऱ्या असतात. हीच गोष्ट दोघांमध्ये प्रेम वाढवण्यास मदत करते. हे नात प्रत्येक वेळी नवीन वाटतं.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news