जरा हटके

सतत दुसऱ्या बाईचा नवऱ्याला येणारा मेसेज पाहून बायको उचलते असे पाऊल.. पण नंतर तिला जे कळते ते पाहून तुम्ही देखील.. शेवटी पहा..

नवरा अंघोळीला गेल्यावर त्याच्या मोबाईलवर मेसेज येतो हाय गुड मोर्निंग डीअर.. मेसेज फ्रोम बेबी. सहज म्हणून बायको तो मेसेज वाचते. ती विचारत पडते की, ही बेबी कोण आता. नवरा बाथरूम मधून बाहेर आल्यावर ती त्याला कोणीतरी बेबीचा मेसेज आल्याचे सांगते. नवरा हसतो आणी मोबाईल घेऊन रिप्लाय करतो. हाय बेबी.. हाऊ आर यु ? आणी आपल्या कामाला लागतो.

तो रिप्लाय देखील बायको पाहते. मग दिवसभर डोक्यात विचार सुरु होतात. कोण असेल ही बेबी ? संध्याकाळी नवरा घरी आल्यावर त्याला ती विचारते. ही बेबी कोण आहे हो ? नवरा केवळ हसतो आणी उत्तर न देता आपल्या कामाला लागतो. असेच एक दोन दिवस जातात. पुन्हा एके दिवशी सकाळी मेसेज येतो. हाय आज तरी भेटणार का खूप आठवण येते तुझी.. मेसेज फ्रोम बेबी.

हे वाचून मात्र बायकोच्या मनात सं’शय वाढू लागतो. अधून मधून अशाच प्रकारचे मेसेज यायचे नवराही लगेच हसत-हसत रिप्लाय द्यायचा आणी हे सगळ पाहून बायकोचा सं’शय वाढायचा आणी एके दिवशी नवऱ्याच्या खिश्यात सिनेमाची दोन तिकिटे तीला सापडतात. त्याचे रुपांतर शेवटी तिच्या प्रचंड रागात होते. दोघात कडाख्याचे भांडण होते.

तिच्या मनात अडी बसलेली त्यात भांडण पे’टलेले, त्या दिवशी नवरा ऑफिसला गेल्यावर ती त्याच्यासाठी एक चिट्टी ठेवते. मी घर सोडून माहेरी जातेय कायमची. नवरा घरी आल्यावर चिट्टी वाचून सुन्न होतो. पंधरा दिवस जातात आणी एके दिवशी बायको आपल्या गावातच असलेल्या ज्या माहेरी राहत असते त्या घराची बेल वाजते. बायकोच दार उघडते.

दारात ५ वर्षाची एक अतिशय गोड मुलगी उभी असते ती विचारते अनुपच्या मिसेस तुम्हीच ना. बायको हो म्हटल्यावर ती मुलगी तीच्या हातातले एक पत्र बायकोला देते. बायको पत्र वाचू लागते. प्रिय सखी.. ज्या बेबी बरून इतके वादळ उठले आणी तु घर सोडून गेलीस तीच ही बेबी आहे जिने आता तुला पत्र दिलय. अनाथ आश्रमातील ही गोड मुलगी हिच्यासोबत मी बोलायचो,

सिनेमाला जायचो. जेव्हा तु मला विचारलेस की ही बेबी कोण आहे तेव्हा मी मुद्दाम तुला सांगितले नाही. म्हटल पाहूया.. जरा गंमत करूया मात्र तुझा बेबी सं’शय वाढतच गेला. आणी तिथेच विश्वासाला तडा गेला तरीही शेवटी मी थेट बेबीशी तुझी भेट घडवणार होतो. पण तु ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतीस. आणी रागाच्या भरात निघून गेलीस.

आणी हो अजून एक ही जी बेबी तुझ्या समोर उभी आहे ना ती दुसरी तिसरी कोणीच नसून तुझीच मुलगी आहे. थांब दचकू नकोस शांतपणे पुढचे वाच. आपल लग्न व्हायच्या २ वर्षे अगोदरची घटना तु कॉलेजच्या लास्ट इयरला होतीस तिथल्या एका प्राध्यापकाने नोट्स देण्याच्या बहाण्याने घरी बोलवून तुला कॉफीतून गुंगीच औ’षध दिलेल आणी नंतर नको ते कृत्य केलेलं.

तुझी चुक नसतानाही निसर्गाने मात्र काम केले. नंतर प्रयत्न करूनही काहीच साध्य झाले नाही. तीव्र्तीचा बों’बाटा नको म्हणून घरच्यांनी तुला सहा महिने घरातच झाकून ठेवलेलं. तुझे वडीलच डॉ’क्टर असल्याने फारसा गों’धळ न होता नको ते बाळ ज’न्मले. पुढे तुझ्या वैवाहिक जीवनात अडचण ठरणारे हे बाळ तुझ्या वडीलांनी गावातील अनाथ आश्रमात सोडून दिलेलं.

तेच बाळ म्हणजे ही बेबी. वाटल्यास तिच्या डाव्याखंद्यावरचा तीळ पाहून खात्री करून घे, जो तु तीला पहिल्यांदा रडताना पहिले असशील. किंवा थेट वडीलांकडून खात्री करून घे. बायको पटकन त्या मुलीजवळ जावून खांद्यावरील तीळ पाहते. तीळ दिसताच ती मनातून कोसळते, तिचे डोळे भरून आले होते मात्र पत्र अजून बाकी असते. ती पुढे वाचायला सुरुवात करते.

आता हे सगळ मला कसं माहित तर तुझ्या पाप भीरु वडीलांनीच न राहउन आपल्या लग्नाच्या एक महिना आधी मला भेटून हे सांगितले. वाटल्यास अजूनही तुम्ही लग्न मोडू शकता असे ते बोलत होते. तरीही मी तुला स्वीकारलं. कारण जे घडले त्यामध्ये तुझी चुक काहीच नव्हती. आणी आपले लग्न झाले. पण मीच अधून मधून त्या बेबीला जावून भेटायचो.

तिच्या सहवासात छान वाटायचे, लळा लावला होता पोरीने. बास.. माझे सांगून संपले सगळे आता विचार कर आणी जे पुन्हा आपण एकत्र यायचा निर्णय झाला असला तर आणी तरच गॅलरीत ये. सदैव तुझाच.. बायको ताडकन धावत गॅलरीत जाते खाली रस्त्यावर नवरा उभा असतो शांतपणे हसतमुख आणी इकडे हिच्या डोळ्यात अश्रूचा महापूर. कारण कोणतेही असो दोघांमध्ये सं’शयाला कधीच थारा देवू नका.

शांतपणे समोरासमोर बसून निरसन करून घेताना मनात मोकळेपणा ठेवा कारण जगात सं’शय हा एकमेव असा रो’ग आहे ज्यावर अद्याप औ-षध निघालेलं नाही. यावर औ’षध एकच नात्यात वाद नको संवाद हवा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button