शनि प्रदोष व्रत कसे करावे.? पूजा विधी आणि महत्त्व जाणून घ्या..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व सांगण्यात आलं आहे. खासकरून प्रदोष, एकादशी, चतुर्था, अमावास्या आणि पौर्णिमेचं महत्त्व अधोरेखित होतं. प्रदोषाच्या वेळी भगवान शिवाची उपासना फळते. जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी
भगवान शिव शंकर यांना भोलेनाथ म्हंटलं जातं. कारण शिव शंकर भक्तांवर लवकर प्रसन्न होतात. (Shanipradosh Vrat) भक्तांच्या इच्छा ते लवकर पूर्ण करतात अशी धारणा आहे. त्यामुळे भक्तगण त्यांची पूजा विधी करण्याची एकही संधी सोडत नाही. भगवान शिवांचा आशीर्वाद असला की दु:खाची तीव्रता कमी होते. तसेच जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी मार्ग सापडतो.
हिंदू शास्त्रानुसार, कोणताही भाविक शिवाची कृष्ण आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशीला म्हणजेच प्रदोष असताना पूजा विधी करतो तेव्हा त्याला लवकर फलप्राप्ती होते. जीवनातील अनेक समस्यांचं सहज समाधान होतं. त्यामुळे प्रदोषाच्या दिवशी शिवभक्त न चुकता शिवाची पूजा करतात. प्रदोष व्रत (Shanipradosh Vrat) शनिवारी आला तर शनिपीडेतून सुटका मिळवण्याची संधी असते. शनिवारी येणाऱ्या प्रदोषाला शनिप्रदोष असं संबोधलं जातं. चला जाणून घेऊयात या व्रताचं महत्त्व आणि पूजाविधी..
कधी आहे शनि प्रदोष व्रत – हिंदू पंचांगानुसार, शनि प्रदोष व्रत 1 जुलै 2023 रोजी आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशीला शनिवार येत असल्याने शनि प्रदोष आहे. ही तिथी 1 जुलै 2023 रोजी मध्यरात्री 1 वाजून 16 मिनिटांपासून रात्री 11 वाजून 7 मिनिटापर्यंत असेल. या दिवशी भगवान शिव शंभूंची पूजा केल्याल शनि पीडेतून दिलासा मिळतो. (Shanipradosh Vrat) भगवान शिवांच्या पुजेसाठी उत्तम कालावधी संध्याकाळी 7 वाजून 23 मिनिटांपासून रात्री 9 वाजून 24 मिनिटांपर्यंत असेल.
कशी कराल शनि प्रदोषात पूजा – शनि प्रदोषाच्या दिवशी जातकाने सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि पूजा करावी. (Shanipradosh Vrat) त्यानंतर जवळच्या शिव मंदिरात जाऊन भगवान शिवाची पूजा करावी. संध्याकाळी प्रदोष काळात पुन्हा स्नान करून मंदिरात जावं. शिवलिंगावर गंगाजल, फुलं, फळं, दीप, धूप, बेलपत्र, शमीपत्र, भस्म, चंदन अर्पण करावं. यानंतर प्रदोष व्रताची कथा वाचावी. महादेवाची आरती करून आपल्या इच्छित मनोकामनेसाठी प्रार्थना करावी.
शनि त्रासातून दिलासा मिळावा यासाठी उपाय – तुमच्या कुंडलीत शनि दोष असेल तर या दिवशी पूजा करून दिलासा मिळवू शकता. या दिवशी शिवलिंगावर गंगाजल आणि शमीपत्र अर्पण करा. त्यानंतर एक माळ महामृत्यूंजय मंत्राचा जप करा. (Shanipradosh Vrat) भगवान शिवाची पूजा केल्याने शनि पीडितून दिलासा मिळतो अशी मान्यता आहे. भक्तांना सुख, सौभाग्य, संपत्तीची प्राप्ती होते.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद