राशिभविष्य

श्रावण महिन्यात ‘या’ राशी होणार मालामाल? तुमची रास आहे का यात ?

श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात शिवशंकराची आराधना केली जाते. श्रावण महिना शिवशंकराला प्रिय असलेल्या राशींसाठी खूप खास असतो, असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींसाठी श्रावण महिना भाग्यवान ठरणार आहे. त्या राशी कोणत्या? चला जाणून घेऊ या …

मेष
ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण महिना मेष राशीसाठी खूप खास मानला जातो आणि या महिन्यात शिवशंकराची या राशीवर कृपा असते. असं म्हणतात की, श्रावण महिन्यात या राशीच्या लोकांच्या आयुष्यातील संकटे दूर होऊ शकतात आणि त्यांना मोठी धनप्राप्ती होऊ शकते. (Astrology In Sharvan)

मकर
मकर राससुद्धा शिवशंकराची प्रिय रास मानली जाते आणि या राशीच्या लोकांवर शिवजीची विशेष कृपा असते. असं म्हणतात की, या राशीचे लोक खूप भाग्यवान असतात. या राशीच्या लोकांचा स्वभाव शांत असतो, असं म्हणतात.ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण महिन्यात या राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो.

वृश्चिक
वृश्चिक रास ही शिवशंकराची प्रिय रास मानली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार या राशींसाठी श्रावण महिना अत्यंत शुभ असतो. असं म्हणतात की, श्रावण महिन्यात या राशीच्या लोकांच्या आयुष्यातील संकटे आणि अडचणी दूर होऊ शकतात.

कुंभ
शिवशंकराला प्रिय असणाऱ्या राशींच्या यादीमध्ये कुंभ राससुद्धा आहे, असं म्हणतात. या राशीवर शिवजीची विशेष कृपा असते, असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना नेहमी शुभ असतो. श्रावण महिन्यात या लोकांच्या आर्थिक समस्या दूर होऊ शकतात आणि त्यांना मोठा धनलाभ होऊ शकतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button