दररोज सकाळी श्री अन्नपूर्णा मातेचा हा मंत्र बोला घरात सुख समृद्धी पैसा सर्व काही येईल.

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, सकाळी एकदा अन्नपूर्णा देवीच्या या मंत्राचा जप करा, घरात भरपूर अन्नधान्य राहील आणि आशीर्वाद मिळेल. अन्न पूर्णा देवी आणि स्वामी समर्थ महाराज यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या घरी यामुळे राहणार आहे. मित्रांनो, संपत्ती साठी धनधाण्यासाठी अन्नपूर्णा आईची पूजा करावी, सुख समृद्धीसाठी पूजा करावी, माता अन्नपूर्णा चे व्रत करावे, उपासना करावी. पण अन्नपूर्णा मातेची पूजा किती लोक करतात? किती लोक अन्नपूर्णा मातेचे व्रत करतात? एवढेच नाही तर काही लोकांच्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसते.
मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, लक्ष्मीची मूर्ती ही संपत्ती, सुख आणि समृद्धीसाठीचे लक्षण आहे. जरी आपण दररोज पूजा-अर्चा करतो, याशिवाय घरात अन्नपूर्णेची मूर्ती असणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. आणि रोज अन्नपूर्णेची पूजा करावी, तरच घरात पैसाही येईल आणि अन्नधान्यही येईल. आज आम्ही तुम्हाला असा एक अन्नपूर्णा देवीचा मंत्र सांगणार आहोत, जो तुम्हाला दिवसातून एकदाच म्हणायचा आहे. देवाची पूजा करताना तुम्ही या मंत्राचा जप करू शकता आणि जर घरातील कोणत्याही सदस्यानेही त्याचा जप केला तर त्याचा संपूर्ण घराला फायदा होईल आणि माता अन्नपूर्णाची कृपा होईल.
मित्रांनो, हा एक मंत्र आहे की तुम्हाला दररोज सकाळी अंघोळ वैगरे करून देवाच्या पूजेच्या बसायचे आहे. आणि तुमच्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असली तरीही तुम्ही या मंत्राचा जप करू शकता आणि मूर्ती नसली तरीही तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. जर तुमच्याकडे ही मूर्ती नसेल तर तुम्ही अन्नपूर्णा मातेची मातीची मूर्ती घेऊन मंदिरात ठेवा आणि रोज अन्नपूर्णा मातेची पूजा करा आणि या मंत्राचा जप करा.
मित्रांनो हा मंत्र खूप सोपा आहे. मित्रांनो, हा मंत्र आहे श्री अन्नपूर्णाय नमः श्री अन्नपूर्णाय नमः श्री अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप एकदाच करावा लागेल, हा मंत्र बोलताना हात जोडावे लागतील, डोळे बंद करावे लागतील आणि श्री अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा एकाच वेळी जप करावा लागणार आहे. जर तुम्हाला अधिक बोलायचे असेल तर तुम्ही अधिक बोलू शकता. 3 7 9 11 21 51 108 अशा प्रकारे तुम्ही या माळीचा जप करू शकता.
मात्र या मंत्राचा लाभ घेण्यासाठी आपल्याला दररोज न चुकता देवघारासमोर बसावे लागणार आहे. आणि देवतांची पूजा केल्यानंतर या मंत्राचा एकदा तरी जप करावा लागणार आहे. हा मंत्र बोलून तुम्हाला देवीला आमंत्रण द्यायचे आहे, त्यामुळे तुमच्या घरावर अन्नपूर्णा प्रसन्न होईल आणि तुमचे घर धन, सुख, समृद्धी, समाधान, आरोग्य, याने भरलेले असेल.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news