रुचक योगमुळे या 3 राशींचे नशीब पालटणार.. प्रमोशन बरोबर.. प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता..

नमस्कार मित्रांनो.. या आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचं मनापासून स्वागत आहे.. Ruchak Yoga वैदिक ज्योतिषशास्त्रातील पाच महत्त्वाच्या राजयोगांपैकी हा विशेष योग आहे. जेव्हा मंगळ चंद्रापासून पहिले मेष, वृश्चिक आणि मकर राशीमध्ये चतुर्थ, सातव्या आणि दहाव्या घरात असतो तेव्हा रुचक योग तयार होतो.
वैदिक ज्योतिषशास्त्रात 32 प्रकारचे राजयोग असतात. लक्ष्मी नारायण राजयोग, विपरीत राजयोग, बुधादित्य राजयोग आणि नीचभंग राजयोग असे अनेक राजयोग जाचकाच्या कुंडलीत तयार होतं असतात. त्यातील रुचक योग हा एक योग भाग्यशाली राजयोग आहे.
चंद्राच्या पहिले जेव्हा मंगळ मेष, वृश्चिक आणि मकर राशीमध्ये चतुर्थ, सातव्या आणि दहाव्या घरात असतो तेव्हा रुचक योग तयार होतो. या रुचक राजयोगाचा अनेक राशींना फायदा होत असतो. या योगाचा सर्वाधिक फायदा तीन राशींच्या लोकांना होतो. चला जाणून घेऊयात त्या रास कुठल्या आहेत.
‘या’ 3 राशींचं नशीब चमकणार ..
मेष रास – (Aries) मेष राशीच्या लोकांसाठी रुचक योग अतिशय लाभदायक ठरणार आहे. या काळात त्यांचा आरोग्याची समस्या दूर होईल. नातेसंबंधातही मजबुती येणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. या काळात तुमचं गुपित, मनातील एखादी गोष्ट कोणाला शेअर करु नका.
अन्यथा तुमची मोठी फसवणूक होऊ शकते. त्याशिवाय या काळात कामाच्या ठिकाणी तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत तुमच्यासाठी खुले होणार आहेत.
कर्क रास – (Cancer) कर्क राशीसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे. या दिवसा स्त्री मैत्रिणीकडून तुम्हाला खूप सहकार्य राहणार आहे, त्यामुळे तुम्ही प्रसन्न असणार आहात. मात्र कार्यालयात कोणतेही काम करण्यापूर्वी काळजीपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे.
या काळात तुम्ही घाईगडबडीत कामं करु नका. बाहेर जाण्याचे बेत आखणार आहात. या दिवसांमध्ये योगा आणि ध्यान करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
तूळ रास – (Libra) तूळ राशीच्या लोकांचे या योगामध्ये आरोग्याच्या समस्या दूर होणार आहेत. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळणार आहे. कामातील यश पाहून तुमचं मनं प्रसन्न आणि सकारात्मक राहिल.
ऑफिसमधील एखादा निर्णय तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. नवीन काही करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला असणार आहे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!