छ. संभाजीनगर, हादरून टाकणारी सैराट सारखी घटना, साविस्तर वाचा…
प्रेमानं संसार फुलवायचा होता, महिन्याभरातच सगळं संपलं; छ. संभाजीनगर या हल्ल्याने हादरलं प्रेमानंतर सहजीवनाची सुरवातच करणाऱ्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला. लग्नानंतर महिन्याभरातच मुलीच्या वडिलांनी त्याची हत्या केली. आंतरजातीय विवाह केल्यानं छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनर कि लिंग ची घटना घडलीय. प्रेमानंतर सहजीवनाची सुरवातच करणाऱ्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला.
ज्याच्या वर प्रेम केले त्याच्या सोबत लग्न झाले या आनंदाची भावना केवळ एक महिन्यात चिरडली गेली.विद्या आणि अमित यांनी आंतरजातीय विवाह केला. विद्या बौद्ध समाजाची होती तर अमित गोंधळी समाजाचा होता.
अमितच्या घरच्यांनी दोघांचे लग्न मान्य केले. मात्र विद्याच्या वडिलांनी आणि भावाने हे लग्न प्रतिष्ठेचे केले आणि अमितची हत्या केली. अमितची आई म्हणते माझ्या मुलाने फक्त प्रेमच केले. प्रेम करण्याचा अधिकार नव्हता का?विद्या आणि अमित दोघेही इंदिरानगर मध्येच लहानाचे मोठे झाले. बालपणीचे हे मित्र एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी पळून जाऊन पुण्यात विधिवत लग्न केले.
अमितच्या घरच्यांचा पाठिंबा मिळाल्याने ते परत आले. 13 जूनला त्यांनी लग्न केले आणि लग्नाचा एक महिना झाला असतानाच 14 जुलै रोजी अमित वर भर चौकात हल्ला झाला.
विद्या सध्या सायन्स प्रथम वर्षाला आहे. अमितला तिला खूप शिकवायचे होते. मात्र वस्तीतल्या चौकात बोधिवृक्षाखाली उभ्या असलेल्या अमित वर लाईट घालवून हल्ला झाला. विद्याचे वडील आणि भावांनी अमितवर हल्ला केला.