राहु गोचरामुळे या पाच राशींचं टेन्शन होणार दूर, प्रत्येक कामात मिळेल अपेक्षित यश..

ज्योतिषशास्त्रात राहु आणि केतुला पापग्रहाचा दर्जा देण्यात आला आहे. राहुची स्थिती अनेकदा जातकाला जीवन नकोसं करून ठेवते. त्यामुळे या ग्रहांची स्थिती कशी आहे याकडे पाहिलं जातं. ज्योतिषशास्त्रात राहु आणि केतु हे दोन्ही पापग्रह आणि मायावी ग्रह मानले गेले आहेत. हे दोन्ही ग्रह एकाच वेळी राशी बदल करत असतात. त्याचबरोबर परस्पर विरोधी असतात. हे दोन्ही ग्रह कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. राहु आणि केतु हे दोन्ही ग्रह एका राशीत दीड वर्षासाठी ठाण मांडून बसतात.
त्याचा परिणाम राशीचक्रावर होतो. सध्या राहु मेष राशीत, तर केतु तूळ राशीत विराजमान आहेत. कुंडलीत राहु-केतु हे ग्रह चांगल्या स्थितीत नसतील तर जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रत्येक कामात अडचणींचा सामना करावा लागतो.
30 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 1 वाजून 33 मिनिटांनी राहु मेष राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. तर केतु तूळ राशीतून कन्या राशीत प्रवेश करतात. 18 मे 2025 पर्यंत हे दोन्ही ग्रह त्या त्या राशीत असणार आहेत. या दीड वर्षांच्या कालावधीत पाच राशींचं नशीब फळफळणार आहे. या राशींना वर्षाच्या शेवटापरयंत चांगला लाभ आणि अनुभव दिसून येईल. चला पाहुयात पाच राशींना कसं फळ मिळणार ते..
पाच राशींना मिळणार सकारात्मक परिणाम..
मेष रास – या राशीच्या जातकांना राहुच्या गोचरामुळे चांगले परिणाम दिसून येतील. विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा एकदा बसलेली दिसेल. पैशांची आवक सुरु झाल्याने कामं झटपट पूर्ण होतील. अडकलेली कामं पूर्ण झाल्याने दिलासा मिळेल. त्याचबरोबर किचकट कामंही पूर्ण होतील. समाजात एक वेगळी ओळख निर्माण होईल आणि मानसन्मान वाढेल.
वृषभ रास – या राशीच्या जातकांना सकारात्मक परिणाम दिसून येतील. प्रगतीचे नवे मार्ग या काळात सापडतील. विदेश दौरा या काळात घडण्याची शक्यता आहे. व्यवसायात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. करिअरमध्ये नवी शिखरं या काळात गाठता येतील.
कर्क रास – या राशीच्या जातकांना राहुची उलटी चाल फलदायी ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. या काळात विदेश यात्रा घडू शकते. तसेच जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील.
तूळ रास – या राशीच्या जातकांना राहु गोचर फलदायी ठरेल. करिअरमध्ये काही चांगल्या घडामोडी घडतील. एखादी मोठी जबाबदारी खांद्यावर पडू शकते. समाजात मानसन्मान वाढेल. नवीन घर किंवा वाहन खरेदीचा योग आहे. धीर धरून एक एक काम पूर्ण करा.
मीन रास – या राशीत राहु गोचर करून येणार आहे. त्यामुळे सकारात्मक परिणाम देईल अशीच स्थिती आहे. पण आर्थिक स्तरावर काही निर्णय घेताना काळजी घेणं गरजेचं आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. पण पैशांची बचत करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!